Rangpanchmi (1)

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने ‘जागृतीची नवी प्रेरणा’ !

सण म्हणजे स्त्रियांच्या आनंदाची पर्वणीच असते. रोजच्या त्याच त्याच दिनक्रमातून नवं चैतन्य फुलवण्यात हे सण महत्वाची भूमिका बजावतात.पण या सणाच्या निमित्ताने आपण नव्या गोष्टींचा स्वीकार देखील करू शकतो आणि इतरांना देखील त्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो. परंपरेला एका नव्या दृष्टीकोनाची जोड देऊन आपल्याला एक नवी प्रेरणा मिळू शकते. सणाचे दिवस साजरे करण्यासोबत हि प्रेरणा पुढेही आपल्याला वेगवेगळ्या कामात साथ देईल हे नक्की !

आता होळी रंगपंचमीच्या सणासाठी आपण सगळ्याजणी सज्ज आहोत. होळीच्या अग्नीमध्ये आपली नकारात्मकता नाहीशी करा आणि एका नव्या उन्मेदीने नव्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी स्वतःची तयारी करा. मानसिक दृष्ट्या रंगपंचमीला देखील महत्त्व आहे. आपल्या मनातले हेवेदावे, भांडणं याला पूर्णविराम देऊन सगळ्यांनी रंगांमध्ये एकसंध व्हावं, दूर गेलेली मनं या निमित्ताने पुन्हा जोडली जावी असा या मागचा हेतू आहे.

एक स्त्री म्हणून आपण यासाठीच प्रयत्न करुया आणि परंपरेसोबत सकारात्मक प्रेरणेने या सणाचा खरा गोडवा वाढवूया.

More Articles
Designed and Developed by SocioSquares