Waxing Banner

वॅक्स करताय… मग हे वाचाच!

पार्लर निवडताना आपण फारच चोखंदळ असतो. ते घराजवळ व बजेटमध्ये बसणारं हवं असतं. अशावेळी, हायफाय पार्लरपेक्षा लहानशी घरगुती पार्लर अधिक सोयीची ठरतात. कुठल्याही ब्युटी ट्रिटमेंटसाठी हीच पार्लरवाली ठरलेली असते. आकाराने व बजेटने लहान असणा-या पार्लरमधील व्यक्ती विश्वासार्ह असल्या, तरी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावीच लागते. मुख्यत्वे वॅक्सिंग करण्याआधी तुमच्या पार्लरवालीस हे प्रश्न विचारा!

1. वॅक्सिंग करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य स्वच्छ आहे का?
वॅक्सिंगचे साहित्य थेट त्वेचवर वापरले जात असल्याने त्यांच्या स्वच्छतेबाबत अधिक सतर्क रहावे. जेल वॅक्सिंगसाठी वापरले जाणारे भांडे स्वच्छ असावे. जेल लावण्यासाठी वापरली जाणारी वस्तूही तितकीच नेटकी असावी.

2. प्रत्येकीस धुतलेले किंवा नवीन कपडे दिले जातात का?
मोठी ब्युटीपार्लर्स, शक्यतो प्रत्येकीसाठी धुतलेले कपडे वापरतात. मात्र, लहान पार्लर्सना ते शक्य होत नाही. पाणी, क्रिम, घाम लागून अस्वच्छ झालेले तेच कपडे पुन्हा पुन्हा वापरल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो. म्हणूनच, किमान दोनदा वापरलेले कपडे पुन्हा वापरण्यास देणे अयोग्य ठरते.

3. चादर किंवा खुर्च्यांची कव्हर्स किती दिवसांनी बदलता?
पार्लरमधील वातावरण फ्रेश व उत्साही असणे आवश्यक असते. विविध क्रिम्स व पाण्याच्या सततच्या वापराने तयार झालेला कूबट वास दूर करण्यासाठी चादर किंवा खुर्च्यांची कव्हर्स किमान दोन तीन दिवसांनी बदलायला हवीत.

4. दिले जाणारे टॉवेल्स धुतलेले आहेत का?
पार्लरमध्ये पाण्याचा भरपूर वापर होत असल्याने, सतत टॉवेल्सचीही गरज भासते. अशावेळी, दिवसभर मोजक्याच टॉवेल्सचा सतत वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरते. एकदा वापरलेला टॉवेल सुकवून पुन्हा पुन्हा वापरणे शरीराच्या नाजूक त्वचेसाठी घातक ठरते.

पार्लरमध्ये अनेक महिलांचा सतत वावर सुरु असतो. प्रत्येकीसाठी नवीन कपडे किंवा साहित्य वापरणे शक्य नसले, तरी कमी बजेट असणारी छोटी पार्लर्ल्स स्वच्छतेवर नक्कीच भर देऊ शकतात. येणा-या गि-हाईकांच्या आरोग्याचा विचार व्हायला हवा, मात्र आपणही स्वत:च्या निरोगी जीवनासाठी असे प्रश्न विचारण्याचे धाडसही करायला हवे!

More Articles
Designed and Developed by SocioSquares