kIDS MOBILE (1)

लहान मुलांना स्मार्टफोन देताय की आजार…?

तान्हेबाळही स्मार्टफोनवरची हलती चित्र पहात तासनतास शांत बसते. आईलाही तिची कामे भरभर आवरण्याची मोकळीक मिळते.हल्ली फोटो काढण्यापासून, कठीणातील कठीण गेम्सही लहान मुलं अगदी सराईतपणे खेळतात. टेक्नोलॉजीविषयीमोठ्यांचे ज्ञानही इथेतोकडे पडते.
१. एकटक स्क्रीनकडे पहात राहिल्याने डोळ्यांवर ताण येतो व डोळे कोरडे होतात, कमी वयात चष्मा लागण्याची समस्या उद्भवते.

२. इलेक्ट्रॉनिक गेम्सचा विचारक्षमतेवर प्रभाव पडत असल्याने,ते प्रत्यक्ष मैदानी खेळातील चूरस अनुभवत नाहीत. यामुळे, त्यांच्या मानसिकतेचा परिपूर्ण विकास होत नाही.

३. पर्याय निवडण्याची सवय झाल्याने, ते स्वत:हून नव्या पर्यायांची निर्मिती करीत नाहीत. यामुळे त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटीची कमतरता जाणवते.

४. बसल्या जागी मनोरंजन झाल्याने, शरीराची हालचाल होत नाही. नियमित व्यायाम करण्याची सवय नसल्याने स्थूलतेसोबत आळसही वाढतो.

५. ऍक्शनगेम्समधील आक्रमकता रोजच्या जीवनातही अंगीकारली जाते. शाळेत, मित्रांसोबत मारामारीकिंवा भांडण करण्याचे प्रमाणही यामुळे वाढते.

६. सतत फोनकडे झुकलेली मान असल्याने, पाठीच्या कण्यावर ताण येऊन; लहान वयातच पाठदुखी, डोकेदुखी सारखे आजार सतावतात.

७. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे फोनवर सतत खेळल्याने मुलांचा आई वडिलांशी जास्त संवाद होत नाही. लहान वयातच त्यांचे स्वत:चे विश्व तयार होऊ लागते. मुले एकलकोंडी होत जातात व पालकांपासून दूरावतात. स्मार्ट फोन वापरणा-या स्मार्टमुलांचे कौतुक नक्कीच वाटते.

आजच्या टेक्नो जगात मुलांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवणे शक्य नसले, तरी छोट्यांच्या आरोग्याचा प्रश्न समोर आला, की कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद आई बाबांमध्ये संचारते, हेही तितकेच खरे!त्यामुळे, मोबाईल त्यांच्या हातून हिसकावून न घेता, मोबाईल वापरण्याची पद्धत, नियमावली, योग्य अयोग्य गोष्टी त्यांना नीट समजावून सांगायला हव्यात. माहितीपर अॅप्स, वेबसाईट्सचा बौद्धिकवाढीच्या दृष्टिने वापर करण्यास शिकवावे किंवामोबाईलशिवाय विरंगुळ्याच्या आणखी पर्यायांची ओळख करुन देता येईल.लहान मुलांची नाराजी न ओढवून घेता, स्मार्टफोनच्या विळख्यातून त्यांची मायेने सोडवणूक करायला हवी.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares