soya (2)

रेसिपी – सोयाबीन कटलेट

सायोबीन खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. यामधील प्रथिनांद्वारे हाडांना भरपूर कॅल्शियम मिळते, तसेच शरीरातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. वजन घटविण्यासाठी सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ उपयुक्त ठरतात.

सोयाबीन कटलेट बनविण्यासाठी लागणारे साहित्य –
अर्धा कप सोयाबिनचे दाणे, अर्धा कप उकडलेले मूग, एक उकडलेला बटाटा, पाव कप बारीक चिरेलला कांदा, एक टि.स्पू. गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार हिरव्या मिरच्या(बारीक चिरुन), रवा, तेल, मीठ

पाककृती-
१. सोयाबिनचे दाणे शिजवून घेऊन त्यातील पाणी काढून टाकावे. बटाटा नीट स्मॅश करुन घ्यावा.

२. आता, एका पसरट भांड्यात सोयाबिनचे दाणे, मूग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या व मीठ टाकून सर्व जिन्नस एकजीव करुन घ्यावे व तयार केलेल्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करुन त्यांना कटलेटचा आकार द्यावा.

३. एका प्लेटमध्ये रवा घ्यावा व त्यावर कटलेट ठेवून जरासे दाबावे. अशाप्रकारे, कटलेटच्या दोन्हीबाजूस रवा नीट लावून घ्यावा.

४. नॉन स्टीक तव्यावर तेल टाकून कटलेट दोन्ही बाजूंनी छान तांबूस होईस्तोवर भाजून घ्यावे.

५. गरमागरम कटलेट्स सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करावेत.

मैत्रिणींनो, ट्राय करुन पहा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा खालील कमेन्टबॉक्समध्ये!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares