ADAVANCE COURSE (1)

स्त्रियांसाठी आधुनिक कोर्सेस!

Career साठी वेगवेगळे पर्याय आज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि महत्त्वाकांक्षा वाढवणाऱ्या Courses ची संख्या आणि त्या अनुषंगाने मागणी देखील वाढत असल्याचे चित्र आहे.

अशाच काही आधुनिक कोर्सेसबद्दल जाणून घेऊयात –

1. Human Resource
साध्या IT क्षेत्र आणि खासगी क्षेत्राला मिळणारा वाव यामुळे मानवी संसाधन विभाग म्हणजेच Human resource Department मोठ्या प्रमाणावर विस्तारत चालल्याचे चित्र आहे. याला अनुसरुन diploma अभ्यासक्रम आज उपलब्ध झाले आहेत.

2. Interior Designing
गृहसजावटीची जाण स्त्रियांना उत्तम असते. हीच आवड आपले Career घडवू शकते. घर किंवा कोणत्याही गोष्टीची बांधणी, सजावट, त्यासंबंधी मार्गदर्शन घेण्याकडे लोकांचा ओढा वाढत आहे. हीच मागणी लक्षात घेऊन Interior Designing चा विचार आपण करू शकतो.

3. Social work
मदत करण्याची आणि सेवाभावी वृत्ती स्त्रियांमध्ये असतेच. हीच गोष्ट आपल्याला Career साठी देखील उपयोगी पडू शकते. आजकाल Social work कडे सकारात्मकतेने पाहिले जात आहे.

4. Hospitality
विविध क्षेत्रात Hospitality साठी आज महिलांचा सक्रिय सहभाग आहे. ‘Incredible India’ या मुळे असंख्य पर्यटक आज आकर्षित होत आहेत म्हणून या क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे.

तुमच्या career च्या दृष्टीने वाटचाल करण्याची ही सुरुवात असेल आणि चौकटीपलीकडे जाऊन आपले स्थान निर्माण करायचे असेल तर असे काही पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता.

More Articles
Designed and Developed by SocioSquares