LADOO (2)

रेसिपी – राघवदास लाडू

श्रावणातील विविध सण आणि जवळ येणारी बाप्पाच्या आगमनाची घटीका लक्षात घेता. गोडाचे पदार्थ घरोघरी सर्रास शिजतायत. त्यात भर घालण्यासाठी देत आहोत आजची राघवदास लाडवांची रेसिपी. वाचा आणि करुन पहा..

साहित्य – १ वाटी रवा, २ वाटी किसलेलं खोबरं, १ वाटी पाणी, दीड वाटी साखर, २ टे.स्पू. दूध, १/२ वाटी तूप, काजू, मनुका, केशर, वेलची पूड

पाककृती – सर्वप्रथम तापलेल्या कढईत रवा ३ ते ४ मि. भाजून घ्यावा. त्यांनतर, त्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालावं. ते नीट ढवळून बाजूला ठेवून द्यावे. आता, पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी व साखरेचे मिश्रण गरम करत ठेवावे. सतत ढवळत रहावे. त्यामध्ये, दूध मिसळून हे मिश्रण थंड होण्यास ठेवून द्यावे.

पुन्हा एकदा गरम कढईमध्ये तूप वितळवून घ्यावे. त्यामध्ये, भाजलेला रवा व खोबर घालून पुन्हा पाच मिनिटं मिश्रण भाजून घ्यावे. आता त्यात काजू, मनूका, वेलची पूड, केशर व तयार केलेला पाक घालावा.

हे सर्व जिन्नस छान मिळून यायला हवेत. १० मिनिटं मिश्रण सतत परतून घ्यावं, नाहितर ते भांड्याला लागण्याची शक्यता असते.

त्यानंतर, तयार झालेले हे मिश्रण गार झाल्यानंतर, त्याचे छान लाडू वळून घ्यावेत.

कशी वाटली गोडाची रेसिपी, नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया!

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares