sticker

लेबलवरील चिन्हांचा अर्थ काय?

खरेदी केलेल्या कपड्यांवर विविध चिन्हे रेखाटलेले एक लेबल हमखास असते, ते लेबल  नीट समजून घेतल्यास विकत घेतलेला कपडा दिर्घकाळ नीटनेटका ठेवता येईल. कारण, कपड्याचा पोत व प्रकारानुसार त्या कपड्याच्या स्वच्छतेबाबत तिथे चिन्हांकीत सूचना दिलेल्या असतात. ज्या प्रत्येकाला तंतोतंत ठाऊक असण्याची शक्यता कमी असते. ज्याचा परिणाम कपडा चुकीच्या पद्धतीने धुताला किंवा इस्त्री केला जातो. आजचा लेख वाचल्यानंतर यापुढे अशी चूक बिलकूल घडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.

wash-iocn-1

टबमध्ये पाण्यात बुडवलेल्या हाताचे चिन्ह ते कपडे फक्त हातानीच धुवावेत हे दर्शवते. ते वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यास
कपडा खराब होण्याची शक्यता असते. कुंदन केलेले कपडे, जाळीदार किंवा नाजूक सिल्कच्या कपड्यांवर असे चिन्ह असते.

पाण्याने भरलेल्या टबवर चुकूची खूण केली असल्यास असा कपडा धुण्यायोग्य नाही, हे लक्षात घ्यावे. लोकरीच्या किंवा काही सिल्कच्या कपड्यांनाचा पाण्याशी संपर्क आल्यास कपडा लवकर खराब होतो.

फक्त पाण्याने भरलेले टब दाखवले असल्यास याचा अर्थ असे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुण्यास काहीच हरकत नाही.

चौथे चिन्ह पिळलेल्या कपड्याप्रमाणे दिसते. तसेच, त्यावर फुल्ली देखील केलेली आहे. यावरुन, सहज स्पष्ट होते की तत्सम कपडा धुतल्यानंतर पिळू नये. असेच पाणी निथळू द्यावे.

 

wash-iocn-2

 

इथे आपल्याला दिसेल, टबमध्ये पाणी आहे त्यात एक ठिपका, पुढच्याच चित्रात एकाऐवजी दोन ठिपके दिसतायत. हे ठिपके पाण्याचे तापमान दर्शवतात. एक ठिपका म्हणजे थंड पाण्यात कपडा धुवावा, तर जसजसे टबमधील ठिपक्यांचे प्रमाण वाढलेले दिसेल, त्याचा अर्थ तो कपडा तितक्या कोमट किंवा गरम पाण्यात धुता येईल, तो खराब होण्याची भिती नाही.

तिसरे चिन्ह आहे, एक साधा त्रिकोण, जो ब्लीच कपड्यास ब्लीच करता येईल हे दर्शवतोय. तर, त्याच त्रिकोणावर फुल्ली असल्यास समजावे, की या कपड्यास ब्लीच करणे योग्य नाही.

 

wash-iocn-5

 

समजून घेण्यास सोप्पे जाईल असे हे इस्त्रीचे चिन्ह! ठिपक्याविना दाखवलेली इस्त्री दर्शवते, की त्या कपड्यास इस्त्री करता येईल. तर इस्त्रीच्या मध्यभागी असलेल्या ठिपक्यांची संख्या तिचे तापमान दर्शवते.

जितके ठिपके जास्त तितकी इस्त्री अधिक तापमानास ठेवली तरी चालेल.

चौथे चिन्ह तुमच्या लक्षात आलेच असेल, इस्त्रीवर फुल्ली म्हणजे संबंधिक कपड्यास इस्त्रीच करु नये.

 

wash-iocn-4

 

वरील, तक्त्यातील पहिले चिन्ह ड्रायरच्या वापरासंबधी सूचना करते. चौकोनात वर्तुळ व त्यामध्ये एक ठिपका म्हणजे कपडा कमी तापमानात ड्रायरमध्ये सुकवता येईल. तर, वर्तुळामध्ये दोन ठिपके दर्शवल्यास मध्यम तापमान व तीन ठिपके दर्शवल्यास जास्त तापमान. तर, पुढील दोन चिन्हे ड्रायक्लिनिंगचे प्रकार दर्शवतात. अनुक्रमे, Perchloro व petroleum ड्रायक्लिनिंग असा त्या चिन्हांचा अर्थ आहे.

wash-iocn-3

वरील तक्त्यातील तिसरे वर्तुळाचे चिन्ह कपड्याला ड्रायक्लिन करण्यास सांगतेय, तर चौथे चिन्ह ड्रायक्लिन न करण्याची सूचना देते. कपडे धुण्याच्या पद्धती इतकीच महत्त्वाचे आहे, ते कपडे योग्यरित्या वाळवणे. पहिले चिन्ह कपडा सावलीत वाळवण्यास सांगतेय, तर चौकोनात तीन समान अंतरावरील रेषा कपड्यांमधील निथळत ठेवावेत व तसेच सुकू द्यावेत असे दर्शवते.

कपड्यांना आतील बाजूने लावलेल्या लेबलवरील या चिन्हांनुसार कपड्यांची काळजी घेतल्यास तो कपडा लवकर खराब होत नाही. तो छान नव्यासारखा राहतो. ज्यामुळे, दिर्घकाळ वापरताही येतो.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares