women 2018 (1)

वर्ष २०१८ गाजविणा-या या ‘८’ कतृत्त्ववान महिला! 

भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवत, २०१८ या वर्षात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावीत अशी त्यांच्या कार्ये आपण याची देही योची डोळा पाहिली! त्यापैकी काही निवडक महिलांच्या तेजपुंज कामगिरीच आढावा घेऊ व अभिमानानं म्हणूया ‘जय हिंद’!

हिमा दास

आसाम येथील एका खेडेगावातील रहिवासी असणारी हिमा दास! घरची परिस्थीती बेताचीच, पण आपल्या अपार मेहनतीच्या बळावर तिने ऍथलेटिक्स बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले. IAAF वर्ल्ड अंडर २० ऍथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये ४०० मी. फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावत हिमाने इतिहास रचला व देशभरातून कौतुकाची थाप मिळवली. हिमा तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

women 2018 (2)

मिथाली राज

आपल्या उत्तुंग कामगिरीने भारतीय क्रिकेटप्रेमींना महिला क्रिकेटपटूंची दखल घेण्यास भाग पाडणारी मिथाली राज. तिच्या कारकिर्दीत महिला क्रिकेट संघाने तब्बल दोनवेळा टी-२० विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली, तसेच २०१८ साली तिने टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. ही विक्रमी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलीय, तर जगभरातून सातवी महिला क्रिकेटपटू ठरलीय. पुरुषांच्या तोडीसतोड फलंदाजी करणा-या मिताली राज तुझ्या कामगिरीस सलाम!

women 2018 (6)

इरम हबीब

जम्मू काश्मिर राज्यातील पहिली मुस्लिम महिला पायलट इरम हबीब!  कायम वादग्रस्त घटनांसाठी चर्चेत असणा-या जम्मू काश्मिर राज्यात घडलेल्या या सुखद घटनेकडे कानाडोळा करुन कसं चालेल. स्वप्रदेशातील विविध प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बालपणापासून मनी बाळगलेले पायलट बनण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्णत्वास नेत घेतलेल्या भरारीचे मन:पूर्वक कौतुक!

women 2018 (3)

विजी पेनकुट्टू

आपल्या सामाजिक कार्यान्वये केरळ राज्यातील महिलांना स्वअधिकाराची जाणीव करुन देत, त्यांना संघटीत करणा-या सामाजिक कार्यकर्त्या विजी पेनकुट्टू. वय वर्ष ५०, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उर्जा तरुणांनाही लाजवेल अशी आहे. विजीताईंनी तेथील महिला कर्मचा-यांना त्यांच्यावर होणा-या अप्रत्यक्ष शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रवृत्त केले. याचाच परिणाम म्हणजे, तेथील महिला कर्मचा-यांना आता कामाच्या वेळेत विश्रांती घेण्याची मुभा मिळाली आहे. हा लढा वाटतो तितका सोप्पा नाही, देशभरातील महिलांना एकीच्या ताकदीचं महत्त्व पटवून देणा-या विजीताईंच्या कार्य अजोड आहे.

women 2018

मेरी कोम

कसं व कुठल्या शब्दांत मेरी कोमच्या अविश्वसनीय कामगिरीचं कौतुक करावं? जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत तब्बल सहावे सुवर्ण पटकावत मेरी कोमने विश्वविक्रम रचला. खेळावरील प्रेम व जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर तिने नंबर वन बॉक्सरचा किताब मिळवलाय. तुझी पदकांची कमाई अशीच अखंड सुरु राहो, याच सदिच्छा!

women 2018 (5)

प्रिती हरमन

अमेरीकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या संस्थे मार्फत विविध क्षेत्रात अद्वितीय कार्य करणा-या व्यक्तींस फेलोशिपसाठी निवडले असून, १९१ देशांमधून २०,००० जणांनी या फेलोशिसाठी अर्ज केला होता. त्यातून २० जण निवडले गेले व यामध्येच प्रिती हरमन या भारतकन्येचाही समावेश आहे. ‘चेंज डॉट ओआरजी’ हे तिने जगभरातील व्यक्तिंसाठी खुले केलेले व्यासपीठ असून, इथे कुणीही कुठल्याही विषयावर मोहीम राबवू शकतं. देशोदेशी इतके मानसिक, सामाजिक, आर्थिक, प्रांतिक समस्या क्षणाक्षणाला डोके वर काढत असतात, की त्याविरुद्ध खुलेपणाने बोलणं हीच काळजी गरज आहे व प्रितीने ते अचूक जाणलेय.

women 2018 (7)

राहीबाई पोपेरे

अहमदनगर जिल्ह्यात कोंभाळणे गावात राहणा-या राहीबाईंचे कार्य ख-या सोन्यागत लखाखणारी आहे. जुन्या बी-बियांची साठवणूक करत, त्यांनी गावात सीड बॅंक सुरु केली. हायब्रिड आहाराचे शरीरावर होणारे दुष्परिणाम त्यांनी जोखले आणि जुनी अस्सल पिकं घेण्यास सुरुवात केली, वर इतरांसाठी त्याची बियाणे स्वरुपात जपणूकही करु लागल्या. ५३ पिकांचे ११४ गावरान वाण त्यांच्या संग्रही आहेत. जुनं ते सोनं या उत्कीला साजेसं व्रत अंगिकारणा-या राहीबाईंच्या बॅंकेचे महत्त्व प्रत्येकाला उमजो, व राहीबाईंचे आरोग्यदायी जीवनशैलीचे उद्दीष्ट्य साध्य होवो.

women 2018 (8)

मेनका गुरुस्वामी

women 2018 (4)

एकेकाळी महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते, मात्र आज तिच भूमी या महिलांनी गगनाला घातलेली गवसणी अभिमानानं न्याहाळतेय, निरनिराळ्या क्षेत्रांत आपल्या अपूर्व कामगिरीने झळकलेल्या या स्त्री व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा! सुरु झालेले नववर्षही अशाच गौरवशाली महिलांच्या कथांनी भारलेले राहील, यात शंकाच नाही.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares