stressfree (1)

हवे ताणमुक्त जीवन, तर करा या पदार्थांचे सेवन…

आजकाल सर्व वयोगटाच्या व्यक्तिंस ताणाची समस्या भेडसावत असते. शाळेत जाणा-या मुलामुलींनाही अभ्यास, स्पर्धा परिक्षा इतक कलात्मक पर्यायांत प्राविण्य मिळवण्याची धडपड असते. तर, मोठ्यांना नोकरी व्यवसायात उच्चपदापर्यंतचा प्रवास करण्याची आस. वृद्धमंडळींना विविध आजार सतावतात. एकूणच प्रत्येकरामागे काही ना काही ब्याद कायम लागलेलीच. या सा-याचा मनावर अतिरिक्त ताण येऊन नकळत शरीरावरही त्याचे दुष्परिणाम होतात. यासाठी, प्रथम मनावरील ताण दूर व्हायला हवा, ज्याचा मार्ग पोटातून जातोय. आहारात पुढील पदार्थांचा समावेश करा व निरोगी ताणमुक्त जीवन जगण्याभर द्या.

लसूण

भारतीय जेवणात सर्रास वापरला जाणारा लसूण तसा उग्र वासाचा व उष्ण. घरगुती उपायांद्वारे खोकला सर्दी सारख्या आजारांवर तो आराम देतोच. पण, विविध पदार्थांत चिमटीभर जरी मिसळला तरी संपूर्ण शरीराला ऊर्जा बहाल करण्यात त्याचा हातभार लागतो व उच्च रक्तदाबाच्या समस्येसही चारहात लांब ठेवतो. मिळालेली शारीरिक ऊर्जा मानसिक ताण दूर करण्यासाठीही उपयुक्त ठरते.

दही

कामाची चिंता वा इतर समस्यांवरील सततच्या विचाराने ग्रासला असाल, तर कॅल्शियम, प्रथिनेयुक्त दह्याचे सेवन जरुर करावे. या जिन्नसातील घटक मनावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हल्ली दह्याचे विविध स्वादही उपलब्ध आहेत.

बदाम

बदाम फक्त स्मरणशक्ती तल्लख बनवत नाही, तर शरीर व मन ताणरहित रहावे यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावते. बदामातील व्हिटॅमिन बीटू, व्हिटॅमिन इ व मॅग्नेशिअम सारखे घटक अस्थिर मनस्थितीला स्थिरता देण्याचे काम करतात, ज्यामुळे विचारांचा उगाचाच ताण जाणवत नाही.

नारळ पाणी

आजारी व्यक्तिस डॉक्टर नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात, हे तुम्हाला ठाऊक असेलच. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुख्यत्वे नारळपाणी उपयुक्त ठरते. तसेच, शरीराला ऊर्जा प्रदान करणारे नारळपाणी मानसिक व शारीरिक ताण दूर करणारे सशक्त पेय आहे.

डार्क चॉकलेट

दात किडतील किंवा वजन वाढेल म्हणून चॉकलेट न खाणं योग्य असलं, तरी प्रमाणात डार्क चॉकलेट खाणं शरीरासाठी आरोग्यदायी ठरतं हे देखील तितकेच खरं. आठवड्यातून किमान एकदा डार्क चॉकलेटचे दोन ते तीन लहान चौकोनी तुकडे आवर्जून खावेत.

मानसिक ताण दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आणखी काही पदार्थ तुम्हाला ठाऊक असतील, तर जरुर लिहा लेखाखालील comment box मध्ये!

More Articles
Designed and Developed by SocioSquares