anarase (2)

रेसिपी – अनारसे

साहित्य – १/४ कि. तांदूळ, १/२ कि. गूळ, साजूक तूप, खसखस, तेल

पाककृती – अनारशासाठी शक्यतो जुना तांदूळ घ्यावा. हे तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावेत. दररोज त्यातील पाणी बदलावे. नंतर, धुवून, कोरडे करुन मिक्सरच्या सहाय्याने त्याचे पीठ करुन घ्यावे. पीठ चाळून घ्यावे. हे पीठ ओलसर व हाताला गार लागते. नंतर, त्यामध्ये गूळ घालावा. दोन वाट्या पीठास चार चमचे तूप या मापाने वरील मिश्रणात तूप घालावे. मिश्रण एकजीव करुन व्यवस्थित कुटून घ्यावे. त्याचे गोळे करुन डब्यात भरुन ठेवावेत. त्यानंतर, साधारण आठ – दहा दिवसांनी या पिठाचे अनारसे करावेत. आता, या पीठाचे पुरीसाठी घेतो तितके लहान गोळे करावेत. पुरीच्या आकाराइतकेच, मात्र जरा जाडसर थापावेत व त्याची एक बाजू खसखसमध्ये घोळवून घ्यावी आणि गरम तेलात अनारसा तळून घ्यावा. अनारसा तळताना खसखस लावलेली बाजू वर ठेवावी व त्यावर झा-याने हलके हलके तेल उडवावे. अनारसा उलटू नये. सर्व अनारसे तळून मग गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवावेत.

अनारसे आणखी चवदार तसेच, जाळीदार व्हावेत यासाठी तुमच्याजवळ काही उपयुक्त टिप्स असतील, तर झी मराठी जागृतीच्या मैत्रिणींसाठी नक्की शेअर करा पोस्ट खालील comment box मध्ये!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares