law banner

संपत्तीच्या अधिकारातील ‘ती’!

जीवनभर माणसांच्या गोतावळ्यात राहून, नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी मान अपमानांचा आवंढा गिळणारी हसतमुख ‘ती’! समाजाने आखून दिलेल्या चौकटीलाच जग समजणा-या तिला शिक्षणाने स्वावलंबनाचे धडे दिले. गृहिणी नोकरदार वर्गात मोडू लागली, पण आजही स्वयंपाक ते मुलांच्या संगोपनापर्यंत सारी कामे स्त्रिची म्हणूनच ओळखली जातात.

बहुतांश स्त्रिया शिक्षित असूनही नोकरी न करता, घर व मुलांसाठी संपूर्णवेळ गृहिणी रहाण्याचा मार्ग स्विकारतात. नोकरी करुन स्वावलंबी झालेल्या महिला ग्रेट आहेतच, पण घरासाठी स्वप्नांना मुरड घालणा-या गृहिणींचा दिनक्रम न थांबणारा आहे.

घरातील कामे बायकांची असे मानले जात असले, तरी कायद्यामध्ये घरातील कामे पती व पत्नी या दोघांची जबाबदारी आहे; असे म्हटले आहे. याचअंतर्गत वैवाहिक घर, घरातील वस्तू, लग्नानंतर कमवलेली संपत्ती, दागिने यावर पती व पत्नी दोघांचा अधिकार आहे. न्यूझीलंडमध्ये नातेसंबंधांतील मालमत्ता कायद्याअनुसार समलिंगी जोडप्यासही समान अधिकार देण्यात आले आहेत.

जगभरातील देशांत पती पत्नीस समान अधिकारांचा कायदा दिला आहे, त्याचप्रमाणे आपल्या भारतीय न्यायवेवस्थेतही अशा तरतुदींचा समावेश आहे. घरकाम, मुलांचे संगोपन, घरातील सदस्यांची काळजी हे सारे विनावेतन करणा-या पत्नीमुळे संपत्तीत मोलाची भर पडते. म्हणूनच, अविरत कार्य करणा-या पत्नीस व नोकरी करणा-या पतीस न्यायदेवतेने समान पातळीवर ठेवले आहे. वैवाहिक मालमत्ता किंवा तिने अर्थार्जनाची संधी सोडून गृहिणीचा पर्याय निवडल्याने तिच्या कष्टांची जाण ठेवून समान अधिकार देणारे विधेयक महिलावर्गास माहित हवे.
know
घरगुती व्यवसायातून स्वावलंबी बनू पहाणा-या गृहिणींना पाठिंब्याचे पाठबळ हवे असते. घराच्या भविष्यासाठी स्वत:च्या भविष्याचा स्वतंत्र्य विचार न करणा-या तिला समान नजरेतून पाहूया! ख-या अर्थाने ‘फूल टाईम जॉब’ करणा-या गृहिणींच्या निस्वार्थ भूमिकेचा आदर राखून, तिच्या न संपणा-या घरकामाचा थोडा भारही उचलूया, ज्यामुळे आठवड्यातून एक हक्काचा संडे तिलाही मिळेल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares