indian woman banner

वर्ष २०१७ मधील ८ जगजेत्या भारतीय महिला!!

जगभरातील महिला विविध क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध करण्याची चिकाटी बाळगून आहेत. दर दिवशी एक नवा विक्रम ‘ती’ स्वत:च्या नावे करते आहे. या चढाओढीत भारतीय महिलाही मागे नाहीत बरं!! आपल्या देशातील महिलाही पूर्ण जिद्दीने तिरंग्याची शान राखून आहेत, सातासमुद्रापार त्यांच्या प्रगतीचा जयघोष पोहोचतो आहे. २०१७ सालातील अशाच काही भारतीय यशस्वीनींविषयी जाणून घेऊ, ज्यांचे कतृर्त्व पाहून कुणीही थक्कच होईल.

मेरी कोम –

ऑलिंम्पिकचं कांस्यपदक व पाच वेळा जगज्जेतेपद पटकावणा-या मेरी कोमनं २०१७ साली आशियाई बॉक्सिंग अंजिक्यपद स्पर्धेद्वारे धडाकेबाद पुनरागमन केले. सर्वोत्तम खेळ सादर करीत मेरी कोमनं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील तिचे हे पाचवे सुवर्णपदक पदक असून, मेरी कोमनं भारतीय क्रिडाप्रेमींना दिलेल्या या सुवर्ण भेटीमुळे २०१७ साल नक्कीच अविस्मरणीय ठरले आहे.

MARY-COM

अंशु जमशेनपना –

एकदातरी माऊंट एव्हरेस्ट सर करावा, असे गिर्यारोहकांचे स्वप्न असते. भारताच्या पुर्वेकडे वसलेल्या अरुणाचल प्रदेशातील ३७ वर्षीय गिर्यारोहक ‘अंशु जमशेनपना’ हिनेही असेच स्वप्न पाहिले व पूर्णही केले. पण, फक्त एक दोनदा नाही, तर तब्बल चार वेळा ‘अंशु’ हिने यशस्वीरित्या माउंट एव्हरेस्ट सर केला. दोन मुलांची आई असणा-या अंशुने घर – संसाराच्या गराड्यात स्वत:च्या इच्छाशक्तीला तितकचे जपले, प्राधान्य दिले म्हणूनच चार वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारी ती जगातील पहिली महिला ठरली. २०१७ साली तिने चौथ्यांदा माऊंट एव्हरेस्ट सर केला.

ANSHU-JAMSENPANA

अनिता कुंडू –

हरियाणा येथे सबइनस्पेक्टर म्हणून कार्यरत असणारी ‘अनिता कुंडू ’ हिच्या नावे असणारा विक्रमही माऊंट एव्हरेस्टशी संबंधित आहे. चार वर्षांतून तिने दोनदा एव्हरेस्ट सर केला असून, भौगोलितदृष्ट्या चीनच्या बाजून एव्हरेस्टवर यशस्वीरित्या चढाई करणारी अनिता कुंडू पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिच्या ही विक्रमी कामगिरी खरेच कौतुकास्पद आहे.

ANITA-KUNDU

मानुषी छिल्लर –

२०१७ सालचा मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली भारतीय ‘ती’ ‘मानुषी छिल्लर’, आता विविध माध्यमांद्वारे घराघरात पोहोचलीये! थेट १७ वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय सौंदर्यवतीने मिस वर्ल्डचा मुकुट आपल्या नावे केला आहे. भारताचा अभिमान ठरलेल्या ‘मानुषी छिल्लर’चे मन:पूर्वक अभिनंदन!!

manushi-chiller

डॉ. निरु चढ्ढा –

इंटरनॅशनल ट्रायब्युनल फॉर द लॉ ऍण्ड सी या न्यायालयाच्या पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश होण्याचा मान भारतीय महिला डॉ. नीरु चढ्ढा यांनी मिळवला. सागरी कायदेविषयक तन्ज्ञ ‘डॉ.नीरु चढ्ढा २०१७ ते २०२६ पुढील ९ वर्ष न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील.

NEERU-CHADHA

भवानी देवी –

मे, २०१७ मध्ये आइसलॅंड येथील रेकजाविक येथे पार पडलेल्या तुरनोई सॅटलाईट तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात सी.ए.भवानीदेवी हिने सुवर्णपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भवानीदेवी पहिली भारतीय ठरली आहे. तिच्या या ऐतिहासिक खेळीने तुरनोई सॅटलाईट तलवारबाजी सारख्या खेळात भारताला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

BHAVANI-DEVI

पूजा ठाकूर –

गेल्या वर्षी राष्ट्रपती भवनात बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी देण्यात आलेल्या ‘गार्ड ऑफ ऑनर’चे नेतृत्व विंग कमांडर ‘पूजा ठाकूर’ने केले. प्रथमच एका महिलेस ‘गार्ड ऑफ ऑनर’चे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. महिला – पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता, व्यक्तिच्या योग्यतेनुसार जबाबदारी देण्याची ही पद्धत स्वागतार्ह आहेच. ‘गार्ड ऑफ ऑनर’चे नेतृत्व यशस्वीरित्या पेलणा-या विंग कमांडर ‘पूजा ठाकूर’ यांनाही सॅल्यूट!!

PUJA-THAKUR

मन कौर –

१०१ वर्षीय भारतीय अॅथलॅट ‘मॅन कौर’ यांनी जमिनीपासून शंभराहून अधिक फुटांवर स्कायवॉक करीत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. न्यीझीलंडच्या ऑकलंडच्या वर्ल्ड मास्टर गेम्समध्ये त्यांनी ही कामगिरी केली. त्यांची जिद्द इतक्यावरच थांबत नाही, तर १००मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतही त्या सहभागी झाल्या, तसेच भालाफेक व गोळाफेक स्पर्धेतही त्यांनी सहभाग नोंदवला. अशा, फिट अॅण्ड हिट आजींना खरेच सलाम!!

MANN-KAUR

देशातील कोनाकोपा-यांतून, लहानशा गावांतून आर्थिक परिस्थितीवर मात करीत यशाचे शिखर गाठलेल्या या निवडक महिला! मात्र, अभिमानास्पद कामगिरी करणा-या आणखी कित्येक महिला नवनव्या क्षेत्रांत विश्वविक्रमांची नोंद करीत, पहिले स्थान पटकावीत आहेत. त्या सर्व स्त्रीयांच्या अजोड मेहनीतस, ध्येयवेड्या चिकाटीस झी मराठी जागृतीचा सादर प्रणाम!!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares