emergency call banners

हे नंबर सेव्ह करा स्व-सुरक्षेखातर…!

मुलभूत गरजांत अलिखितरित्या मोबाईलचा समावेश झाला आहे. कदाचित हे यंत्र न वापरणारी स्त्री शोधूनही सापडायची नाही. शालेय वयापासूनच मुलामुलींच्या हातात स्वत:चा असा स्वतंत्र्य मोबाईल सर्रास दिसतो. तर, सुरकुतले हातही “हे आपल्या जमान्याचं नाही” म्हणताना मोबाईल अस्खलित वापरायला शिकलेत. यामध्ये संपर्क क्रमांक नोंदवून ठेवता येत असल्याने ते तोंडपाठ असण्याची शक्यता आता तुरळक झाली आहे. एकाचवेळी कित्येक नातेवाईकांचे नंबर डोक्यात पक्के सेव्ह करणारा मेंदू, आता मुश्किलिने एखाद दुसरा मोबाईल क्रमांक लक्षात ठेवतो. यामुळे आपलेच मोठे नुकसान होते आहे. कधी अचानक फोन स्विचऑफ झाला किंवा हरवला, तर घरी कळवावं तर नंबर पाठ नसतात. अपघात, आपत्कालीन परिस्थितीत मदत मागायचा प्रसंग उद्भवल्यास ऐनवेळी सोप्प्या क्रमांकाचे हेल्पलाईन नंबर्स देखील आठवत नाहीत.

आजचा हा लेखप्रपंच खास यात समस्येवरचा तोडगा आहे. मैत्रिणींनो, कधी कुठला प्रसंग दत्त म्हणून समोर उभा ठाकेल काही सांगता येत नाही. म्हणूनच, किमान काही महत्त्वाचे निवडक हेल्पलाईन नंबर्स तरी प्रथम तोंडपाठ करा आणि मोबाईलमध्ये सेव्हसुद्धा करुन ठेवा.

१. कौटुंबिक छळ, हिंचाराविरोधात तक्रारीसाठी १८१ क्रमांकावर संपर्क साधवा. भारत देशातील कुठल्याही राज्यातील महिला या क्रमांकावर संपर्क साधू शकते.

२. पोलिस कंट्रोल रुमला संपर्क साधण्यासाठी १०० क्रमांक डायल करा.

३. लैगिंक अत्याचाराविरोधातील तक्रारींसाठी १०९१ या क्रमांकावर पिडीत महिला मदतीसाठी संपर्क साधू शकते.

४. विद्यार्थी किंवा बाल अत्याचार विरोधात तक्रार नोदंवण्यासाठी १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

५. हरवलेले बालक किंंवा स्त्रियांविषयीची तक्रार नोंदविण्यासाठी १०९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

६. मानसिक छळाविरोधात महिला मदतीसाठी संपर्क साधू शकतात ०११-२६९४२३६९, २६९४४७५४ या क्रमांकावर.

मैत्रिणींनो, हे  महत्त्वाचे संपर्क क्रमांक पक्के लक्षात ठेवा. आपल्या इतर सखींपर्यंत ही माहिती पोहोचवा.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares