shankar pale banner

रेसिपी मेथी शंकरपाळे

येत्या दिवसांत कुठल्या वारी फराळाचा कुठला पदार्थ उरकून घ्यावा हे ठरलेच असेल, त्या पदार्थांच्या यादीत आता निराळ्या चटपटीत चवीची भर पडणार आहे. गोड शंकरपाळीसोबत, यंदा मेथीची शंकरपाळी बनवून पहा. फराळाची लज्जत नक्की वाढेल.

साहित्य –

३/४ वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी मैदा, १ टि. तेल, २ टि. कसूरी मेथी, ओवा, चवीपुरते मीठ, तेल

पाककृती –

  • गव्हाचे पीठ, मैदा व मीठ एकत्र करुन घ्यावे. त्यामध्ये १ टिस्पून मोहन घालावे.
  • ओवा, कसूरी मेथीची पावडर पिठात मिसळावी. सर्व मिश्रण पाण्याने घट्ट मळून घ्यावे. साधारण १५ मिनिटे मिश्रण झाकून ठेवावे.
  • आता, या पीठाचे साधारण दोन समान भाग करुन घ्यावेत. एक पिठाचा गोळा पातळ लाटून सुकू नये म्हणून झाकून ठेवावा.
  • दुस-या पिठाची पोळी लाटून घ्यावी. त्यावर एका बाजूस तेल लावावे व झाकलेली पोळी त्यावर ठेवावी. पोळ्या सुटू नयेत म्हणून त्या लाटण्याने त्यावर दाब द्यावा.
  • कातण्याने शंकरपाळ्यांच्या आकारात कापून तेलात साधारण मध्यम आचेवर तळून घ्याव्यात.

दिवाळी स्पेशल मेथीचे शंकरपाळे कसे वाटले? नक्की लिहा तुमचा प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये, तसेच तुमच्याजवळ खास फराळी असतील तर त्याही शेअर झी मराठी जागृतीच्या मैत्रिणींसाठी!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares