puriii (1)

रेसिपी – साबुदाणा पुरी

साहित्य – २ उकडलेले बटाटे, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, १/२ टि. जिरे, ३ टि. शेंगदाणा कूट, १ टि. जिरेपूड, १ ते २ टि. शिंगाडा पीठ, मीठ, तेल

पाककृती –

  1. १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा, त्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे.
  2. मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे व थोडे मीठ घालावे व पाणी न मिसळता हे मिश्रण बारीक करुन घ्यावे.
  3. शिजलेले बटाटे कुस्करुन घ्यावेत. त्यामध्ये मिरची कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाण्याचा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड व शिंगाडा पीठ मिसळून सर्व मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे. आवश्यक वाटल्यास त्यात थोडे मीठ घालावे.
  4. आता, तेल तापवत ठेवावे व तयार पिठाचे लहान लहान गोळे करुन घ्यावेत.
  5. प्लॅस्टिकच्या पिशवीवर तेलाचा हात लावावा व त्यावर पिठाचे लहान गोळे जाडसर थापून घ्यावेत. त्यावर मध्याभागी बोटाने भोक पाडावे.
  6. ह्या पु-या पातळ थापल्यास, तेलात टाकल्यावर तुटतात.
  7. पुरी तेलात टाकल्यावर झटकन पलटू नये, असे केल्यानेही पुरी तुटण्याची शक्यता असते. म्हणून, पूरी झा-याने अलगद तेलात बुडवावी. छान तपकिरी रंगाची होईस्तोपर पुरी तळून घ्यावी.
  8. तयार झालेली गरमागरम साबुदाणा पुरी चटणीसोबत सर्व्ह करावी.

कशी वाटली आजची उपवास स्पेशल रेसिपी? नक्की कळवा व लवकराच लवकर साबुदाणा पुरी करुनही पाहा!!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares