"I measure the progress of a community by
the degree of progress which women have achieved."
-Dr. B.R.Ambedkar
Zee Marathi Jagruti – An Initiative by Zee Marathi

Progress and empowerment can only come through accumulation of knowledge. The social fabric of the society is weaved around women and in order for the society to progress, it is imperative that women are the focal point around which it happens.

Zee Marathi Jagruti is an endeavour taken by Zee Marathi to carry forward this belief and make a positive difference. It aims to provide a platform for women to equip themselves with the tools to gain knowledge about things she could / should know. It’s a platform to inspire them to broaden their horizons and explore their potential to the fullest.

The philosophy behind the entire initiative is साथ स्वतःला स्वतःची implying that a woman should enable herself to break through any barriers or limitations that the society or she has created.

Our role in this process is to inspire women to join us in this movement of knowledge and awakening which will illuminate possibilities and avenues for them. This will help them live a healthier, happier, more secure, independent and confident life.

Amruta Subhash who is a leading Marathi film & television actress and has to her credit many columns and articles will be representing Zee Marathi Jagruti as its Brand Ambassador. Being a household name, she will be the friend and companion to every woman associating with Jagruti.

A slew of ground, online and mass media initiatives will be conducted under this umbrella with the intent of reaching out to women at large.

Several activities will be conducted across multiple cities in Maharashtra. These activities will cover fields as diverse as finance to legal to technology along with health and nutrition as well. The sole aim of these activities will be to equip women with knowledge of things which will enable them to have a better chance at the world outside.

‘जागृती’- साथ स्वतःला स्वतःची

आपल्या अनेकविध दर्जेदार कार्यक्रमांमधून महाराष्ट्रासह जगभरातील रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सर्वांची लाडकी वाहिनी म्हणजे झी मराठी. दैंनदिन मालिकांमधून मनोरंजनासोबतच सामाजिक भान जपत झी मराठीने अनेक उपक्रम राबविले. यातील महत्त्वाचं पाऊल म्हणजे उंच माझा झोका पुरस्कार. आपल्या असामान्य कर्तृत्वाने विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणा-या महिलांचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात आला. सामाजिक बांधिलकीची ही धुरा आता आणखी एका अनोख्या उपक्रमांतून पुढे नेण्यास झी मराठी वाहिनी सज्ज झाली आहे आणि या उपक्रमाचं नाव आहे ‘जागृती’..... ‘जागृती’ हा मंच असणार आहे समाजातील सर्वच स्तरांतील महिलांना त्यांच्या कार्यक्षमतेची जाणिव करून देणारा. महाराष्ट्रातील विविध शहरांमधून या उपक्रमाची सुरूवात होणार आहे.

‘साथ स्वतःला स्वतःची’ हे ब्रीद घेऊन जागृतीचा मंच विविध उपक्रम राबवणार आहे. स्त्रियांमधील सुप्त गुण ओळखून तिच्या प्रगतीसाठी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न जागृती करणार आहे. संसार ‘सांभाळण्याच्या’ जबाबदारीसोबतच आज स्त्रीने संसार ‘चालवण्याचीही’ जबाबदारी समर्थपणे उचलली आहे. परंतु ऑफिसच्या कामांना किंवा कुटुंबियांच्या गरजांना प्राधान्य देताना तिचा स्वतःच्या गोष्टींचा प्राधान्यक्रम कधी बदलून जातो हे तिलाही अनेकदा कळत नाही. ‘जागृती’ हा उपक्रम अशाच स्त्रियांकरिता उपयोगी ठरणार आहे. दैनंदिन आयुष्यात उपयोगी येणा-या छोट्या छोट्या बाबींपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंतची माहिती या उपक्रमातून बायकांना देण्यात येईल. ज्यामध्ये रेसिपीच्या टिप्सपासून रेस्टॉरंटच्या व्यवसायापर्यंतच्या गोष्टींचा समावेश असेल. यासोबतच दैनंदिन खर्च, त्याचे नियोजन, बचतीच्या टिप्स अशी विविध प्रकारची माहिती या उपक्रमातून महिलांना देण्यात येणार आहे. याशिवाय संगणक, लॅपटॉपसोबत इंटरनेट हाताळण्याचे प्रशिक्षण, ई बॅंकिंग, आरोग्यविषयक सल्ले, पर्यावरणाविषयक माहिती, शैक्षणिक माहिती, स्वसंरक्षण, कायदेविषयक सल्ले अशा विविध विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात येईल.

मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील अभिनेत्री अशी ओळख असणारी अमृता सुभाष जागृती उपक्रमाची राजदूत (ब्रॅंड अम्बॅसेडर) म्हणून सक्रिय सहभाग नोंदविणार आहे. जागृतीच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांद्वारे अमृता जागृतीच्या सभासदांशी संवाद साधेल.

Designed and Developed by SocioSquare