रसगुल्ला

रेसिपी – रसगुल्ला

विविधतेने सजलेल्या आपल्या भारत देशाची संस्कृतीही तितकीची विभिन्न व खाद्यप्रेमींसाठी मेजवानीच आहे. जितकी राज्ये तितकी पदार्थांची रेलचेल खवय्यांहचे स्वागत करण्यास नेहमीच सज्ज असते. पश्चिम बंगालमधील असाच एक पारंपारिक पदार्थ म्हणजे रसगुल्ला! महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रमांतही रसगुल्ल्यास स्थान दिले जाते. तेव्हा, या डेझर्ट डिशची रेसिपी खास महाराष्ट्रातील चाहत्या वर्गासाठी!!

रेसिपी
साहित्य – १ लि. दूध, ३०० ग्रॅ. साखर, २ लिंबांचा रस

पाककृती –
१. एक स्वच्छ भांडे घेऊन त्यामध्ये दूध उकळवून घ्यावे. लिंबाचा रसाइतकेच पाणी दूधात घालावे व लिंबाचा रस उकळत्या दूधात दूध फाटोपर्यंत हळूहळू घालत रहावा.

२. फाटलेले दूध स्वच्छ सूती कपड्यात ओतून गाळून घ्यावे. तयार झालेल्या पनीरला कपडयातच थंड पाण्याने धुवून घ्यावे. असे केल्याने त्यामधील आंबटपणा निघून जाईल.

३. नंतर, कपडा चारही बाजूने एकत्र गुंडाळून घट्ट दाबून घ्यावा व पाणी पूर्णपणे निथळू द्यावे. आता, तयार झालेला गोळा एका ताटात काढून घ्यावा व एकजीव होईपर्यंत मळून घ्यावा. त्याचे लाडूसारखे छोटे छोटे गोळे तयार करुन घ्यावेत.

४. एका पातेल्यात ४ कप पाण्यामध्ये साखर मिसळून पाणी उकळवून घ्यावे. उकळी आल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले गोळे एक एक करुन सोडावेत.

५. १० ते १५ मिनिटे रसगुल्ले शिजवून घ्यावेत. तयार रसगुल्ले पाकासहित एका भांड्यात काढून घ्यावेत. थंड होउ द्यावेत साधारण ५ ते ६ तासांनी सर्व्ह करावेत.

मैत्रिणींनो, वरील रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा खालील कमेन्टबॉक्सद्वारे!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares