anjir banner

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त अंजीर!

ताजे अंजीर जितके स्वादिष्ट लागते, तितकेच सुकवलेल्या अंजीराच्य चक्त्याही चवीला मस्त लागतात. वजन कमी करण्यासाठी ही अंजीराचे हे दोन्ही प्रकार फायदेशीर ठरतात. साखरेऐवजी हे गोड फळ केक, पुडींगमध्ये सहज वापरता येतं.
अंजीरमध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असतं. अंजीर खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. सतत भूक लागत नाही व अतिरिक्त खाण्यावर नियंत्रण राहतं.

बरेचदा, पोटातील अन्नाचे नीट पचन न झाल्याने ते सतत साठून राहून त्याचे चरबीत रुपांतर होते. लठ्ठपणामागील ह्या एका महत्त्वाच्या कारणावर उपाय म्हणून अंजीर कार्य करते. अंजीर हे फळ पचनसंस्थेचे कार्य सुधारते. कॅल्शियम, पोटॅशिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, कॉपर तसेच, ए व बी जीवनसत्त्वेही अंजीरात असल्यानं शरीरातील चयापचन क्रिया सुरळीत राहते.

नियमित व्यायाम करत असाल तर, तुमच्या आहारात अंजीराचा आवर्जून समावेश करा. अंजीरातील ऑमेगा-३ हे फॅटी ऍसिड व्यायामादरम्यान अधिकतम कॅलरिज बर्न करतात, तेही ह्रदयावर ताण पडू न देता. खुद्द अंजीरात फार कमी कॅलरीजचा साठा असल्याने, डाएट फूडमध्येही त्याचा समावेश केला जातो.

गोड आवडतं पण साखर किंवा साखरयुक्त पदार्थ खाणं नको वाटतं. वजन वाढीच्या भितीने गोड खाणे टाळणा-यांसाठी अंजीर केव्हाही उत्तम! साखरला पर्याय म्हणून मध, गूळ निवडताना त्यामध्ये अंजीराचाही समावेश करता येईल. अंजीर चवीला गोड असल्यानं ते खाल्ल्यानंतर आणखी काही साखरयुक्त गोडाचे पदार्थ खाण्याचीही इच्छा होत नाही. पुन्हा एकप्रकारे वजन वाढीवर नियंत्रणच!

घरातील सर्व सदस्यांनी अंजीर आवर्जून खावं. कारण, हे फक्त वजन वाढीवर नियंत्रण ठेवत नाही, तर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. अंजीर थंड असल्यानं शरीरातील उष्णता कमी करण्याचे व रक्तशुद्धीकरणाचेही कार्य करते. अगदी टाचांना पडणा-या भेगांवर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास त्या भेगा लवकर भरुन येण्यासही मदत होते. पाहा तर, किती बहुगुणी आहे हे अंजीर!

More Articles
Designed and Developed by SocioSquares