Saree care (1)

साड्यांचे आयुष्य वाढवतील ‘हे’ उपाय!

साड्या आपला जीव की प्राण! विविध प्रकारच्या व रंगाचा मेळ साधणा-या साड्यांची मौलिक ठेव प्रत्येकीचे वॉर्डरॉब सजवते. नव्या फॅशनचा पगडा कितीही भारी असला, तरी परंपरेचा बाज सांभळणारी साडी निव्वळ अप्रतिम! जशा ती नेसण्याच्या खास पद्धती, तशाच तिची काळजी घेण्याचे नखरेही हजार! तेच जाणून घेणार आहोत आज,

  1. नक्षीकाम केलेल्या साड्यांना विशेष जपावे लागते. अश साड्या धुताना जास्त पिळून घेऊ नयेत. अशाने त्यावरील जरीचे काम, मणी टिकल्यांचे कोंदण निघू शकते.
  2. अशा साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यास, ब्रशने घासल्यास लवकर खराब होतात. म्हणून, हलक्या हाताने नीट विसळून घ्याव्यात.
  3. साधारण दोनदा साडी वापरल्यानंतर ड्रायक्लीनला द्यावी.
  4. साड्या सावलीत सुकवाव्यात, यामुळे साडीची चमक टिकून रहाते.
  5. साडीबॅगमध्ये साड्या ठेवण्याआधी प्रत्येक साडी तपकिरी रंगाच्या कागदात गुंडाळावी. यामुळे, हवेतील दमटपणा कागद सोशून घेतो व साडी सुरक्षित रहाते.
  6. जरीच्या साड्या मलमलच्या किंवा कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवल्या त्यावरील जरीचे काम छान टिकते.
  7. सिल्कच्या साडीवर थेट डिओचा वापर करु नये. कारण, साडीवर डिओचे डाग पडण्याची शक्यता असते.
  8. वरचेवर न वापरल्या जाणा-या साड्या, वॉर्डरॉब स्वच्छ करताना किमान त्या कोरड्या हवेत उघडून ठेवाव्यात.
  9. बरेचदा साडी घडी झालेल्या रेषेवर फाटते, यासाठी काही महिन्यांच्या अंतरानी साड्यांची घडी बदलावी.
  10. कपाटात कडुलिंबाची पाने ठेवावीत, ज्यामुळे कपाटातील कुबटपणा दूर होऊन, कपड्याला बुरशी येऊन कपडा खराब होत नाही.

मैत्रिणींनो, साड्या नेसणे सोप्पे आहे, पण त्या वर्षानुवर्षे नीट जपून ठेवणे कठीण आहे. वरील टिप्स तुमच्या सुंदरशा साडी कलेक्शनची छान काळजी घेतील. तुम्हाला वरील माहिती कशी वाटली ते नक्की कळवा व साड्यांविषयी आणखी काय जाणून घेण्यास आवडेल तेही सांगा!!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares