paneer cheeseball banner

रेसिपी – पनीर चीज बॉल्स

साहित्य- २०० ग्रॅ. किसलेले चीज, १/४ किलो पनीर, १/२ चमचा बेकिंग पावडर, ५–६ हिरव्या मिरच्या, ४ चमचे मैदा, कोथिंबीर, कॉर्नफ्लोअर, मीठ

पाककृती –
• चीज आणि पनीर बारीक किसून घ्यावे.

• त्यामध्ये बेकिंग पावडर, मैदा, मिरच्यांचे बारीक तुकडे, चिरलेली कोथिंबीर, मीठ घालून मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे.

• आता या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून घ्यावेत.

• हे गोळे कोरड्या कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून तेलात तळून घ्यावेत.

• असे झटपट तयार झालेले पनीर चीज बॉल्स गरमागरम सर्व्ह करावेत.

वरील रेसिपी नक्की करुन पाहा व कळवा तुमच्या प्रतिक्रिया या ब्लॉगखालील कमेन्टबॉक्समध्ये, तुमच्याजवळ अशा काही सोप्प्या रेसिपीज असतील तर त्याही शेअर करा आमच्यासोबत!

More Articles
Designed and Developed by SocioSquares