hairstyle banner main (1)

लग्नसोहळ्यासाठी अनोख्या हेअर स्टाईल्स!

सर्वत्र लग्नाचा सीझन सुरु आहे, तेव्हा तुम्हीही स्वत:ची स्टाईल निवडण्यात व्यग्र असाल. त्यात आमचाही थोडा हातभार. आज हेअर स्टाईल निवडण्याच्या पेचातून आम्ही तुमची सुटका करणार आहोत. त्यासाठीच घेऊन आलोय काही देखण्या हेअर स्टाईल्स तुमच्यासाठी…

केस बांधण्याची एक मराठमोळी पारंपारिक पद्धत म्हणजे वेणी. साडी किंवा शरा-यावरही वेणी छान जाते. फक्त वेणीचे हटक्या त-हेने फ्यूजन करता यायला हवे. त्याच्या काही लयदार स्टाईल्स खालील प्रमाणे,

hairstyle banner A

अंबाडा घालून तो सुरेखरित्या सजवण्याच्या पद्धतींत हलके हलके बदले झालेले दिसतात. फुलं किंवा इतर एक्सेसरीज वापरत अशाप्रकारे अंबाड्यास ब्राईडल लूक देता येईल.

hairstyle banner B

ब-याचदा लग्नकार्यात विधीच्यावेळेस केस बांधून त्यास छान पारंपारिक लूक दिला जातो, तर नंतर केस मोकळे ठेवून काही हटके हेअर स्टाईल करणे पसंत मुली करतात. त्यासाठीच या काही हेअर स्टाईल्स.

hairstyle banner C

केस नीटनेटके बसवण्यापेक्षा त्यांना मेस्सी लूक देणं, हल्ली अधिक पसंती केलं जातं. कधी अप्पर बन, तर कधी साधा अंबाडा घालतानाही त्याला पुढील प्रमाणे मेस्सी टच देत अनोखी हेअर स्टाईल साधता येईल. ज्यात छान छान पीन्स खोचून त्यास अधिक देखणं बनवता येतं.

hairstyle banner D

ट्रेंडी फॅशनमध्ये रेट्रो स्टाईलला तुम्ही झुकते माप देत असाल, तर अशा काही जुन्या पण आजही तरुणाईत सुपरहीट ठरणा-या हेअरस्टाईल्स तुम्हाला हमखास आवडतील.
hairstyle banner E

लग्नसोहळ्यासाठी तयार होताना तुम्ही वधूच्या भूमिकेत असाल किंवा व-हाडी म्हणून सोहळ्यात हजेरी लावणार असलात, तरी वरील त-हेत-हेच्या हेअर स्टाईल्स जरुर आजमावून पाहा. या स्टाईल्समुळे चारचौघात उठून दिसला नाहीत, तरच नवलं..

Image source – pinterest

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares