स्त्रियांचा कुठलाही वयोगट स्वत:च्या सौंदर्याकडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष देतो. आज हजारो सौंदर्य प्रसाधने बाजारात
उपलब्ध आहेत. त्यापैकी, स्वत:साठी योग्य ते निवडण्याच्या कलेत मैत्रिणीसुद्धा पटाईत आहेत. शाळेतील नकळत्या
वयापासून कॉलेज किंवा नोकरी करणा-या महिला कामात कितीही व्यस्त असल्या, तरी नवा ट्रेँड अचूक हेरतात.
त्याप्रमाणे स्वत:च्या नीटस दिसण्यावरही लक्ष देतात. आता, सर्वतोपरी छान दिसायचे तर पार्लरच्या वा-या ओघाने
आल्याच!
अगदी नखांचे सौंदर्य वाढविण्यासाठी नियमित मॅनिक्युअर किंवा पेडीक्युअर करण्याचा सल्ला दिला जातो. पण त्याआधी
जर घरच्याघरी नखांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तर!
1. तळहात, बोटे तसेच नखांमधील धूळीचे बारीक कण निघावेत यासाठी स्क्रबिंग करावे.
2. लिंबू, मध व साखरेचे मिश्रण स्क्रबर म्हणून वापरता येईल.
3. बोटांना, नखांना दुधाच्या सायीने मसाज करावा, यामुळे तेथील त्वचा तजेलदार होते.
4. तळहात तसेच बोटांना महिन्यातून एकदा दही – बेसन मिश्रणाचा लेप लावावा.
5. नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी लिंबाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे नखे बुडवून ठेवावीत. यानंतर,
नखांना फायलरने आकार द्यावा.
6. तुमचे हात जर सतत साबण, डिटर्जंटच्या सान्निध्यात येत असतील, तर रोज रात्री नखांना नारळाच्या तेलाने
मसाज करावा. यामुळे नखांमधील शुष्कपणा कमी होतो, ती मजबूत होतात.
7. लिंबाची साल नखावर घासल्याने नखे तुटण्याचे प्रमाण कमी होते.
8. नेलपेंट रिमूव्हरच्या सततच्या वापराने नखे कोरडी होतात. साधारण आठवड्यातून एकदा नेल रिमूव्हर
वापरावे.
9. नखांवरील नेलपेंट कधीही खरवडून काढू नये, यामुळे नखांवरील संरक्षणात्मक पेशी निघून जातात.
10. नखांना सतत नेलपेंट लावू नये, कधी मोकळेही राहू द्यावे. नखांना तसेच नखांखालील त्वचेस श्वास घेणे शक्य
होते.
मैत्रिणींनो, वरील टिप्सच्या मदतीने नखांची नीट काळजी घ्या व याशिवाय तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर जाणून
घ्यायला आवडेल, तेही लिहा खालील कमेन्टबॉक्समध्ये,