vegetable soup banner

रेसिपी व्हेजिटेबल सूप

साहित्य – २ टि.स्पू. किसलेले गाजर, २ टि.स्पू.फुलकोबी, २ टि.स्पू. कोबी, २ टि.स्पू. लसूण पेस्ट, २ टि.स्पू. तेल, २ टि.स्पू. कोथिंबीर(बारीक चिरुन), कांद्याची पात, मीठ, मिरपूड, १ टि.स्पू. लिंबाचा रस, २ टि.स्पू. कॉर्न स्टार्च, चार कप पाणी

पाककृती – प्रथम कढईत तेल गरम करावे. त्यामध्ये लसूण पेस्ट साधारण गुलाब होईपर्यंत परतावी. आता त्यामध्ये बारीक चिरुन घेतलेला फुलकोबी, गाजर, कोबी परतून घ्यावे.
कांद्याची पात घालून मिश्रण पुन्हा बंद आचेवर परतावे.
आता यामध्ये, साडे तीन कप पाणी व चवीपुरते मीठ घालावे.
सूपाला उकळी येईस्तोवर १/२ कप पाण्यात २ टि.स्पू. स्टार्च मिसळून घ्यावा. हे मिश्रण उकळत्या सूपामध्ये घालावे. सतत ढवळत रहावे यामुळे गुठल्या होणार नाहीत.
काही मिनिटे सूप उकळवत ठेवावे. यामुळे, कॉर्न स्टार्च कच्चा रहाणार नाही.
असे तयार सूप गरमागरम सर्व्ह करताना मिरपूड, कोथिंबीर व कांद्याची पात टाकून गार्निश करावे. (आंबट चवीसाठी व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरता येईल.)

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares