rain rain (1)

हाकेच्या अंतरावर पावसाळी टूर!

उन्हाच्या तडाख्यास शांत करणा-या गारेगार सरी बरसू लागल्या, की रखरखीत झालेल्या डोंगर द-या, पठारे हलक्या हलक्या अंकुरांनी फुलू लागतात. भर पावसात थंड हवेच्या ठिकाणी जाणं आनंददायी असतंच, पण काळ्या, तपकिरी मातीत दिसणारे हिरवे ठिपके डोळे भरुन पहायचे असतील तर मुसळधार पाऊस सुरु होण्यापूर्वी जवळच्याजवळ तरी दोन-तीन ट्रिप्स करायलाच हव्यात.

मुसळधार पावसानंतर पाऊलवाटांवर चिखल वाढतो, वाहत्या पाण्यामुळे दगड गुळगुळीत होतात. अशावेळी उंचावर ट्रेकींला जाणे जरा धोक्याचे असते. हातापायांना चढताना नीट पकड मिळत नाही, पाय मातीत रुततात, तोल जातो अशा दृष्ट शक्यता टाळण्यासाठीच तान्ह्या पावसात भटकायला निघणे केव्हाही उत्तम! आजच्या लेखात सुचवलेली ठिकाणे नेमकी अशीच आहेत. छान मस्त झटपट उरकता येतील अशी!

दूरशेट –

खोपोली स्टेशनपासून १८ किमी. अंतरावर सह्याद्रि रांगांमध्ये दूर‘शेट’ विसावले आहेत. तसेच, लोणावळा व खंडाळा स्टेशन्सपासून दूरशेट अनुक्रमे ३३ किमी. व ३० किमी. अंतरावर आहे. येथूनही दूरशेट गाठता येईल, पण खोपोलीवरुन रिक्षा किंवा बसने दूरशेटला पोहोचणेच जास्त सोयीचे ठरते.

कोलाड –

काही ऍडव्हेचरस करायची इच्छा असेल, तर रायगड जिल्ह्यातील कोलाडला नक्की जा. इथे कायाकिंग, राफ्टिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंगचा अनुभव घेता येईस. यापलिकडे, इथे दोन रात्री स्टे करत ताला वा गोशाला किल्ला, भिरा तसेच, ढोलवाल धरण व ताम्हिणी, कानसाय धबधब्याला भेट देत निसर्गाचा जवळून आस्वाद घेता येईल. सध्या तरुणाई खास रिव्हर राफ्टिंगसाठी कोलाडला मोठ्या प्रमाणात हजेरी लावते.

गड किल्ले-

बारा महिने तेरा काळ, ट्रेकर्सना आकर्षित करणारे गड पावसाळ्यात अधिक देखणे दिसतात. यंदाच्या पावसात उंचावरील गड किल्ले सर करण्याच्या विचारात असात, तर ट्रेकिंगसाठी निवडलेल्या किल्ल्याची वाट चालायला सुरक्षित असेल याची खात्री करुन घ्या. जेणेकरुन पावसाळ्यात गुळगुळीत होणा-या दगड वाटांमुळे पडणे झडपडणे टाळता येईल. चढायला प्रचंड अवघड नसलेले असे प्रबळ गड, हरिश्चंद्र गड, माणिक गड, टकमक गड, राजगड, विसापूर किंवा लोहगड येत्या विकेंड स्पेशल बकेट लिस्टमध्ये असूद्यात.

 ऍग्रो टूरिझम –

शहरापासून काही अंतरावर वसलेली लहान सहान गावांत एग्रो टुरिझम नावी संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजतेय. शेतं, फळबागा, कौलारु घरं,  बैलगाडीची सफर, झुणका भाकरी सारखा फक्कड बेत आणि जोडीला भरपूर ऍक्टिव्हिटिज्! अशा भन्नाट आनंदाने परिपूर्ण असं ऍग्रो टुरिझम किंवा फार्म स्टे कौटुंबिक सहलीसाठी उत्तम पर्याय ठरतात. जरुर विचार करा.

पावसाळी पिकनिकविषयी तुम्हाला काही सविस्तर माहिती हवी असल्यास नक्की लिहा तुमचे प्रश्न खालील comment box मध्ये! आजचा लेख ‘प्रवास’ कसा वाटला तेही कळवा बरं आठवणीने…

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares