scale (1)

वजन कमी करण्यास उपयुक्त फळे!

बैठ्या जीवनशैलीमुळे वजनदार होत जाणारी शरीरे व त्यावर आळसाचे होणारे आक्रमण! समस्या जाणवत तर असते, पण व्यायाम करणे कंटाळवाणे वाटते. कामाचा ताण, अपुरी झोप या सा-यात दिवसागणिक आपण फक्त गुरफटत जातो. यामधून स्वत:ची सुटका करायची असेल, तर किमान आहारात वजन कमी करण्यास सहाय्यक ठरणा-या फळांचा समावेश करण्यास सुरुवात करुया.

पेर: या फळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने, हे फळ खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. उगाचच जास्तीचे खाणे होत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. पेर नेहमी सालासकट खावे, अधिक उपयुक्त ठरते.

पपनस: चवीला छान आबंट गोड असणारं पपनस शरीराल सर्वोतोपरी लाभदायी ठरते. जसे, पचनशक्ती सुधारते, रक्ताभिसरण सुधारते, मासिक पाळी दरम्यास शरीरात लोहाची होणारी कमतरता भरुन काढते. हाडे मजबूत होतात आणि सर्वांत महत्त्वाचं वजन कमी करुन ते नियंत्रित राखण्यास पपनस उपयुक्त ठरते.

ऍव्होकॅडो: या परदेशी फळाचेही भरपूर फायदे आहेत. ई व क जीवनसत्त्व, तांबे, मॅग्नेशिअम, कर्बोदकांनी परिपूर्ण असणा-या ऍव्होकॅडोच्या सेवनाने सांधेदुखी कमी होते व शरीराचे वजनही. तेव्हा, हे फळ खाण्यात नियमितता जरुर ठेवावी.

पेरु: या फळाद्वारेही शरीराला फायबरचा पुरवठा होतो. पोट भरल्यासारखे राहते, त्यामुळे भूक कमी लागते. तसेच, पेरुमधील व्हिटॅमिन्स व कॅल्शिअम्स शरीरातील जास्तीची चरबी जाळण्यासाठी मदत करतात.

डाळींब: हे फळामुळए ह्ददयाचे आरोग्य सुधारते. तसेच, कर्करोग किंवा मघुमेहापासून चार हात लांब राहयचे तर डाळींब नियमित खावे. इतर फळांपेक्षा डाळींबात जास्त ऍन्टीऑक्सिडण्ट असतात. तेव्हा, वजन कमी होऊन त्वचा देखील तजेलदार राहते.

लिंबू: वजन कमी करण्यासाठी लिंबू व मधाच्या मिश्रणाइतकं उत्तम औषध नाही. सकाळी उठल्यावर थोड्या मधात लिंबाचे काही थेंब मिसळून घ्यावेत.

कलिंगड: हे उन्हाळी फळ खाण्याचा कंटाळा कधीही करु नये. या फळात कॅलरीज कमी असतात व पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, शरीरातातील पाण्याची पातळी संतुलित राहते व वजन कमी होण्यास मदत होते.

पोषक जीवनसत्त्वांची खाण असणारा फलाहार घेण्यास टाळाटाळ बिलकूल करु नये. कारण, प्रत्येक फळ शरीरासाठी या ना त्या प्रकारे फायदेशीरच ठरते. वरील फळे तर थेट वाढत्या वजनासारखा चिंतेचा प्रश्न सोडवण्यासाठी रामबाण उपाय ठरतात, त्यामुळे निश्चिंतपणे पोटभर खाताही येतात.

More Articles
Designed and Developed by SocioSquares