MILETRY (1)

सैन्यातील करिअर संधी तिच्यासाठी!

बुद्धी व शक्ती दोन्हीत पुरुषांच्या तोडीसतोड कामगिरी करणारी आजची स्त्री, करिअरची नवनवी क्षेत्रे मोठ्या जिद्दीनं निवडते आणि त्यात स्वत:चा ठसा उमटवतेच. मागील काही वर्षांचा आलेख पाहता शालांत परिक्षा असोत वा महाविद्यालयीन अथवा स्पर्धा परिक्षा, बहुतांश ठिकाणी मुलीच अव्वल क्रमांक पटकावताना दिसतात. एकेकाळी शिक्षणाचा हक्क नाकारला गेलेल्या स्त्रीवर्गाचं, आता विविध क्षेत्रातील खवखवीत यश पाहता डोळे दिपून जातात.

कला, क्रिडा, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्र कुठलंही असो, ती स्वत:च्या आवडीला महत्त्व देतेय आणि पालकांचाही तिला तितकाचा पाठींबा मिळातो. म्हणूनच, देशसेवेचे व्रत घेऊन सैनिकी क्षेत्रात भरती होण्याचा धाडसी विचारही ती बिनधास्तपणे करते. चूल आणि मूल एकूणच कुटुंब संसाराच्या विळख्यात न अडकता वर्तमानातील ती स्वतंत्र्यपणे स्वकरिअरचा निर्णय घेण्याची ताकद बाळगून आहे, त्याचेच हे द्योतक!

देशावर अफाट प्रेम, धाडस व परोकोटीची चिकाटी, सकारात्मक जिद्द, सुदृढ शरीर या प्राथमिक बाबी जिच्याजवळ आहेत, ती सैनिकी क्षेत्राचा विचार नक्कीच करेल. या क्षेत्रात करिअर करु इच्छिणा-या तरुणींना साधारण पुढील परिक्षा तसेच मुलाखत प्रक्रियेतून यशस्वीरित्या पार होणे आवश्यक आहे.

 शॉर्ट सर्व्हिस कमिशद्वारे घेतली जाणारी परिक्षा उत्तीर्ण होणे उमेदवारासाठी आवश्यक असते. दहावी, बारावी तसेच, कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी अशा कुठल्याही क्षेत्रातील पदवीप्राप्त विद्यार्थी सैन्यदलात भर्ती होण्यासाठी पात्र असतो. मात्र, त्याचसोबत शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणेही तितकेच महत्तम आहे.

महाविद्यालयीन स्तरावर एनसीसी पूर्ण केलेल्या तरुणींनाही सेनादलात प्रवेशाची संधी आहे. तसेच, बी.एस.सी वा एम.एस.सी झालेली उमेदवारही मिलेट्री नर्सिंग सर्व्हिसेसद्वारे सेनादलात प्रवेश घेऊ शकता. थेट सीमेवर जाऊन लढण्याव्यतिरिक्तही अनेक विभागांत कार्य करुन देशसेवेचे स्वप्न पूर्ण करता येईल. या क्षेत्रासाठीची पात्रता परिक्षा, प्रवेश परिक्षा, त्यांच्या तारखा, विविध विभागांतील संधी, अशी सविस्तर माहिती या – www.joinindianarmy.nic.in  संकेतस्थळावर तुम्ही वाचू शकता.

More Articles
Designed and Developed by SocioSquares