dal vada banner

रेसिपी – डाळवडे

रेसिपी – डाळवडे

साहित्य – १ वाटी हरभरा डाळ, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, ८ ते १० लसूण पाकळ्या, १ इंच आले, १/२ टि. हळद, १ टि. जीरे, १ टि. तीळ, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर बारीक चिरुन, तेल, मीठ

पाककृती –
• हरभरा डाळ धुवून २ ते ४ तास भिजवावी. या भिजलेल्या डाळीतून पाणी नीट निथळू द्यावे.

• यानंतर, हिरव्या मिरच्या, आले, लसूण, कढीपत्ता, मीठ एकत्र करुन मिक्सरमध्ये थोडे अर्धवट बारीक करुन घ्यावे. डाळ देखील अशीच बारीक करुन घ्यावी.

• भांड्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. त्यामध्ये मिरची पेस्ट व चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर, हळद, जिरे घालून मिश्रण नीट एकजीव करावे.

• प्लॅस्टिक पेपरवर जरासे तेल लावून, त्यावर जाडसर वडा थापावा. गरम तेलात मध्यम आचेवर डाळवडे तळून घ्यावेत.

• गरमागरम वडे तिखट हिरव्या किंवा चिंचेच्या आंबटगोड चटणी सोबत सर्व्ह करावेत.

तुम्हाला डाळवड्यांची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा, तुमच्या प्रतिक्रिया लिहा खालील कमेन्टबॉक्समध्ये!

Popular Posts
Banner 02
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquare