Car Safety seat (2)

लहान मुलांसोबत कारने प्रवास करताना!

सुरक्षेची हमी असेल, तर प्रवासाचा आनंद निर्धास्तपणे लुटता येतो. मग वाहन कुठलेही का असेना, वेळ मजेत जातोच. मात्र, बच्चे कंपनीची थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. लहान मुल सोबत असले की, त्यांना गर्दीचा, दुषित हवेचा त्रास होऊ नये, म्हणून पिकनिक किंवा अगदी शॉपिंगला जाताना आपण कारने जाणे पसंत करतो. पण जबाबदारी इथेच संपत नाही, तर पुढे कारमधली सुरक्षा पाहावी लागते.
कारला सीट बेल्ट असतो, पण छोट्यांची उंची, शरीरयष्टी विचारत घेऊन खास ‘कार सेफ्टी सीट्स’ बनवल्या गेल्या आहेत. छान मऊ मऊ, सुंदर रंग, छोटे सीट बेल्ट, डोक्याला, मानेला झटका लागू नये म्हणून साईड सपोर्टने परिपूर्ण अशा सेफ्टी सीटचा वापर करायलाच हवा. ही सीट विकत घेताना पुढील टिप्स लक्षात ठेवा.

निवड:

या सेफ्टी सीटचे ५ ते ६ प्रकार उपलब्ध आहेत. वय, उंची, शरीरयष्टी लक्षात घेऊन त्यानुसार योग्य सीट निवडावी.

जागा:

इथे लहान मुलांची इच्छा जाणून घ्या. त्यांच्या पसंतीनुसार शक्यतो मागच्या सीटवर डाव्या किंवा उजव्या बाजूला ही सीट ठेवता येईल.

दिशा:

ही सीट सरळ किंवा पुढील सीटला पाठमोरी अशी बसवता येते. १ ते २ वर्षापर्यंतच्या मुलांना उलट्या दिशेले बसवणे अधिक योग्य ठरते. सीटला पाय टेकवून बसणे त्यांना सोयीचे जाते आणि त्यापेक्षा वयानो मोठ्या असणा-यांसाठी सीट नेहमीच्या सीट्स प्रमाणेच सरळ ठेवावी.

तपासणी:

दिलेल्या सूचनांप्रमाणे सेफ्टी सीट लावून झाल्यानंतर ती योग्य पद्धतीने लावली आहे की नाही; हे तपासताना त्या सीटला हलवून पाहावे. कारण, व्यवस्थित बसवलेली सेफ्टी सीट आपल्या जागेवरुन इंचापेक्षा कमी हलते. हे लक्षात ठेवावे.

सीट बेल्ट:

सेफ्टी सीट बेल्ट जास्त किंवा घट्ट होऊ नयेत म्हणून, त्याचे बेल्ट खांद्याला व छातीला लावून झाल्यानंतर ते बेल्ट हलकेच दुमडून पाहावेत. त्यांना दुबड येत नसल्यास ते योग्य बसले आहेत असे समजावे.

या सीट्सच्या किंमती २,५००/- पासून सुरु असून, यामध्ये बॅकलेस असे सीट बुस्टर देखील उपलब्ध आहे. ज्याची किंमत साधारण १,५००/- इतकी आहे. मुलांच्या सुरक्षेपुढे पालक किंमतीला फारसे महत्त्व देत नाहीत, हेही तितकेच खरे. तेव्हा, लहानग्यांसोबत कारने प्रवास करताना या सेफ्टी सीटचा वापर जरुर करा.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares