screen time (1)

होईल स्क्रिन टाईम कमी, वेळ लागे सार्थकी!  

मोबाईल स्वत:चा स्क्रिन टाईन नोंदवूव ठेवू लागला हे एक बरं झालं. दिवसभर आपण कितीवेळ मोबाईलवर व्यतित केला हे चटदिशी समजते. तेही अगदी सविस्तर! कुठले ऍप्लिकेशन किती वेळ वापरले गेले, हे देखील अचूक कळते. सोशल मिडीआच्या वापराबाबतची निराळी नोंद तिथे दिलेली असते. तसेच,  दिवसागणिक व आठवड्याच्या वेळेची तुलनात्मक माहिती देखील दिली जाते. ज्यावरुन, कालच्यापेक्षा आज आपण मोबाईल जास्त हाताळला, की कमी हे आपल्या लक्षात येते. तुम्ही कधी पाहिलात का तुमच्या मोबाईलचा स्क्रिन टाईम? एकदा तपासाच आणि तो हळूहळू कमी होत जाईल याची काळजी घेण्याची मनोमन निश्चय करा.

कामानिमित्त मोबाईलचा वापर करणं चुकीचं बिलकूल नाही. पण, सोशल मिडीआ किंवा मनोरंजनपर ऍप्स, गेम्सच्या ऍप्लिकेशन्सवरुन कधी नोटिफिकेशन येत आणि आपल्याच नकळत आपलं लक्ष विचलित होऊन. आपण त्या काहितरी भलतेच वेळखाऊ स्क्रोलिंग करत बसतो. दुस-या नोटिफिकेशने किंवा आणखी कुठल्या कारणाने भानावर आलो, की महत्त्वाचं काम राहून गेल्याचं लक्षात येतं.

मोबाईल, टॅब सारखी टेक्नॉलॉजी हाताळताना हे असं भरकटणं फार वाईट. यामुळे, आपल्यातील चंचलवृत्ती बळावते. स्थिर चित्ताने काम करणे कमी होते. सतत चुळबूळ, हाताला चाळा. जरासा फावला वेळ मिळताच फोन शोधायला लागतो. इंटरनेटवर टाईमपास करतो किंवा तेच तेच फोटो पुन्हा पुन्हा पहात बसतो.

मनाला आळसाने ग्रासण्याचे प्रमाणही वाढते. बसल्याजागी मनोरंजनाचे हजार पर्याय समोर खुले असतात. शरीराला हालचालीच्या स्वाधीन न करण्याची जणू सवयच जडते. काढला पर्समधून मोबाईल की झाले ठप्प शरीर तिथल्यातिथे.

विचार करणे, मेंदूवर ताण देणे मंदावत जाते. पूर्वी एखादा संदर्भ आठवत नसला, की हे कित्येक तास त्याचा विचार डोक्यात घोळत रहायचा. आता, सर्च करुन मोकळे होतो. झटक्यात उत्तर सापडते आणि विषय संपतो. याचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, फोन नंबर्स लक्षात ठेवणे. पूर्वी किमान ३० ते ४० फोन नंबर्स सर्रास तोंडपाठ असायचे, हल्ली साधे घरातल्यांचे नंबर्स नीट पाठ नसतात. स्मरणशक्तीला बुरशीच्या विळख्यातून मुक्त करायचे असेल, प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक स्क्रिन टाईमिंग कमी करण्यावर भर द्यायला हवा. आपल्यापासून सुरुवात केली, तर पुढच्या पिढीपर्यंत योग्य सवयी पोहोचतील. मोबाईल गरजेपुरता वापरण्याचा महत्त्वाचा धडा नकळतपणे त्यांना देता येईल. घरातील लहान मुलंही तुमचच अनुकरण करीत असल्याने, त्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर करु नये. असे, जर तुम्हाला वाटत असेल; तर प्रथम घरातील पालक मंडळींना स्वत:बाबत हा बदल अमलात आणावा लागेल.

चला तर, करुया का संकल्प स्क्रिन टाईम कमी करण्याचा? नववर्षाचं निमित्त कशाला हवं. चांगल्या बदलासाठी मुहूर्ताची नाही, तर मुबलक निश्चयाची आवश्यकता असते. आहात का तयार तुम्ही? कळवा प्रतिक्रिया! कसा वाटला आजचा संकल्पदायी लेख?

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares