Wedding Banner

लग्नानंतर मुलीचं नाव बदलतं तेव्हा….

भारतीय संस्कृतीत पार पडणा-या अनेक शुभ कार्यांपैकी एक म्हणजे ‘लग्न’! जे दोन कुटुंबांना एकत्र आणते, स्वर्गात बांधलेल्या जन्मगाठींना मूर्त स्वरुप देते, पती-पत्नीत नात्याचा बंध जोडते, अशी या मंगलकार्याची अनेक वर्णने करता येतील. धर्म किंवा जात कुठलीही असो, लग्न करुन मगच नवरा बायकोचे नाते नांदू लागते. हे समाजमान्य आहे. फरक असतो लग्न सोहळ्यांच्या पद्धतीत! जे त्या वधु-वराच्या जीवनात अनेक नवे बदल घडवणार असतात. त्यापैकीच एक लग्नानंतर मुलीचे बदलणारे नाव. तिच्या नावापुढे वडीलांऐवजी नव-याचे नाव लागते आणि आडनावही बदलते.

यास आपण अनंत पिढ्यांपासून चालत आलेली कायदेशीर प्रथा असे म्हणू शकतो. त्यात काही वावगेही नाही. नावाचा मुद्दा आला, की “नावात काय आहे?” असं म्हणणा-या थोर शेक्सपिअरची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. आणि हल्ली बरेच लोकं हे फॉलो करतायेत बहुतेक, संपूर्ण नाव, आडनाव, मधलं नाव अशी झंजट न ठेवता फक्त आद्य नाव धारण करतात. अशा एकेरी नावामुळे धर्माचा किंवा जातीचा शिक्का ओळखण्यात पटाईत असणा-यांची मोठी पंचाईत होते.

एकीकडे लग्नानंतर कायदेशीर बदलणा-या नावासोबत तिचे आद्य नावही बदलले जाते. काहीजणींना हे आवडते, तर काहींना संपूर्ण नाव बदलल्यावर स्वत:ची ओळख ती काय उरणार असाही प्रश्न पडतो.

आज शिक्षणाच्या जोरावर आर्थिक व मानसिकदृष्ट्या सक्षम झालेली ती, समाजात स्वत:चं अस्तित्त्व निर्माण करतेय. पाळण्यातील नावाला तिने लहानपणापासून कमावलेली ओळख जोडलीये. शाळा, कॉलेज, नोकरी अशा विविध ठिकाणी आपल्या कतृत्त्वाची मोहोर उमटवताना, तयार झालेले तिचे व्यक्तिमत्त्व जपण्यासाठी तिला तिच्या पाळण्यातील नावाची जोड हवी ना…?

तुम्हाला काय वाटतं..? आम्ही तुमच्या प्रतिक्रियांचा वाट पाहातोय, तेव्हा तुमची मते नक्की लिहा खालील कमेन्टबॉक्समध्ये…

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares