soya banner

रेसिपी – सोया नगेट्स

साहित्य –

१कप सोया खीमा(भिजवलेला), १कप ब्रेड क्रम्ब्स, १कप उकडून कुस्करलेले बटाटे, १ अंडे, १/२कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १० ते १२ चीझचे तुकडे(१इंचाचे), १/४ चमचा आल लसूण पेस्ट, बारीक चिरलेलले आले, जिरेपूड, मीठ

पाककृती –

  • प्रथम भिजवलेला सोया खिमा व कुस्करलेले बटाटे नीट एकजीव करुन घ्यावे.
  • त्यामध्ये २ चमचे ब्रेड क्रम्ब्स, आल लसूण पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, जिरे पावडर मीठ व किसलेले चीझ घालून सर्व जिन्नस एकजीव करावेत.
  • आता, त्यामध्ये अंडे घालून पुन्हा मिश्रण ढवळून एकजीव करावे.
  • उरलेले ब्रेड क्रम्ब्स एका ताटलीत घ्यावेत.
  • नंतर, पॅनमध्ये सोया नगेट्स तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे. चीझचा लहानसा तुकडा घेऊन,  तयार मिश्रण त्याच्या भोवताली बांधून, गोळ्यास छान लंबगोल आकार द्यावा.
  • हे नगेट्स ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून तेलात डीप फ्राय करुन घ्यावेत.
  • तयार सोया नगेट्स, सॉस किंवा चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares