Banner 01

रेसिपी – रसमलाई

रेसिपी  – रसमलाई

सण सोहळ्यांच्या दिवसांत नैवेद्यासाठी काहितरी गोडधोड करावेच लागते. प्रत्येकवेळी त्याच त्याच पदार्थांना करणारा व खाणारा दोघेही कंटाळतात. म्हणूनच, काहितरी निराळा व झटपट बनणारा पदार्थ करण्याचा बेत आखत असाल, तर रसमलाई नक्की करुन पहा! खवय्ये खूष होतीलच आणि हा पदार्थ वेळखाऊ नसल्याने तुम्हीही खूष!

साहित्य –  १० तयार रसगुल्ले, १ लि.दूध, ३ टे.स्पू.साखर, ५ ते ६ पिस्ता

पाककृती-

  • प्रथम दूध मोठ्या पसरट भांड्यामध्ये आटवत ठेवावे.
  • हे दूध साधारण निम्मे झाले, की त्यामध्ये साखर मिसळावी.
  • साखर विरघळ्यावर गॅस बंद करावा.
  • रसगुल्ले तयार झाल्यावर, थोडे कोमट असताना तळव्याने जरासे दाबून त्यांना पसरट आकार द्यावा. हे गोळे गार झाल्यावर पाकातून काढून घ्यावेत.
  • वरील, दूध थंड झाल्यावर त्यामध्ये तयार रसगुल्ले सोडावेत व परुन पिस्त्याचे बारीक काप पसरवावेत.
  • रसमलाई फ्रिजमध्ये छान थंड करत ठेवावी व रसमलाई ही स्वीट डीश थंडगारच सर्व्ह करावी.

जर, तुमच्याकडे अशाच झटपट बनणा-या गोडाच्या रेसिपीज् असतील, तर नक्की शेअर करा ब्लॉगखालील कमेन्टबॉक्समध्ये…

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares