Breast feeding (1)

स्तनपान देताना ‘या’ चूका करु नयेत!

नवजात शिशुसाठी आईचे दूध अमृतासमान असते. स्तनपानाची प्रक्रिया योग्यरित्या व काळजीपूर्वक पार पडायला हवी. यासाठी प्रत्येक नवमातेने पुढील ५ गोष्टी नीट लक्षाच ठेवायला हव्यात.

  • सुरुवातीला येणारे चिकाचे दूध-

प्रसुतीनंतर सुरुवातीचे काही दिवस मातेला चिकाचे दूध येते. हे दूध बाळासाठी आवश्यक असून, त्याऐवजी बाळाला दुसरे काहीही पिण्याची आवश्यकता नसते. जंतूसंसर्ग व त्वचारोगांपासून संरक्षण करणारे घटक याच दूधामार्फत बाळापर्यंत पोहोचतात.

  • स्तनपानाच्या वेळा-

दिवसातून किमान १० ते १२ वेळा बाळाला दूध पाजावे. जितके स्तनपान अधिक तितकी दूधाची निर्मितीही अधिक होते. जे मातेच्याही आरोग्यासाठी लाभदायी ठरते. बाळाला इतर पोषकद्रव्ये देणे सुरु केल्यानंतरही किमान दोन वर्षे बाळाला आईचे दूध मिळणे गरजेचे आहे.

  • स्वच्छता –

स्तनपान करण्यापूर्वी प्रत्येकवेळी मातेने स्वच्छ हात धुवावेत. नवजात बाळ सतत आईच्या सानिध्यात असते, यासाठीच आईचे स्वाथ्य प्रथम निरोगी असायला हवे. प्रत्येक लहान सहान वस्तू हाताळताना स्वच्छतेबाबत काटेकोर असावे.

  • अतिरिक्त दूध-

अतिरिक्त दूध साठलेल्या अवस्थेच बाळाला स्तनपान करु नये. कारण, बाळ दुधाचा अतिरिक्त वेग सहन करु शकत नाही. यासाठी थोडे दूध प्रथम काढून घ्यावे.

  • नोकरी करणारी माता-

नवजात बाळ जितक्यावेळ आईसोबत राहील, तितके कमीच असते. गृहिणी बाळाला पूर्णवेळ देऊ शकतात. मात्र नोकरी करणा-या स्त्रियांना ठराविक काळानंतर पुन्हा कामावर रुजू व्हावे लागते. अशावेळी बाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन जाणे शक्य नसेल, तर किमान दूधाचे योग्य नियोजन करुन ठेवायला हवे.

अशाप्रकारे, बाळाला स्तनपान करतेवेळी विशेष काळजी घ्यायला हवी, सोबत आणखी एक बाब लक्षात ठेवावी, ती म्हणजे दूध पाजताना आईच्या मनात कायम सकारात्मक विचार असावेत. कारण, आई व बाळाला मनाने बांधणारी ही स्तनपानाची प्रक्रिया आंतर्बाह्य निरोगी असणे आवश्यक आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares