momos banner

व्हेज मोमोज!

साहित्य
(पारीसाठी)- २ वाट्या मैदा, अर्धा टि.स्पू. बेकिंग पावडर, १/२ टि.स्पू. मीठ, २ टि.स्पू. तेल
(सारणासाठी)- १ टि.स्पू तेल, अर्धी वाटी कोबी, अर्धी वाटी गाजर, १ मोठा कांदा, १ भोपळी मिरची, ६ ते ७ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, १ हिरवी मिरची, मिरपूड, मीठ, सोयासॉस

पाककृती
• मैद्यामध्ये तेल, मीठ, बेकिंग पावडर घालून हे मिश्रण नीट भिजवून घ्यावे.
• कढईत प्रथम कांदा, आले, मिरची तेलावर परतून घ्यावी. नंतर त्यामध्ये बारीक चिरुन घेतलेल्या सर्व भाज्या परतून घ्याव्यात, आता त्यामध्ये मीठ, मिरपूड व सोयासॉस घालून सर्व मिश्रण एका भाड्यांमध्ये काढून गार होण्यास ठेवावे.
• आता, भिजलेल्या मैद्याचे पुरीप्रमाणे छोटे गोळे करुन ते पातळ लाटून घ्यावेत.
• या पुरीमध्ये तयार सारण भरुन लहान लहान चुण्या घेऊन पुरीचे तोंड बंद करावे.
• अशाप्रक्रारे सर्व मोमोज भरुन तयार झाले, की कूकर किंवा इडली पात्रात मोमोज उकडून घ्यावेत.
• आता, गरमागरम मोमोज शेजवान सॉससोबत सर्व्ह करावेत.

‘व्हेज मोमोज’ नक्की करुन पाहा व सांगा हे मोमोज आणखी चविष्ट करण्यासाठी आणखी कुठले जिन्नस वापरता येतील? द्या तुमची उत्तरे खालील कमेन्टबॉक्समध्ये,

Image Source- http://bit.ly/2uL3dZd

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares