bag banner

वापरुया स्टाईलीश कापडी पिशव्या!

प्रत्येक गोष्टीला स्वत:चा हटके अंदाज देण्याचे काम आपल्याला मस्त जमते, तेव्हा कापडी पिशव्यांचा वापरही जरा स्टाईलमध्ये करुया! आजचा ब्लॉग प्रपंच खास त्याच निमित्ताने!

लंच बॅग:

टिफीन बॉक्स नेण्यासाठी अशी देखणी कापडी बॅग वापरता येईल. टिफीनच्या आकारानुसार बॅगचा लहान मोठा आकार निवडता येतो.

Cotton bags (5)

 

मोंक बॅग:

ज्याला बटवा किंवा झोला स्टाईल असेही म्हणता येईल. तुम्ही घरच्याघरी जुन्या साड्या किंवा ड्रेसचे कापड वापरुन विविध रंगसंगतीचा मेळ साधणारी मोंक बॅग शिवता येईल.

Cotton bags (1)

ड्रॉस्ट्रिंग बॅग:

ही स्टाईल नवी नसली, तरी कॉटन बॅग्सबाबत ती पुन्हा ट्रेंडी होऊ पाहातेय. कॉलेजसाठी किंवा छोट्या पिकनिकचे सामान त्यात सहज राहते आणि दोरीच्या सहाय्याने तिला छान लॉकही करता येते.

Cotton bags (2)

मार्केट बॅग्स:

बाजारात जाताना आठवणीने कापडी पिशवी सोबत घेण्याची सवय आता प्रत्येकीने लावून घ्यायलाच हवी. खास मार्केट शॉपिंगसाठी डिझाईन केलेल्या या बॅग्स पाहाताच बाजारहाट करायला निघावेस वाटते. खोलगट सुबक आकारातली बॅग तुम्हालाही आवडली असेल ना?

Cotton bags (3)

पिरॅमिड बॅग:

तुम्हाला नावावरुन समजलंच असेल, ही बॅगचा आकार त्रिकोणी आहे. शिवायलाही फारशी कठीण नसणारी या बॅगेच्या एका काठावर चेन असते. तर त्याच चेनच्या सुरवातीला लूप दिलेला असतो. ज्यामुळे, बॅग हातात अडकवणे सोप्पे जाते. लहान मोठ्या आकारात पिरॅमिड बॅग उपलब्ध असून, पर्स किंवा कॅरी बॅग म्हणूनही ती वापरता येते.

Cotton bags (4)

मैत्रिणींनो, प्लॅस्टिकला नामोरहण करायचेच, अशा निश्चयानेच उतरुया या युद्धात! किचनकाम, घरकाम, शॉपिंगमुळे आपला स्त्रियांचाच सगळ्यात जास्त प्लॅस्टिक पिशव्यांशी संबंध येत होता. आता, सक्ती झालीच आहे, तर मनापासून तिला स्विकारुया आणि वापरुया जरा स्टाईलीश कापडी पिशव्या!!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares