Summer snacks (1)

वाळवणीच्या ५ रेसिपी!

स्वादिष्ट पदार्थांवर ताव मारण्यासाठी खवय्यांना कुठलेही निमित्त चालते. सणसोहळा असो किंवा नसो, मेजवानी त्यांच्यापर्यंत व ते मेजवानीपर्यंत बरोबर पोहोचतात आणि अशा चवदार पदार्थांना हौशेने बनवणारे पाककलाकार तर  महाहौशीच! ते देखील वातावरण व जिन्नसांचा अचूक मेळ साधून वर्षभर विविध चवींची रेलचेल सुरु ठेवतात. त्याचाच एक नमुना वाळवणीच्या पदार्थांमार्फत लवकरच घरोघरी दिसू लागेल. यामध्ये भर म्हणून ऐन उन्हाळ्यात कराव्यात अशा काही वाळवणीच्या पदार्थांच्या रेसिपी पुढे देत आहोत.

चुरमु-याचे पापड:

साहित्य – चुरमुरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, धणे, जिरेपूड, आले, लसूण, मीठ

पाककृती – प्रथम तीन तास चुरमुरे पाण्यात भिजत ठेवावेत. त्यानंतर, ते गाळून त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आले पेस्ट घालावी.

तसेच, धणे-जिरेपूड व चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस नीट एकजीव करुन घ्यावेत. तयार मिश्रणाचे लहान गोळे करुन त्याचे प्लॅस्टिकवर पापड लाटून घ्यावेत.

केळीच्या चकल्या:

साहित्य – एक डझन केळी, एक वाटी साबुदाणा, हिरवी मिरची, जीरे, मीठ

पाककृती –  प्रथम कच्ची केळी शिजवून घ्यावीत. गार झाल्यावर केळीची साले काढून घ्यावीत. शिजवलेली केळी पुरणयंत्रात किंवा मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावीत. एक वाटी भिजवलेला साबुदाणा त्यामध्ये मिसळावा. या मिश्रणात हिरव्या मिरचीची पेस्ट, जिरेपूड व मीठ घालून सर्व मिश्रण नीट एकत्र करुन घ्यावे. आता, तयार मिश्रणाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर चकल्या पाडाव्यात व उन्हात छान सुकवून घ्याव्यात. केळीच्या बरेच दिवस टिकून रहातात.

डाळींचे सांडगे:

साहित्य – १/२ किलो चणा डाळ, १ वाटी मटकीची डाळ, १ वाटी उडीद डाळ, १ वाटी मूग डाळ, २-३ लाल तिखट, हळद, २ चमचे हिंग, ३ चमचे मीठ, ४ चमचे जिरे

पाककृती – सर्व डाळी दोन तास भिजत घालाव्यात. नंतर, भिजवलेल्या डाळींमध्ये जिरे मिसळून त्या हलक्याशा जाडसर वाटून घ्याव्यात. आता यामध्ये लाल तिखट, हळद, हिंग, मीठ असे जिन्नस मिसळून तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे घालून कपड्यावर सुकवण्यास ठेवावेत. कडक उन्हात नीट सांडगे नीट वाळले, की हवाबंद बरणीत भरुन ठेवावेत. हे सांडगे वर्षभर छान टिकतात. सांडग्यांची आमटी करता येते, किंवा नुसते तळूनही खाता येतात.

या उन्हाळ्यात वरील रेसिपीज नक्की करुन पाहा, त्या कशा झाल्या तेही कळवा आणि तुमच्याजवळ अशा काही चविष्ट रेसिपीज् असतील तर त्या खालील कमेन्टबॉक्समध्ये लिहा.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares