fashionsss (1)

साडीहून देखणा फॅशनेबल ब्लाऊज!

साडी महागडी असो किंवा साधी तिच्यावर स्टाईलिश ब्लाऊज शिवल्याच, साडीचे रुपडे क्षणात बदलते. नखरेल ब्लाऊजच्या सतराशेसाठ अदा फॅशनवर्ल्डमध्ये सध्या ट्रेंडी आहेत. पारंपारिक सोहळ्यांपासून पार्टीवेअरपर्यंत त-हेत-हेचे ब्लाऊज शिवता येतील. तेव्हा पुढीलवेळी अशा स्टाईल्सचे ब्लाऊज शिवून पहाच!

कॉटन साडीवर काही ऍबस्ट्रॅक प्रिंट असणा-या ब्लाऊजचा विचार करत असाल, तर खालील फोटोतील स्टाईल छान जाईल.

saree fashion (3)

कॉलेजमधील रेट्रो ट्रे किंवा पार्टीची थीम रेट्रो असल्यास, प्रथम नजरेसमोर येतं फ्लोरल प्रिंट. तेव्हा, संपूर्ण साडी एकाच रंगातील असेल, तर अशाप्रकारे तिच्यावर फ्लोरल ब्लाऊज शिवल्यास मस्त रेट्रो लूक मिळेल.

saree fashion (2)

बहुतांश साड्यांवर मिक्स मॅच करताना काळ्या रंगाचा ब्लाऊज छान जातो. त्यामुळे, गळ्याभोवती नाजूकशी पट्टी देत, अशाप्रकारे हटक्या त-हेने ब्लाऊज शिवून घेता येईल.

saree fashion (4)

ब्लाऊजला मागे नाजूकशी नॉट देण्याची फॅशन फार जुनी आहे आणि ती आजही सर्रास दिसते. पण, वरील नॉटव्यतिरिक्त आणखी एक नॉट ब्लाईजच्या मागील बाजून खालच्या काठाला देऊन पाहा, फार गोड दिसेल.

saree fashion (5)

समोरुन क्रॉप टॉप सारखा, पण मागून छान त्रिकोणी आकाराचा कट असणारा हटक्या त-हेचा ब्लाऊज कुठल्याही रंगसंगतीत शोभून दिसेल.

saree fashion (6)

नेट साड्यांनतर नेट ब्लाऊजची फॅशनही तरुणींमध्ये हिट आहे. पार्टीवेअर म्हणून नेट ब्लाऊजचा पर्याय निवडत असाल, तर प्लेन साडीवर नेट ब्लाऊज शिवताना नेटवर बारीक वर्क असण्यास पसंती द्या. लांब हात, मागून गोलाकार किंवा कुठलाही आवडीनुसार हवा तो कट द्या. शोभून दिसेल यात शंकाच नाही.

saree fashion (7)

मैत्रिणींनो, या स्टाईल्स तुम्हाल कशा वाटल्या जरुर कळवा आणि काही आणखी स्टाईल्स तुमच्याजवळ असतील तर त्याही झी जागृतीच्या मैत्रिणींसाठी शेअर करा खालील कमेन्टबॉक्समध्ये!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares