मेकअपसाठी फक्त महागडी सौंदर्यप्रसाधने उपयोगाची नाहीत, तर ती रीतसर वापरली जायला हवीत. कारण, चुकीच्या पद्धतीने मेकअप केल्यास सौंदर्य खुलण्याऐवजी ते बिघडण्यास अधिक हातभार लावतो. केलेला मेकअप जसाच्यातसा दिर्घकाळ चेह-यावर टिकून रहावा यासाठी खालील चुका कटाक्षाने टाळा!
1.डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे किंवा चेह-यावरील डाग लपविण्यासाठी कन्सिलर किंवा फांऊडेशन निवडताना त्वेचेशी मॅच होणा-या रंगाचेच निवडावे. असे न केल्यास, चेह-यावरली डाग अधिक हायलाईट होतात. थंडीच्या दिवसांत लिक्लिड कन्सिलर वापरावे यामुळे, मेकअपनंतरही त्वेचवरील ओलावा टिकून रहातो.
2. गडद रंगाची आयब्रोपेन्सिल न वापरता, फिकट रंगाची आयब्रोपेन्सिल निवडावी. आयब्रोज अशा हलकेच हायलाईट केल्यास उठून दिसतात.
3. डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास आय ग्लीटरपेक्षा मॅट शॅडोजचा वापर करावा. स्मोकी इफेक्ट डोळ्यांचे देखणेपण वाढवतो.
4. ब्लश चेह-यावर योग्य ठिकाणी लावले जाणे आवश्यक आहे, स्मितहास्य केल्यावर चीक बोन्स जिथे येतील त्या जागेवर फिकटसे ब्लश लावायला हवे.
5. लिपस्टिक लावल्यानंतर ओठांचा आकार नीट दिसावा, यासाठी लिप लायनरचा वापर करावा.
सोयीनुसार हव्या त्या ब्रॅंड्सची सौंदर्यप्रसाधने वापरा, मात्र ती निवडताना त्वचेचा पोत, रंग विचारात घेऊन स्वत:साठी परफेक्ट तेच निवड्यावर भर द्या. क्षणार्धात आपले सौंदर्य बहारदार करणारा मेकअप क्रमाक्रमाने व पद्धतशीर व्हायला हवा, तरच अपेक्षित परिणाम साधता येईल!