Surlichya vadya (1)

सुरळीच्या वड्या!

‘सुरळीच्या वड्या’ किंवा ‘खांडवी’ या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ ब्रेकफास्टसाठी एक उत्तम पर्याय असून, बनवण्यास सोप्पा व वेळखाऊ देखील नाही. लहान थोरांना आवडतील अशा झटपट बनणा-या ‘सुरळीच्या वड्या’ आता घरच्याघरी!

सुरळीच्या वड्या –
साहित्य – १ वाटी बेसन, १ वाटी आंबट ताक, १ वाटी पाणी, पाऊण चमचा मिरचीचा ठेचा, १ लहान चमचा हळद, १/२ लहान चमचा हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, खवणलेले खोबरे, मीठ
फोडणीसाठी – २ चमचे तेल, मोहोरी, चिमूटभर हिंग, हळद, कढीपत्ता

पाककृती- प्रथम बेसन, ताक, पाणी एकत्र करुन घ्यावे. पीठाच्या गुठल्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नंतर यामध्ये, मिरचीचा ठेचा, हळद, हिंग व चवीपुरता मीठ घालावे.
तयार मिश्रण कढईत घेऊन मध्यम आचेवर शिजवून घ्यावे (गुठळ्या होऊ नयेत यासाठी मिश्रणास सतत ढवळत रहावे) व दाटसर झाल्यावर गॅस बंद करावा.
गरम असतानाच मिश्रणाचा पातळ थर स्टीलच्या ताटावर मागाच्या बाजूला पसरावा.
आता फोडणीसाठी, दुस-या कढईत तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी द्यावी व ताटावरील मिश्रणावर पसरावी. त्यावर ओले खोबरे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सुरीने ५ इंचाच्या पट्ट्या कापाव्यात व त्याची सुरळी करुन त्याचे ३ ते ४ भाग करावेत. आता, तयार सुरळीच्या वड्या कोथिंबीरेने सजवून चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह कराव्यात.

नक्की बनवून पाहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares