VEG CHEESE PARATHA (1)

रेसिपी – व्हेज चीज पराठा

साहित्य –

वाटीभर मैदा, वाटीभर कणीक, सहा चमचे मोहन(तुपाचे), अर्धी वाटी किसलेले चीज,  किसलेला फ्लॉवर, बारीक चिरलेले गाजर, वाटीभर मटार दाणे, बारीक चिरलेला एक कांदा, बारीक चिरलेली फरसबी, विविधरंगी सिमला मिरच्या बारीक चिरुन, वाफवलेले मक्याचे दाणे, तीन ते चार हिरव्या मिरचा, लहानसा आल्याचा तुकडा, चार ते पाच लसणाच्या पाकळ्या, पुदीना, कोथिंबीर, साखर, मीठ. (भाज्या आवडीनुसार कमी जास्त घ्याव्यात.)

पाककृती –

  • सर्व भाज्या बारीक चिरुन घ्याव्यात.
  • मक्याचे, मटारचे दाणे व भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्याव्यात. जास्तीचे पाणी काढून, सर्व भाज्या गरम असतानाच घोटून घ्याव्यात.
  • आता, त्यामध्ये मिरच्या, आले, लसूण, पुदिना हे सर्व जिन्नस बारीक चिरुन घालावेत.
  • मिश्रण कोमट असतानाच त्यात चीज किसून घालावा. मिश्रण थंड होऊ द्यावे.
  • त्यानंतर, पीठात थोडे मोहन व मीठ घालून कणीक नीट मळून घ्यावी. चपातीहून लहान आकाराच्या दोन जाडसर पोळ्या लाटून त्यामध्ये तयार सारण भरावे व पराठे लाटून घ्यावेत.
  • तूपाच्या सहाय्याने पराठे भाजून घ्यावेत. चीजमुळे पराठे छान मऊसर होतात. असे चविष्ट पराठे सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करावेत.

‘व्हेज चीज पराठे’ करायला सोप्पे व झटपट तयार होणारे असून, सकाळची ब्रेकफास्ट किंवा खाऊचा डब्बा हे पराठे नक्कीच चविष्ट करतील.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares