jhulan banner

विश्वविक्रमी एक्स्प्रेस झुलन गोस्वामी!

भारतीय महिला क्रिकेटपटू ‘झुलन गोस्वामी’ वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. दक्षिण भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तिने संघाला विजयी केलेच, सोबत आपल्या गोलंदाजी कौशल्याने जागतिक विक्रमही रचला. तिने १५३ वन डे सामन्यांत एकूण १८१ बळी मिळवत आतंरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान पटकावले आहे. ३४ वर्षीय झुलन मागील १६ वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वोत्तम खेळीचा एक्का म्हणून ओळखली जाते.

जगभरातील गल्लोगल्लीत क्रिकेट खेळले जात असले, तरी महिलांचे क्रिकेट सामने व त्यामध्ये जिवतोड मेहनत घेणा-या महिला खेळाडू तितक्या प्रकाशझोतात येत नाहीत. ग्लॅमरची पर्वा न करता देशासाठी उत्तम खेळी करण्याचा ध्यास घेतलेल्या या ख-या क्रिकेटप्रेमी! झुलनने आपल्या विक्रमी कामगिरीने सिद्ध केले आहे, की महिला क्रिकेटर्स हे देखील एक उत्तम करियर बनू शकते.

पश्चिम बंगालमधील नादिया येथील रहिवासी असणा-या झुलनला लहानवयातच क्रिकेटचे वेड लागले. अपु-या सोयींमुळे सरावासाठी दररोज ट्रेनने नादियाहून दक्षिण कोलकात्यापर्यंतचे अंतर पार करीत विवेकानंद पार्कपर्यंत तिला यावे लागे. गरिबीला मेहनतीचे उत्तर देत टप्प्याटप्प्याने स्वत:च्या क्रिकेटप्रेमास आकार देत गेली.

करियरच्या सुरुवातीच्या काळात, गोलंदाजी अतिशय हळू करते अशी टिकाही तिच्यावर झाली. मात्र, खचून न जाता अखंड मेहनतीतून अचूक गोलंदाजीची कला अवगत केली. आज हिच गुणी खेळाडू जागतिक पातळीवर वेगवान गोलंदाजांच्या यादीत अग्रणी आहे.
क्रिकेटमध्ये करियर करु इच्छिणा-या तरुणींसमोरील आदर्श व समस्त भारतीयांना अभिमान वाटावा असे नादिया एक्स्प्रेस म्हणजे झुलन गोस्वामी हिचे व्यक्तिमत्त्व, तिच्या उत्तुंग कामगिरीस सलाम!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares