• confident banner

  प्रत्येक स्त्रिच्या निरीक्षण शक्तीस दाद द्यायला हवी. एखाद्या सोहळ्यात किंवा अगदी रस्त्यावरुन चालताना देखील शेजारून जाणारीनं काय घातलंय? ते तिला शोभतंय का? मग याआधी आपण हे कुठे पाहिलंय? आणि हे मला कसं दिसेल? असे एक ना अनेक प्रश्न मन बांधू लागतं. त्याला स्वत:च्याच समाधानकारक उत्तरांची जोड मिळत जाते. इतरांवर अशी टिका टिपणी करणं मजेशीर वाटत […]

 • KACHORI BANNER

  साहित्य- सारणासाठी: ५० ग्रॅ जाडे गाठे, ५० ग्रॅ. पापडी, १ टे.स्पू. तीळ, १ टि.स्पू बडीशेप, १ टि.स्पू धणे, १ टि.स्पू. साखर, चिंचेचा कोळ, मनुका, लालतिखट, मीठ. आवरणासाठी: २०० ग्रॅ. मैदा, ३ टे.स्पू. तेल, मीठ पाककृती- गाठे, पापडी, तीळ, बडीशेप, धणे, मीठ, लालतिखट मिक्सरमध्ये एकजीव करुन घ्यावेत. नंतर, त्यात साखर व चिंचेचा कोळ मिसळून पुन्हा मिक्सरच्या […]

 • pATICE (1)

  प्रत्येकजण आपापल्या सवयीनुसार काही पदार्थ उपवासाच्या दिवशी खाणे पसंत करतात, तर काही ते टाळतात. मात्र साबुदाणा, बटाटा, रताळे, राजगिरा अशा जिन्नसांपासून तयार केलेले पदार्थ मुख्यत्वे उपवासाला खाल्ले जातात. त्यात, कोथिंबीर किंवा पनीरचा समावेश करत असाल तर पुढील रेसिपी उपवासाच्या दिवशी बिनधास्त करता येईल. नाहितर इतर दिवशी नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफीन बॉक्ससाठी करता येईल. साहित्य– ४ […]

 • Papad roll (1)

  साहित्य: उडदाचे पापड, १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/२ वाटी उकडलेले मटारदाणे, १/२ वाटी खवणलेला नारळ, १/२ वाटी बारीक शेव, काजू व बेदाणे, ४ ते ५ हिरव्या मिरच्यांचे वाटण, एका लिंबाचा रस, साखर, मीठ, तळण्यासाठी तेल पाककृती: प्रथम उकडलेले मटारदाणे थोडे कुस्ककरुन त्यामध्ये पापडाचा चुरा टाकावा. आता वरील इतर सर्व जिन्नस छान एकजीव करुन घ्यावेत. त्या सारणाचे समान […]

 • joint family (1)

  समूहात राहणे माणूस प्राण्यास भयंकर आवडते. यातमधूनच जन्माला आलेली एकत्र कुटुंब पद्धती त्यानं स्विकारली, जी शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदली. सख्या नात्यांसोबत चुलतेही एकमेकाला धरुन राहीले, मात्र गरजा वाढल्या तशी तरुण मंडळी नोकरी धंद्यासाठी घरापासून दूर गेली. एका कुटुंबातून दहा लहान कुटुंब जन्मली, ती सर्वत्र विखुरली व सोयीनूसार हवी तिथे विसावली. अगदी उड्डाण करीत देशाबाहेरही स्थिरावली. पण, […]

 • READING STORIES (1)

  प्रांतानुरुप बदलणारी संस्कृती, भाषा कुठलीही असो, प्रत्येकीच्या मूळाशी कथांचा ठेवा असतोच. अनंत पिढ्यांना अंगाखांद्यावर खेळवणा-या या कथांचा प्रपंच समाजाशी आपली नाळ आजही जोडून आहे. त्यात लोककथा, दंतकथा, पौराणिक कथा, पंचतंत्र, इसापनिती अशा एक ना अनेक कथांचा समुच्चय आपल्याला पाहायला मिळतो. यांत्रिकतेचा वरदहस्त आपल्यावर नसताना, घराघरातून या कथांचे गुंजन नियमित व्हायचे. गप्पा, वाचन, थोडेफार बैठे खेळ […]

 • Bhaji Recipe (1)

  भाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्या, तरी नेहमीच्या भाज्यांचे त्याच  त्याच चवीचे पदार्थ करायचाही कंटाळा येतो आणि खायचाही. अशावेळी,  नकोशा भाज्यांचं काहितरी चविष्ट बनवायला हवं. तरचं, त्या आवडीनं पोटात जातील. म्हणूनच, घेऊन आलोय आजच्या चवदार रेसिपिज्… मेथी पुरी: साहित्य- मेथीची पानं, १/२ वाटी कणिक, १ चमचा चण्याचे पीठ, १ चमचा तांदळाचे पीठ, आलं लसूण पेस्ट, तीळ, ओवा, तिखट, मीठ, हळद, तेल, […]

 • Patolya (1)

  साहित्य: १ वाटी तांदळाचे पीठ, १ कप किसलेला नारळ, अर्धा कप गूळ, चिमूटभर वेलचीपूड, २ चमचे साजूक तूप, हळदीची ताजी पाने, चवीनुसार मीठ पाककृती: ओल्या नारळाचा किस, गूळ, वेलचीपूड एकत्र एका पॅनमध्ये शिजवून, मोदकासाठी करतो तसे सारण तयार करुन घ्यावे. आता, पातोळ्यांच्या आवरणासाठी एका भांड्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून, हळुहळू त्यात पाणी मिसळत […]

 • Chocolate Modak banner

  साहित्य – १/४ कप खवा, २ टि.स्पू. पिठी साखर, २ टि.स्पू. कोको पावडर पाककृती – खवा दीड मिनिटे मायक्रोव्हेवमध्ये साधारण तपकिरी रंगाचा होईस्तोवर गरम करुन घ्यावा. या दीड मिनिटात दर १५ सेकंदानी खवा ढवळून पुन्हा मायक्रोव्हेवमध्ये ठेवावा. असे केल्याने, संपूर्ण खवा नीट तपकिरी होईल. खवा थोडा निवळला, की त्यामध्ये पिठी साखर घालून मिश्रण नीट ढवळून […]

 • DRY NAILPAINT (1)

  नेलपेन्ट जितकं काळजीपूर्वक लावावं लागतं, त्याहून अधिक ते लावून झाल्यावर सुकेस्तोवर सांभाळावं लागतं. जरासं दुर्लक्ष झालं, तरी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! ओल्या नेलपेन्टवर नकळत आपल्याच बोटांचा ठसा उमटला किंना बारीक रेख जरी उठली तरी कसनुसं होतं. ह्या शक्यता टाळण्यासाठी काही वेळ कुठलीही हालचाल न करता नेलपेन्ट सुकण्याची वाट पाहात बसावं लागतं. त्यात जर कधी घाईत […]

 • slow cooker (2)

  कुकरचा शोध लागल्यानंतर पदार्थ बनवणं जसं सोप्पं झालं, तसं स्लो कुकर आल्यापासून एकाचवेळी अनेक पदार्थ बनवणं सोप्पं झालंय. किचनमधल्या एखाद्या कोप-यात त्याचा स्विच लावून, योग्य प्रमाणात जिन्नस एकत्र करुन टाईमर लावून शिजवत ठेवले, की सुगरणीचं काम झालं. मग, ती निर्धास्तपणे गॅस शेगडीवर बाकीचे पदार्थ बनवू शकते. स्लो कुकरमधला पदार्थ शिजला आणि टाईमर संपला की कुकर […]

 • over parenting (2)

  लहानग्यांच्या मनाचे रंग इतके क्षणार्धात पालटतात, की घरातील मोठ्या मंडळींना सतत त्यांच्यावर नजर खिळवून बसावं लागतं. हे छोटे वस्ताद केव्हा काय करतील, काही सांगता येत नाही. त्यांच्या खळखळून हसण्यातून केव्हा रडण्याचा सूर लागेल याचाही अंदाज बांधणे केवळ अशक्य. कधी चालता चालता घडपडतात, मोठ्ठालं भोकाड पसरतात, दिलेली कामं वाढवून ठेवतात. मग अशी वेळ येऊच नये म्हणून […]

 • Poha Cutlet (1)

  टिफीनला नेहमी चपाती भाजी न्यायला छोट्यांइतकेच मोठेही कधीकधी कंटाळतात. याला पर्याय म्हणून पोटभरु पण तितकाच पौष्टिक पदार्थ देत आहोत, जो सकाळच्या घाईगडबडीत देखील झटपट तयार होतो. पोह्याचे कटलेट एकदम चमचमीत! साहित्य: 3 उकडलेले बटाटे, २ वाट्या भिजवलेले पोहे, १ कांदा, १ टी.स्पू. चाट मसाला, १ चमचा हळद, १ चमचा मिरची पावडर (आवडीनुसार), आलं लसूण पेस्ट, एक […]

 • book corner2

  पुस्तकवेड्या मंडळींच्या घरात पुस्तकांचं कपाट किंवा बुकशेल्फ तर हमखास असतं, जमवलेल्या पुस्तकांच्या खजिन्यास मनापासून जपण्याची धडपड वर्षानुवर्ष सुरु असते. पुस्तक वाचनाच्या सवयीसोबत पुस्तक वाचण्यासाठी घरातील एखाद्या जागेचीही सवय जडते. आरामखुर्ची, ऐसपैस सोफा, गॅलरीतला झोपाळा किंवा खिडकी जवळचा दिवाण अशा घरातल्या अनेक जागा आपण वाचानासाठी निवडतो, हळूहळू त्यापैकी एखादी खास बनून जाते. वाचन करणे आवडत असले, […]

 • office hairstyle (1)

  कपड्यांच्या फॅशन सोबत बदलते, ती केसांची स्टाईल. नवनवे हेअर कट्स तरुणी जितक्या हौशेने आजमावून पाहातात. तितकेच ते केस आकर्षकरित्या बांधणे देखील विचारपुर्वक ठरवावे लागते. लग्नसोहळ्यासाठी निराळी हेअर स्टाईल, तर कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी आणखी वेगळी, जरा हटक्या पद्धतींनी केस बांधण्याचा फंडा सध्या रुढ झालाय. आपल्यालाही फॅशन बाबत मागे राहून चालायचे नाही. जे जे नवं, ते […]

 • lipstick (1)

  संपूर्ण मेकअप नाही केला, तरी फक्त हलकीशी लिपस्टिक आणि आयलायनरने चेहरा खुलून दिसतो. कार्यक्रम कुठलाही असो, घरगुती किंवा मोठ्ठाला पारंपारिक सोहळा, नाहितर मग वेस्टर्नमध्ये मोडणारी पार्टी असली तरी थोडा टचअप केल्याशिवाय तरुणी घराबाहेर पडतील तर शप्पथ! लिपस्टिक लावल्याशिवाय आजच्या मुली कॉलेजलाही हजेरी लावत नाहीत. सवय चांगली आहे, पण लिपस्टिकची निवड करणेही जमायला हवे. आजची माहिती […]

 • RELAX SUNDAY (1)

  नोकरी घरकाम असा डोलारा सांभाळून थकलेल्या जीवाच्या वाट्याला आठवड्याअंती एक सुट्टी मिळते. तेव्हा, आनंदाचा, आरामाचा, बिनकामात, आळसात घालवावा असा सुखद रविवार किती जणींच्या वाट्याला येतो? फार क्विचित ना! उलट सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी असतात, मग कामंही वाढतात. खवय्ये निराळी फर्माईश करतात. त्यात रोजच्या धावपळीत वेळ मिळत नाहीत अशी कामे डोक्यात फेर धरु लागतात. साफसफाईपासून ते […]

 • COUPLE GOLE (1)

  जन्मोजन्मीच्या गाठी सुटता सुटायच्या नाहीत, वडाला करकचून दोरा बांधत, मोठ्या प्रेमानं घालतेलं साता जन्माचं गा-हाणं फळास आल्यावाचून राहील कसं! प्रेमापुढे देवही हतबल होतो, म्हणूनच सावित्रीचं उदाहरण आजही ताजं आहे. पुढल्या जन्मांचं बुकींग बायको मनोभावे करते आणि नवराही मनोमनी “मला हीच हवी” म्हणतो. इतकं सुंदर फुलावानी बहरलेलं नातं, बिचारं कायम विनोदाचा भाग बनतं. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या […]

 • Pregnancy (2)

  गरोदर स्त्रीला सातवा महिना लागताच मोठ्या कौतुकानं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानंतर, आईच्या भूमिकेत प्रवेश करणारी ‘ती’ बाळंतपणासाठी सासरहून माहेरी जायला निघते. त्यापूर्वी आप्तजनांच्या उपस्थितीत पार पडणा-या या सोहळ्यात होऊ घातलेल्या आईचे ओटीभरण, तिच्यासाठी नाजूक कळ्यांची गुंफण असलेले दागिने, आसन म्हणून फुलापानांनी सजवलेला झोपाळा, धनुष्यबाण धरुन काढलेले फोटो या पारंपारिक त-हा आपण आजपर्यंत […]

 • pizza muffins banner

  साहित्य: ५० ग्रॅ. बटर, ५० ग्रॅ. ऑलिव्ह ऑईल, २ अंडी, १ कप दूध, २ टे.स्पू. टॉमेटो केचअप, २ कप मैदा, १ टिस्पू. बेकिंग पावडर, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि टोमॅटो, कॉर्नचे दाणे, १ टे.स्पू. साखर, मीठ, किसलेला चीज   पाककृती: प्रथम एका बाऊलमध्ये बटर व ऑलिव्ह ऑईल एकत्र फेटून एकजीव करुन घ्यावे. नंतर […]

 • Cotton BAGS (1)

  प्रत्येक गोष्टीला स्वत:चा हटके अंदाज देण्याचे काम आपल्याला मस्त जमते, तेव्हा कापडी पिशव्यांचा वापरही जरा स्टाईलमध्ये करुया! आजचा ब्लॉग प्रपंच खास त्याच निमित्ताने! लंच बॅग: टिफीन बॉक्स नेण्यासाठी अशी देखणी कापडी बॅग वापरता येईल. टिफीनच्या आकारानुसार बॅगचा लहान मोठा आकार निवडता येतो.   मोंक बॅग: ज्याला बटवा किंवा झोला स्टाईल असेही म्हणता येईल. तुम्ही घरच्याघरी […]

 • International tour (1)

  भटकण्याची आवड असली, की कुठलेही निमित्त चालते. समर ट्रिप, मान्सून ट्रिप, विंटर ट्रिप, फॅमिली ट्रिप, ब्रेक फ्रॉम वर्क अशी भरपूर कारणं चालतात. त्यात, घरापासून दूर असेल, तर झटपट प्लॅन्स बनवता येतात. पण अनोळखी देशाला किंवा शहराला भेट द्यायची, तर मात्र थोडी जास्तीची तयारी ओघानेच येते. अशा ट्रिपवर ग्रुपने जात असू किंवा एकट्याने खालील मुद्दे विसरुन […]

 • Banner 1 (1)

  शाळांसोबत तुम्हा आई मंडळींची ड्युटी देखील नियमित सुरु झालीय. पोळी भाजी नेणारी गुणी बाळं, मर्जी फिरल्यावर म्हणतात, “आई पोळी भाजीच कंटाळा आलाय, काहितरी टेस्टी दे ना टिफिनला!” अशावेळी,  टेस्टी व हेल्दी अशा दोन्ही गुणांचा समावेश असणा-या पुढील रेसिपी ट्राय करुन पाहाच… पालक पराठा – साहित्य – २ कप स्वच्छ धुतलेला पालक, १ कप गव्हाचे पीठ, […]

 • KITCHEN TOOLSS (1)

  किचनमधील कामे उरकताना होणा-या धावपळीला तुम्हीही सामोरे जात असाल ना! स्वयंपाकात माणसांचा हातभार लागताच कमी वेळात भरभर जेवण तयार होते. तसेच, सोबत योग्य वस्तूही हाताशी हव्यात. त्यापैकी काही देतोय आजच्या ब्लॉगमध्ये… 1. भाजी कापण्याचे काम झटपट करायचे असेल, तर अशी चार ब्लेडची कातर वापरायला हवी. कमीतकमी वेळात भाजी छान बारीक चिरता येईल. 2. सूप घरोघरी […]

 • Umbrella Art (2)

  रेनकोट, सॅण्डल, छत्री अशा पावसाळी शॉपिंगच्या गडबडीत असाल, तर यंदा छत्री घेताना एक फिकट रंगाची, कुठलेही डिझाईन नसलेली छत्री आठवणीने विकत घ्या आणि नेहमीपेक्षा थोड्या निराळ्या त-हेने पावसाळा सेलिब्रेट करण्यासाठी तयार व्हा. घरच्याघरी छत्रीवर हवे ते डिझाईन रंगवणे अवघड मुळीच नाही. प्रथम वरीलप्रमाणे, एखादी छत्री निवडा. छत्रीचा रंग गडद असल्यास थोडे विचारपूर्वक डिझाईन निवडावे लागते […]

 • Wallpaint (1)

  घराला मनाजोगतं सजवण्यासाठी धडपडणा-या प्रत्येकासाठी आजचा खास वॉलपेंटिंग विशेष ब्लॉग! “भिंतींना कान असतात”, पण त्यांना बोलतंही करता येतं, वॉलपेटिंग्सच्या साहाय्याने! घरातील भिंती आतील बाजूने रंगवताना, सरधोपट एकाच रंग वापरण्यापेक्षा कॉनट्रास्ट रंग देण्याचा फंडा मधल्या काळात हिट झाला होता. अजूनही दोन रंगांच्या कॉम्बिनेशनमध्ये खोली रंगवली जाते. मात्र, याहून काहि निराळा व आकर्षक प्रयोग करण्याच्या विचारात असाल, […]

 • Gender equility (1)

  गेली कित्येक तपे समाजाला पोखरत असलेली स्त्री पुरुष असमानता मुळातून नष्ट करायची, तर तयार होणा-या नव्या पुढीच्या मनात या समानतेचे बी पेरायला हवे. यासाठी, आईवडिलांनी आपल्या वागणुकीतून समानतेचे धडे मुलांपर्यंत पोहोचवायला हवेत. बाळ जाणते होऊ लागताच पालकांनी अधिक सतर्कपणे वागायला हवे. साधारण वयाच्या तिस-या वर्षापासून बाळाची निरीक्षण शक्ती प्रगल्भ होऊ लागते. भोवताली घडणा-या घटनांचा त्याच्या […]

 • Summer snacks (1)

  स्वादिष्ट पदार्थांवर ताव मारण्यासाठी खवय्यांना कुठलेही निमित्त चालते. सणसोहळा असो किंवा नसो, मेजवानी त्यांच्यापर्यंत व ते मेजवानीपर्यंत बरोबर पोहोचतात आणि अशा चवदार पदार्थांना हौशेने बनवणारे पाककलाकार तर  महाहौशीच! ते देखील वातावरण व जिन्नसांचा अचूक मेळ साधून वर्षभर विविध चवींची रेलचेल सुरु ठेवतात. त्याचाच एक नमुना वाळवणीच्या पदार्थांमार्फत लवकरच घरोघरी दिसू लागेल. यामध्ये भर म्हणून ऐन […]

 • Recycle old saree (1)

  फॅशनजगतात किती वेगाने नवनव्या, मोहक पेहरावांचा शिरकाव होतोय. बदलत्या ट्रेंडनुसार आपलेही वॉर्डरॉबमध्ये नव्या फॅशनचा भरणा करणे सुरु असते. तिने काय नवे घातले? हिने काय विकत घेतले?  यावर आपली बारीक नजर नवख्या फॅशनला अनेकदा भुलते, पण मराठीमोळी साडी कायम अव्वल ठरते आणि आवडलेली साडी विकत घेण्याचा मोह आवरता येत नाही. यातूनच, स्वत:चे वैयक्तिक साड्यांचे कलेक्शन तयार […]

 • Mango recipes (1)

  यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याच्या या हटके रेसिपीज करण्यासाठी आहात ना तयार? लहान मुलांपासून सारेच या चवदार रेसिपीजना पसंतीची पावती देतील. करुन तर पाहा! मॅंगो मफिन्स – साहित्य – १ कप मैदा, १/२ कप आंब्याचा गर, १/२ कप कन्डेन्स्ड मिल्क, १/३ कप पिठी साखर, १/२ कप दूध, १/३ कप बटर, १/२ लहान चमचा वाटलेली वेलची, १/४ लहान […]

 • Vacation (1)

  एकदाची वार्षिक परीक्षा संपली, की मनात धरुन ठेवलेला गावाला जाण्याचा बेत पुरा करण्याची तयारी सुरु होते. गावाला गेल्यावर काय काय धम्माल करायची याचे मनसुबे मुलांसोबत घरातील मोठ्यांनीही रचलेले असतात. कधीचं बुकिंग करुन ठेवलेलं असतं, थोडी थोडी बॅगही भरुन झाल्याने, फक्त परीक्षा आटोपण्याचा अवकाश, की निघालो गावाला आणि हा प्लॅन नसला, तरी परीक्षा संपल्याने दिवसभर घरात […]

 • Cloths (1)

  एकाबाजूला स्त्रीभ्रूण हत्येची विकृती वाढतेय, तर दुसरीकडे आपल्याला कन्यरत्नच व्हावे, अशी इच्छा मनी बाळगणारे पालकही दिसतायेत. पण, ते देखील मुलीच्या सुरक्षेचा विचार करुन मनोमन तितकेच धास्तावलेले असतात. जाणिवांच्या सर्व मर्यादा वेगाने ओलांड़ू लागलेला हा बलात्कारी राक्षस ३ ते ४ वर्षाच्या लहानश्या मुलीसही आपले भक्ष बनवतो. मुलीच्या जन्मासोबतच आईबाबांच्या डोक्यावर तिच्या असुरक्षिततेची टांकती तलावर अगदी कायमचीच […]

 • shoe banner1

  सॅण्डलचे हिल्स जितके उंच, पायाची दुखणी तितकी जास्त. भरजरी सोहळे सोडले, तर उंचवट्याचा मगमुसही नसलेली जुती वापरण्याकडे मुलींचा कल असतो. पाहूया, अशा ट्रेंडी जुती स्टाईलचे बाजारातील नवे डिझाईन्स! नक्षीकाम व लहान लहान घुंगरांच्या एकत्रीत वापरातून तयार केलेल्या डिझाईनर जुती, पटियालावर जितक्या सहज जातत; तितक्याच जिन्सवरही शोभून दिसतात.   अलंकारांत मोत्याची पेरण तुम्ही हमखास पाहिली असेल, […]

 • women me too

  बायका बोलक्या, बडबड्या असतात. चार डोकी जमली, की लागलीच चर्चासत्र भरतात. अमक्या तमक्याचं, वरवरचं, गावभरचं किती विषयावर बोलतात, तरी जे बोलायला हवं तेच नेमकं दडवून ठेवतात. अगदी मनातलं? खोलवरचं? त्या खरचं बोलतात का? स्वत:ची चूक नसूनही लाजीरवाणं करतात, ते लैगिंक अत्याचाराचे कटू क्षण. अशा विकृतीला बळी पडलेल्या स्त्रिया तिचा दु:खद अनुभव कधीच कुणा सांगण्या धजावत […]

 • Grandparents (1)

  एकत्र कुटुंब पद्धती विभक्त झाली आणि वास्तूसोबत मनांचाही आकार आकुंचन पावला. छोट्या कुटुंबाने छोट्या जागेत घर बसवण्याच्या नादात अनेक अडगळीच्या वस्तू दूर सारल्या. निर्जीव गोष्टींना थारा न दिल्याने, घर सुटसुटीत मोकळं ढाकळं झालं; पण सिनियर सिटीझन्सना वगळल्याने पर्णहीन झाडाप्रमाणे ओकबोकंही वाटू लागलं. ट्रेन, बस, देवदर्शन सा-या ठिकाणी वृद्धांना आरक्षण मिळालं, मात्र नेमक्या हक्काच्या घरातच जागा […]

 • kurkure lollipop banner

  साहित्य – ४ उकडलेले बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, १ वाटी उकडलेले मटार, १ वाटी चिरलेले गाजर, १ वाटी चिरलेली फरसबी, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, ३ चमचे किसलेले चीज, ३ चमचे कॉर्नफ्लॉवर, १ चमचा आले लसूण पेस्ट, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे पावडर, […]

 • Indian Spices (1)

  पदार्थ रुचकर होण्यामागे सुगरणींची स्वयंपाकातली काही गुपितं दडलेली असतात. नानात-हेचे जिन्नस नेमक्या प्रमाणात वापरुन केलेल्या खमंग प्रयोगांचा फडशा पाडताना पदार्थातील चवींचा उलगडा होतो आणि आचा-यानंतर पाककृतीतील मसल्यांना मनमुराद दाद मिळते. पदार्थानुसार वापरले जाणारे वेगवेगळे मसाले बाजारात रेडीमेट मिळतात, तरी आजही बरीच हौशी मंडळी घरी मसाले बनवणे पसंत करतात. असे केल्याने, आपल्या आवडीनुसार तिखटाचे, गरम मसाल्यांचे […]

 • VEG CHEESE PARATHA (1)

  साहित्य – वाटीभर मैदा, वाटीभर कणीक, सहा चमचे मोहन(तुपाचे), अर्धी वाटी किसलेले चीज,  किसलेला फ्लॉवर, बारीक चिरलेले गाजर, वाटीभर मटार दाणे, बारीक चिरलेला एक कांदा, बारीक चिरलेली फरसबी, विविधरंगी सिमला मिरच्या बारीक चिरुन, वाफवलेले मक्याचे दाणे, तीन ते चार हिरव्या मिरचा, लहानसा आल्याचा तुकडा, चार ते पाच लसणाच्या पाकळ्या, पुदीना, कोथिंबीर, साखर, मीठ. (भाज्या आवडीनुसार […]

 • Banner 01

  कळत नकळत पाश्चात्य संस्कृती आपल्या परंपरेचा महत्तम भाग बनली आणि तिच्यासाथीने ‘आधुनिक विचारसरणी’ या व्याख्येत सहज जाऊन बसता येऊ लागले. याच पठडीतला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा परदेशी सण! १४ फेब्रुवारीला साज-या होणा-या प्रेमजल्लोषासोबत, जगभर आणखीही काही खास घडतं. ज्याचा विषय अगदी निराळा, गंभीर व अत्यावश्यक! स्त्री अत्याचार, हिंसा, लैंगिक छळ, विनयभंग अशा एक ना अनेक विकृतींना […]

 • Lemon (2)

  साहित्य – दोन मोठे चमचे पांढरे लोणी, पाऊण वाटी साखर, एक लिंबू, एक कप दूध, दोन अंडी, दोन मोठे चमचे मैदा, चवीपुरता मीठ पाककृती – अंड्यातील पिवळा बलक व पांढरा भाग वेगवेगळा फेटून घ्यावा. लोण्यात सार मिसळून मिक्सरमध्ये नीट फेटून घ्यावी. मैद्यात मीठ घालून चाळून घ्यावा. त्यानंतर, लिंबाची साल कापून किसून घ्यावी व लिंबाचा रस […]

 • indoor garden banner

  घराच्या भोवताली पहुडलेली बाग, आता क्वचितच पाहायला मिळते. मोठ्ठाल्या इमारतींच्या आवारात थोडे बहुत बागकाम केलेले दिसतेही, मात्र त्याची सर वैयक्तिक बागेस नाही. स्वत:च्या देघरेघीखाली बहरलेल्या लहानशा रोपांची मौज काही औरच असते. जागेच्या अडचणींवर मात करत हल्ली कमी जागा व्यापणारे ‘इनडोअर गार्डन’ शहरी खोल्यांमधून बहरु लागले आहे. मर्यादित वाढ असणा-या या शोभेच्या झाडांचा व्यापही फार नसतो. […]

 • Saree care (1)

  साड्या आपला जीव की प्राण! विविध प्रकारच्या व रंगाचा मेळ साधणा-या साड्यांची मौलिक ठेव प्रत्येकीचे वॉर्डरॉब सजवते. नव्या फॅशनचा पगडा कितीही भारी असला, तरी परंपरेचा बाज सांभळणारी साडी निव्वळ अप्रतिम! जशा ती नेसण्याच्या खास पद्धती, तशाच तिची काळजी घेण्याचे नखरेही हजार! तेच जाणून घेणार आहोत आज, नक्षीकाम केलेल्या साड्यांना विशेष जपावे लागते. अश साड्या धुताना […]

 • MAKEUP

  मेकअपसाठी फक्त महागडी सौंदर्यप्रसाधने उपयोगाची नाहीत, तर ती रीतसर वापरली जायला हवीत. कारण, चुकीच्या पद्धतीने मेकअप केल्यास सौंदर्य खुलण्याऐवजी ते बिघडण्यास अधिक हातभार लावतो. केलेला मेकअप जसाच्यातसा दिर्घकाळ चेह-यावर टिकून रहावा यासाठी खालील चुका कटाक्षाने टाळा! 1.डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे किंवा चेह-यावरील डाग लपविण्यासाठी कन्सिलर किंवा फांऊडेशन निवडताना त्वेचेशी मॅच होणा-या रंगाचेच निवडावे. असे न केल्यास, […]

 • gARLIC BREAD (1)

  साहित्य – १ मोठा ब्रेड(बगीट/मोठा स्लाईज ब्रेड), १२५ ग्रॅम बटर, ४ ते ५ लसूण पाकळ्या, १० ते १२ पुदीन्याची पाने किंवा मिक्स हर्ब पाककृती – एका भांड्यात बटर, बारीक चिरलेला लसूण व मिक्स हर्ब एकत्र करुन घ्यावे. ब्रेडच्या स्लाईजवर वरील मिश्रण नीट पसरावे. ब्रेड पुन्हा फॉइलमध्ये गुंडाळून बेकिंग ट्रेमध्ये ठेवावेत. ४००F/२००C प्रिहीटेड ओव्हनमध्ये ट्रे ठेवून, […]

 • SHILA BHAT (1)

  सर्वसाधारण खाणारी तोंडे किती, याचा अंदाज घेऊनच तितका भात शिजवला जातो. मात्र, कधी अंदाज चुकतो किंवा कुणी भात जेवले नाही, की भात उरतो. अशा आदल्या दिवशीचा उरलेला भात कसा संपवावा हा मोठा प्रश्नच! कारण असा शिळा भात ऑफिसला जाणा-यांना डब्यात देता येत नाही, तसेच दुपारपर्यंत तो आणखी शिळा होऊन पांबण्याचीही शक्यता असते.  पण, या सर्व समस्यांवर […]

 • NAIL ART (2)

  झटपट होणा-या ‘नेल आर्ट’ डिझाईन्स!! दिसायला अगदी लहान व नाजूकशी नखे, नेलपेंटने रंगताच देखणे रुप धारण करतात. त्यात हल्ली भर पडलीये ट्रेंडी नेलआर्टची! नखांवर किचकट नक्षीकाम करण्याची कला तशी अवघडच, पण ब्रश, पिन्ससारखे साहित्य वापरुन हे किचकट काम करीत नखे सजवताना छान काहितरी क्रिएटीव्ह केल्याचा आनंद मिळतो. असे नेलआर्ट करण्याची हौस तर आहे, पण त्यासाठी […]

 • sabudana banner

  साहित्य – २ उकडलेले बटाटे, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, १/२ टि. जिरे, ३ टि. शेंगदाणा कूट, १ टि. जिरेपूड, १ ते २ टि. शिंगाडा पीठ, मीठ, तेल पाककृती – १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा, त्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे. मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे व थोडे मीठ घालावे व […]

 • chanda hobby banner

  ‘छंद’ म्हणजे फक्त विरंगुळा किंवा टाईमपास नव्हे, तर छंद असतात स्वविकासासाठी! कळत नकळत वयाची मर्यादा झुगारुन लहान व्हायचं, तर हाती आवडीचं काम हवं. तुमचा छंद जर तुमचं करिअर बनलं असेल, तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात, नाहीतर कमी काळातच नोकरीचा किंवा रोज रोज तेच काम करण्याचा कंटाळा आल्याची लक्षणे दिसू लागतात. या त्रासातून मानसिक स्वास्थ्य स्थिर […]

 • indian woman banner

  जगभरातील महिला विविध क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध करण्याची चिकाटी बाळगून आहेत. दर दिवशी एक नवा विक्रम ‘ती’ स्वत:च्या नावे करते आहे. या चढाओढीत भारतीय महिलाही मागे नाहीत बरं!! आपल्या देशातील महिलाही पूर्ण जिद्दीने तिरंग्याची शान राखून आहेत, सातासमुद्रापार त्यांच्या प्रगतीचा जयघोष पोहोचतो आहे. २०१७ सालातील अशाच काही भारतीय यशस्वीनींविषयी जाणून घेऊ, ज्यांचे कतृर्त्व पाहून कुणीही थक्कच […]

 • Kitchen plants (1)

  निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक अन्न पोटात जावे, म्हणून आहारात पालेभाज्या, फळभाज्यांचा समावेश तुम्ही आवर्जून करत असाल. मात्र, बाजारात मिळणा-या सर्व भाज्या नेहमी ताज्या असतीलच असं नाही. यासाठी, थोडा निराळा प्रयोग करत, छोट्या प्रमाणातील किचन गार्डन घरीच बनवलं तर? बागकामाची आवड असणारा सदस्य घरात असेल, तर नक्कीच लहानशा जागेतही तुमचं स्वत:चं ‘किचन गार्डन’ उभं राहिल. नोकरीचा व्याप […]

 • rasam banner

  साहित्य – १/४ टि. हिंग, २ लहान चमचे हळद, १ टॉमेटो, ३-४ लसूण पाकळ्या, २ टि. चिंचेचा कोळ, १ टि. शिजवून घेतलेले तुरीचे वरण, १ टि. तेल, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ रस्सम मसाला – १ टि. धणे, १/२ टि. काळीमिरी, १/२ टि. जीरे, २ ते ३ सुक्या लाल मिरच्या पाककृती – प्रथम, धणे, जीरे, मिरी व […]

 • new year banner

  डिसेंबर!! वर्षसरतानाच्या उत्साहाने भारलेला हा महिना! या महिन्यात आपण असे काही नववर्ष संकल्प मनी धरतो, की जर प्रत्येक संकल्प पूर्ण झाला, तर वर्षाअंती आपल्याइतकं परफेक्ट कुणीच नसेल. वर्षाचा पहिला महिना काटेकोरपणे संकल्प पाळतोही, मग फेब्रु, मार्चपर्यंत हाच निश्चय थोडा फिका पडतो. पुढच्या महिन्यांत संकल्पांचा जोर आणखी कमी होतो आणि व्यस्त दिनक्रमात सारंच मागे पडतं. असं […]

 • eggless banner

  साहित्य – एक कण्डेन्स्ड मिल्क टिन, लिम्का लहान बाटली (पाऊण भाग), २८० ग्रॅ. मैदा, १२० ग्रॅ. मार्गारिन, ३ टि.स्पू. दूध, १ टि.स्पू. बेकिंग पावडर, १/४ टि.स्पू. खायचा सोडा पाककृती – मैद्यात बेकिंग पावडर व खायचा सोडा मिसळून घ्यावा. केकच्या भांड्यास आतील बाजूने मार्गारिन व मैदा लावून घ्यावा. ओव्हन १० मिनिटं प्री-हिट करावा. मार्गारिन वितळवून त्यामध्ये […]

 • bookshelf (1)

  पुस्तक प्रेमींच्या घरातील पुस्तकांचा ढिग कायमच वाढत जाणारा असतो. यात नव्या पुस्तकांची उत्साहाने भर पडते, तर जुन्या पुस्तकांना तितकेच जपावे लागते. कपड्यांसाठी कपाट, सजावटीच्या वस्तूंचे शोकेस, किचनमधील भांड्यांच्या ट्रॉलीज जितक्या महत्तम, तितकेच आवडत्या पुस्तकांना नेटके ठेवणारे बुकशेल्फही हवे! खोली मोठी असो किंवा लहान कल्पकरित्या बुकशेल्फची रचना केल्यास पुस्तके रचून ठेवण्याचे काम सोप्पे होईल. यासाठीच, देत […]

 • weekend banner

  कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत तुम्ही लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर हमखास पाहिले असेल. महाराष्ट्रात इतके निसर्गसंपन्न भूप्रदेश आहेत, की त्यानुसार प्रत्येक जिल्ह्या, तालुक्याचे ते वैशिष्ट्य बनून राहिले आहे. म्हणूनच, यंदा या नेहमीच्या पर्यटन स्थळांना जरा बाजूला सारुन, निराळ्या ठिकाणांची सफर करुया. कुठलंतरी नवं निसर्गरम्य ठिकाण गाठण्याची इच्छा तुम्हीही मनी बाळगून असाल, तर आजचा पर्यटन विशेष लेख तुमच्यासारख्या भटुकड्यांसाठीच, […]

 • dal vada banner

  रेसिपी – डाळवडे साहित्य – १ वाटी हरभरा डाळ, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, ८ ते १० लसूण पाकळ्या, १ इंच आले, १/२ टि. हळद, १ टि. जीरे, १ टि. तीळ, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर बारीक चिरुन, तेल, मीठ पाककृती – • हरभरा डाळ धुवून २ ते ४ तास भिजवावी. या भिजलेल्या डाळीतून पाणी नीट निथळू […]

 • Banner 01 (1)

  जुन्या साड्या बोहारणीला देऊन त्या बदल्यात एखादी कढई, कॉपर बॉटमचं भांडं किंवा प्लॅस्टिक टब घेण्याचा व्यवहार तुम्हाला नक्कीच ठाऊक असले. पण, या बोहारणीच्या अटीही फार! किमान सात ते आठ साड्यांच्या बदल्यात एक लहानस भांडं मिळतं. त्यातही साडीला कुठेही छिद्र नसावे, ती विटलेली व अस्वच्छ नसावी हे त्या स्वत: तपासून घेतात. आता, अशी नेसण्याजोगी असलेली साडी […]

 • chana chilli banner

  साहित्य– १ कप चणे(रात्रभर भिजत घालावेत), १ लसूण गड्डा, १ मोठा कांदा, २ मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, २ कांद्याच्या पाती, ४ चमचे टॉमेटो सॉस, ४ चमचे रेड चिली सॉस, ३ चमचे सोया सॉस, ३ चमचे व्हिनेगर, २ चमचे काळीमिरी पावडर, ४ ते ५ चमचे कॉर्नफ्लॉवर, मीठ, तेल पाककृती – रात्रभर […]

 • color band (1)

  घरासाठी बारीक सारीक वस्तूंची खरेदी करतानाही आपण फार सतर्क असतो. आपल्या होम स्वीट होमला शोभून दिसतील अशाच अचूक गोष्टी आपण निवडतो. ज्यातील महत्तम भाग घराचा आंतर्बाह्य रंग! सध्याची स्टाईल वैगरे विचारात घेतली, तरी बघताच मनाला प्रसन्नता देणारी निराळीशी रंगसंगती आपल्याला प्रत्येकाला हवी असते. साधारण मुख्य रंग तीन ते चार, पण याच रंगांच्या भन्नाट शेड्स किंवा […]

 • dhokla banner

  साहित्य – १/२ वाटी पोहे, १/२ वाटी रवा, १ वाटी मलईचे दही, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, १/२ लहान चमचा फ्रुट सॉल्ट, तेल, कोथिंबीर फोडणासाठी- १ टे.स्पू. तेल, मोहरी, हळद, हिंग, जिरे, कढीपत्त्याची पाने पाककृती – • एका बाऊलमध्ये दही घेऊन, त्यामध्ये कपभर पाणी मिसळावे. • आता, त्यामध्ये पोहे, रवा, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीपुरते मीठ […]

 • LAGN PRASHN (1)

  समाजातील साक्षरतेचा आकडा वाढतोय, पण हा सुशिक्षितपणा स्त्रियांना दिल्या जाणा-या वागणूकीत आजही पुर्णत उतरलेला दिसत नाही. शिकल्या सवरल्या घरातील व्यक्तिही जुन्या विचारांचा माग सोडण्यास तयार नसतात. ग्रामीण भागासोबत शहरातही नवरीमुलगी लग्नांनंतर अशा काही समस्यांशी आजही झगडतेय. १. साडीचं नेसावी – सध्याची सुटसुटीत फॅशनशैली जिन्स टॉप, कुर्ती पसंत करते. पारंपारिक पेहरावात मोडणारी साडी मोजक्या सोहळ्यांना नेसली […]

 • Mehendi design (1)

  नटण्या मुरडण्याची हौस कुणाला नसते? कुठल्याही समारंभाला जाताना आपण छान दिसायला हवं, याविचाराने ट्रेंडी फॅशनचा अभ्यास सुरु होतो. मग, साजेशी हेअर स्टाईल, ज्वेलरी सा-यातच आपल्याला काहीतरी हटके हवं असतं. पण फॅशन कितीही मॉर्डन झाली, तरी मेहंदीची क्रेझ कधीच कमी होणार नाही. कारण “मेहंदी तो सबपे जजती है|” पारंपारिक असो किंवा इंडो वेस्टर्न लूक, छान रंगलेली […]

 • hallowin banner

  Halloween, also known as Allhalloween, or All Saints Eve, is a spooky celebration observed every year in many countries on October 31st. The origin of the festival is disputed but it is said to originate from Celtic pagan of Samhaim, meaning ‘Summer’s End’ which celebrated the end of harvest season. The origin of trick or […]

 • soya banner

  साहित्य – १कप सोया खीमा(भिजवलेला), १कप ब्रेड क्रम्ब्स, १कप उकडून कुस्करलेले बटाटे, १ अंडे, १/२कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १० ते १२ चीझचे तुकडे(१इंचाचे), १/४ चमचा आल लसूण पेस्ट, बारीक चिरलेलले आले, जिरेपूड, मीठ पाककृती – प्रथम भिजवलेला सोया खिमा व कुस्करलेले बटाटे नीट एकजीव करुन घ्यावे. त्यामध्ये २ चमचे ब्रेड क्रम्ब्स, आल लसूण पेस्ट, चिरलेली […]

 • mutton chops banner

  साहित्य – १० मटण चॉप्स, ६ हिरव्या वेलच्या, २ चमचे बडीशेप, ५ लवंगा, २ दालचिनीचे मध्यम आकारातील तुकडे, ४ कप दूध, १/२ वाटी बेसन, १/४ वाटी मिरपूड, १/२ चमचा हिंग, १ लिंबाचा रस, १/२ कप तूप पाककृती – वेलची, लवंग, दालचिनी व बडीशेप एकत्र कापडामध्ये बांधून त्याची पुरचुंडी करावी. मोठ्या पसरट पाचेल्यात चॉप्स घालून त्यामध्ये […]

 • chakli banner

  साहित्य – ३ वाट्या मैदा, १ वाटी मूगडाळ(शिजवून), १ चमचा बटर, २ चमचे तीळ, १ छोटा चमचा ओवा, १ छोटा चमचा जिरे, १/२ चमचा हिंग, १ चमचा लालतिखट, १/२ चमचा हळद, मीठ. पाककृती – मैद्याची सुती कापडामध्ये पुरचुंडी बांधावी. आता, ही पुरचुंडी एका डब्यात घालून डब्याला घट्ट झाकण लावावे. कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून हा मैदा […]

 • No holiday (2)

  सर्व सणांचा राजा असणा-या दिवाळीनिमित्त बॉस सुट्टी देत नसेल, तर मनाविरुद्ध ऑफीसला जाणं आलंच. घरोघरी सणाची धम्माल सुरु असताना आपल्याला ऑफीसला जाव लागतयं, याचा वैताग येणं साहाजिक आहे. धनोत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज असे महत्तम दिवस आठवडाभर सुरु असतात. प्रत्येक दिवशी सुट्टी मिळत नाही, मग काय फराळाचं ताट झपझप संपवून निघावं लागतं कामासाठी, […]

 • shankar pale banner

  येत्या दिवसांत कुठल्या वारी फराळाचा कुठला पदार्थ उरकून घ्यावा हे ठरलेच असेल, त्या पदार्थांच्या यादीत आता निराळ्या चटपटीत चवीची भर पडणार आहे. गोड शंकरपाळीसोबत, यंदा मेथीची शंकरपाळी बनवून पहा. फराळाची लज्जत नक्की वाढेल. साहित्य – ३/४ वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी मैदा, १ टि. तेल, २ टि. कसूरी मेथी, ओवा, चवीपुरते मीठ, तेल पाककृती – […]

 • SHOPPING BANNER

  सण सोहळे आले की शॉपिंगसाठी एक हक्काचं निमित्त मिळतं. सर्वत्र ऑफर्स आणि सेल्सचा ओघ सुरु होतो. विक्रेते जास्तीतजास्त भन्नाट ऑफर्स देऊन गि-हाईकांना खूष करतात. कमी दरात भरपूर शॉपिंग करण्याचा फंडा आजमवायचा असेल, तर पुढील गोष्टींवर लक्ष ठेवा. न्यूजपेपर पहिल्या पानावरील पानभर जाहिराती सहज नजरेस पडतात. मात्र, काही लहान सहान जाहिरातींकडे मात्र दुर्लक्ष होते. न्यूजपेपरमध्ये खास […]

 • bengali sweet sandesh banner

  घरच्या सुरगणी हल्ली नोकरी, व्यवसायात व्यस्त असल्या, तरी अजूनही वेळातवेळ काढून बहुतांश जणी सणासुदीचे जेवणही स्वत: बनवणे पसंत करतात. विकतच्या जेवणापेक्षा घरच्या स्वच्छतेवरच तिचा प्रचंड विश्वास असतो. म्हणूनच, किचनमध्ये नवनवे प्रयोग करणा-या झी मराठी जागृतीच्या मैत्रिणींसाठी आजची ‘संदेश’ रेसिपी! साहित्य – १ लि. दूध, २ लिंबू, ४ ते ५ वेलच्या, ५० ग्रॅ. पिठी साखर, २० […]

 • Banner 01

  रेसिपी  – रसमलाई सण सोहळ्यांच्या दिवसांत नैवेद्यासाठी काहितरी गोडधोड करावेच लागते. प्रत्येकवेळी त्याच त्याच पदार्थांना करणारा व खाणारा दोघेही कंटाळतात. म्हणूनच, काहितरी निराळा व झटपट बनणारा पदार्थ करण्याचा बेत आखत असाल, तर रसमलाई नक्की करुन पहा! खवय्ये खूष होतीलच आणि हा पदार्थ वेळखाऊ नसल्याने तुम्हीही खूष! साहित्य –  १० तयार रसगुल्ले, १ लि.दूध, ३ टे.स्पू.साखर, […]

 • prawns rice banner

  साहित्य- अर्धा किलो सोललेली कोळंबी, अर्धा किलो तांदूळ, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आले, १ चमचा लाल तिखट, २ नारळाचे दूध, पाऊण वाटी तेल, २ मोठे दालचिनिचे तुकडे, ३-४ लवंगा, ३ हिरवे वेलदोडे, अर्धा चमचा शहाजिरे, २ चमालपत्राची पाने, चवीनुसार मीठ, १ चमचा गरम मसाला, १ चमचा बडीशेप, १ लहान चमचा जिरेपूड, १ चमचा हळद […]

 • 750x305_1

  जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येची घटना जीव हेलावणारी आहे. परखड विचारांना निर्घृणरित्या दिलेला हा पूर्णविराम! प्रत्येक स्तरावरुन या घटनेबाबत निषेध व्यक्त केला जातोय. गौरी या बंगळूर मधील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादिका म्हणून कार्यरत होत्या. अशक्त, दुबळी, सोशिक अशा प्रतिमेतील ‘ती’ आज इतकी कणखर व धैर्यशील बनलीये. तिच्या विचारांची धगही नकारात्मक […]

 • rushi bhaji banner

  साहित्य- १/४ कि. भेंडी, १/४ कि. शिराळी, २ अळूच्या जुड्या, २ लहान जुड्या लाल माठ, मध्यम आकारातील काकडी, १/४ कि. मक्याचे दाणे, १ नारळ (खवणून), आले,२ वाटी ताक मिरची, तेल, जिरे पाककृती – प्रथम सर्व भाज्या चिरुन घ्याव्यात. काकडी व दोडक्याच्या पातळ चकत्या कराव्यात. अळूची पाने व लाला माठाचे देठ सोलून व चिरुन घ्यावेत. आता, […]

 • modak banner (1)

  साहित्य – दोन वाफवलेले बटाटे, ५० ग्रॅ. शिंगाड्याचे पीठ, १०० ग्रॅ. खवा, १/२ वाटी साबुदाणा, भगरचे पीठ, २५० ग्रॅ. पिठी साखर, १/२ वाटी खोब-याचा कीस, सुकामेवा, इलायची पूड व तूप पाककृती – १. प्रथम खवा चांगला भाजून घ्यावा. वाफवून घेतलेल्या बटाट्याच्या किस स्मॅश करावा. २. हा किस चमचाभर तूपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यावा. ३. आता, शिंगाडा, […]

 • vegetable soup banner

  साहित्य – २ टि.स्पू. किसलेले गाजर, २ टि.स्पू.फुलकोबी, २ टि.स्पू. कोबी, २ टि.स्पू. लसूण पेस्ट, २ टि.स्पू. तेल, २ टि.स्पू. कोथिंबीर(बारीक चिरुन), कांद्याची पात, मीठ, मिरपूड, १ टि.स्पू. लिंबाचा रस, २ टि.स्पू. कॉर्न स्टार्च, चार कप पाणी पाककृती – प्रथम कढईत तेल गरम करावे. त्यामध्ये लसूण पेस्ट साधारण गुलाब होईपर्यंत परतावी. आता त्यामध्ये बारीक चिरुन […]

 • कोशिंबीरीचे प्रकार (2)

  सण सोहळ्यांनी परिपूर्ण असणारा ‘श्रावणमास’ सुरु झाला, की मन अगदी आनंदून जात. देवपूजा, पारायणे, उपवास करताना साग्रसंगीत नैवेद्याच्या जय्यत तयारीने स्वयंपाकघरही सजते. भरपूर पदार्थ बनवताना सुगरणींची तारांबळ उडते आणि नवीन काहीतरी करुन पाहाण्यासाठी रेसिपी शोधायची राहूनच जाते. म्हणूनच, यंदाच्या ब्लॉगमध्ये नैवेद्याच्या पानावर महत्त्वाचे स्थान असणा-या कोशिंबीरीचे प्रकार तुमच्यासाठी घेऊन आलोय…. कोबीची कोशिंबीर – साहित्य – […]

 • veg-momos banner

  साहित्य (पारीसाठी)- २ वाट्या मैदा, अर्धा टि.स्पू. बेकिंग पावडर, १/२ टि.स्पू. मीठ, २ टि.स्पू. तेल (सारणासाठी)- १ टि.स्पू तेल, अर्धी वाटी कोबी, अर्धी वाटी गाजर, १ मोठा कांदा, १ भोपळी मिरची, ६ ते ७ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, १ हिरवी मिरची, मिरपूड, मीठ, सोयासॉस पाककृती • मैद्यामध्ये तेल, मीठ, बेकिंग पावडर घालून हे […]

 • shravan sari (1)

  चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून वर्णिलेला श्रावण! बेधुंद पावसात श्रावणसरींचे आगमन झाले, की मन अगदी प्रफुल्लीत होतं. मनावरची मरगळ दूर करणा-या श्रावणाशी निगडीत या पाच गोष्टी तुमच्याही आवडीच्या आहेत का? निसर्ग ‘श्रावण’ वर्णावा निसर्गाने, पावसाने हिरवे गर्द केलेले वातावरण, झाडापानांत फुलांनी उधळलेल्या रंगांसोबत, साहित्यिकांच्या नजरेतून श्रावणाच्या अनेक त-हा अनुभवताना, अप्रत्यक्षपणे सर्वत्र आनंदीआनंद जाणवू लागतो. निसर्ग सौंदर्याचा […]

 • kIDS MOBILE (1)

  तान्हेबाळही स्मार्टफोनवरची हलती चित्र पहात तासनतास शांत बसते. आईलाही तिची कामे भरभर आवरण्याची मोकळीक मिळते.हल्ली फोटो काढण्यापासून, कठीणातील कठीण गेम्सही लहान मुलं अगदी सराईतपणे खेळतात. टेक्नोलॉजीविषयीमोठ्यांचे ज्ञानही इथेतोकडे पडते. १. एकटक स्क्रीनकडे पहात राहिल्याने डोळ्यांवर ताण येतो व डोळे कोरडे होतात, कमी वयात चष्मा लागण्याची समस्या उद्भवते. २. इलेक्ट्रॉनिक गेम्सचा विचारक्षमतेवर प्रभाव पडत असल्याने,ते प्रत्यक्ष […]

 • Corn cutlet (1)

  पावसाळा ‘चहा व भजी’साठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच खवय्यांचा मकाही प्रिय आहे. सध्या मक्याची कणसे विकणा-या गाड्या तुम्हालाही जागोजागी दिसत असतील. छान खरपूस भाजलेला मका, त्यावर लिंबू, मसाल्याची चव, आहा….!!  हे स्वादिष्ट लागतचं, पण गृहिणींना मक्याचे आणखी प्रयोग करायलाही आवडतात. म्हणूनच देत आहोत पुढील रेसिपी… ‘मक्याचे कटलेट’ बनविण्यासाठी लागणारे साहित्य- २ वाट्या मक्याचे दाणे, २ […]

 • Afternoon (1)

  उजाडलेली सकाळ प्रत्येकाची निराळी, काहींची फारच धावपळीची तर काहींची अगदीच निवांत. घरातील ‘ती’ नोकरी करणारी असेल, तर ती लवकर उठतेच व गृहिणी असली तरी शाळा, कॉलेज, ऑफीसला जाणा-या घरातील सदस्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी तिची सकाळ लवकरच उजाडते. अंघोळ, देवपूजा, ब्रेकफास्ट, चहासोबत वेळ असलाच तर न्यूजपेपर अशा सर्वसाधारण सवयींना सरावलेली सकाळ भुरर्कन सरते व दिवसाचा साधारण […]

 • Monsoon picnic (2)

  उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरु झाल्यात. थोडी विश्रांती घेऊन नोकरदारवर्गही कामावर रुजू झालाय. मे महिन्याच्या सुट्टीत कुणी मामाच्या गावी, तर कुणी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आले असेल, तरी पावसाळ्यात एक ट्रिप हवीच! ऑफीस टू घर, घर टू ऑफीस अशा नियमित सुरु असणा-या दिनक्रमला जरा पावसाळी ब्रेक द्यावा व ऑफीसमधून सुट्टी मिळण्याची अडचण असल्यास विकेंडला […]

 • angry parents banner

  पाल्यावर योग्य संस्कार व्हावेत यासाठी पालकांची नेहमीच धडपड सुरु असते. चारचौघांत कसे वावरावे, आपल्यापेक्षा लहानांशी वा मोठ्यांशी कसे वागावे याविषयीच्या सूचना देत असतात. सर्वच चांगले गुण आपल्या मुलांमध्ये असावेत, म्हणून भरपूर प्रयत्न करुनही मुले कधीतरी चुकतात व इथे पालकांची खरी कसोटी लागते. तुम्हाला मुलांच्या वागण्याचा राग येत असला, तरी तुमच्या ओरडण्यात पुढील वाक्ये येऊ देऊ […]

 • RainyDay (1)

  ऋतू बदल झाला, की शॉपिंगसाठी हक्काचं कारण मिळतं! हेअर स्टाईलपासून, सॅण्डल्सपर्यंत सगळ्यातच ट्रेंडी पर्यायांची शोधाशोध सुरु होते. रोजच्या जगण्यात नवे रंग आले, की सहजच फ्रेश वाटू लागतं; त्यात पावसाळा, म्हणजे ख-या अर्थाने फ्रेश ऋतू! तुम्हालाही नव्या रंगांची संगत हवी असेल, तर लवकरच या पावसाळी वस्तूंची खरेदी करुन घ्या! १. पावसाळ्यात मानाचे स्थान असणारी छत्री भरपूर […]

 • mango cheese cake BANNER

  साहित्य- २०० ग्रॅ. क्रिम चीझ, १५० मिली क्रिम, २५० ग्रॅम मॅंगो पल्प(ताजा आमरस), १/२ वाटी मारी बिस्किटांचा चुरा, २ टि.स्पू. बटर, १/२ वाटी साखर(रसाच्या गोडीप्रमाणे प्रमाण कमी-जास्त करावे), १ टि.स्पू. जिलेटीन पावडर, दीड टि.स्पू. वेलचीपूड पाककृती- १. प्रथम बिस्किटांचा चुरा करुन घ्यावा. वितळलेले बटर त्यामध्ये घालून मिश्रण एकजीव करुन घ्यावे. २. केकच्या साच्यात वरील मिश्रण […]

 • donuts banner

  आकार एक असला, तरी अनेक रंगांत उपलब्ध असणारे ‘डोनट्स’! प्रत्येकाची पसंती मिळविणारा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता घरच्याघरी! सुगरणींनो, तयार आहात ना टेस्टी डोनट्स बनविण्यासाठी? साहित्य- २ कप मैदा, ३/४ कप दूध, १/४ कप बटर, २ टे.स्पू. साखर, १ छोटा चमचा ड्राय एक्टीव ईस्ट, १/२ छोटा चमचा मीठ, तेल, ब्राऊन चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, आईसिंग शुगर(सजावटीसाठी) […]

 • jhulan banner

  भारतीय महिला क्रिकेटपटू ‘झुलन गोस्वामी’ वन डे क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. दक्षिण भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तिने संघाला विजयी केलेच, सोबत आपल्या गोलंदाजी कौशल्याने जागतिक विक्रमही रचला. तिने १५३ वन डे सामन्यांत एकूण १८१ बळी मिळवत आतंरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान पटकावले आहे. ३४ वर्षीय झुलन मागील १६ वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वोत्तम […]

 • रेसिपी - सोयाबीन कटलेट (2)

  सायोबीन खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. यामधील प्रथिनांद्वारे हाडांना भरपूर कॅल्शियम मिळते, तसेच शरीरातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. वजन घटविण्यासाठी सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ उपयुक्त ठरतात. सोयाबीन कटलेट बनविण्यासाठी लागणारे साहित्य – अर्धा कप सोयाबिनचे दाणे, अर्धा कप उकडलेले मूग, एक उकडलेला बटाटा, पाव कप बारीक चिरेलला कांदा, एक टि.स्पू. गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार हिरव्या […]

 • रसगुल्ला

  विविधतेने सजलेल्या आपल्या भारत देशाची संस्कृतीही तितकीची विभिन्न व खाद्यप्रेमींसाठी मेजवानीच आहे. जितकी राज्ये तितकी पदार्थांची रेलचेल खवय्यांहचे स्वागत करण्यास नेहमीच सज्ज असते. पश्चिम बंगालमधील असाच एक पारंपारिक पदार्थ म्हणजे रसगुल्ला! महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रमांतही रसगुल्ल्यास स्थान दिले जाते. तेव्हा, या डेझर्ट डिशची रेसिपी खास महाराष्ट्रातील चाहत्या वर्गासाठी!! रेसिपी साहित्य – १ लि. दूध, ३०० ग्रॅ. […]

 • BAGPACKING (1)

  पिकनिक म्हणजे, धम्माल-मस्ती, हश्या आणि टाळ्यांची भट्टी! मूड फ्रेश करण्यासाठी ट्रिपचा बेत प्रवासी मोठ्या हौसेने आखतात व सामानाच्या ओझ्याखाली दबून जातात. ढिगभर कपड्यांसोबत “हेही लागेल, तेही लागेल, असू दे बॅगेत” असं म्हणत जड झालेली बॅग उचलूनच जीव अर्धा होतो. मग, ट्रिप पूर्ण होईपर्यंत हा थकवाच सोबत करतो. अशा अडचणींपासून तुम्ही दूर रहावे यासाठी, बॅग पॅक […]

 • ब्युटीपार्लरची किमया साधणारे घरगुती फेसपॅक! (1)

  उन्हामुळे काळसर झालेल्या त्वचेस उजळ बनविणारे घरगुती फेसपॅक! बाजारात मिळणा-या फेसपॅकमुळे साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते, म्हणूनच असे फेसपॅक निवडताना आपल्याला फारच सतर्क रहावे लागते. मात्र, घरी तयार केलेले फेसपॅक्स कुठलीही चिंता न करता आपण निश्चिंतपणे चेह-यावर लावू शकतो. हे फेसपॅक नैसर्गिक जीवनसत्त्वेही देतात व घरातील जिन्नस वापरल्यामुळे छान स्वस्तही ठरतात. १. सततच्या घामामुळे तेलकट […]

 • ice cream banner

  आपण कुठल्याही पदार्थाच्या चवीसोबत त्याच्या सुरुक्षिततेबाबतही चोखंदळ असतो. त्यामुळे, हॉटेलपेक्षा आपल्या हक्काच्या प्रयोगशाळेत म्हणजेच घरातील किचनमध्ये नव्या रेसिपीज् करुन पहाणा-या उत्साही सुगरणींसाठी घेऊन आलोय थंडगार आईस्क्रीमच्या लज्जतदार रेसिपीज!! बदाम कुल्फी साहित्य- ३ कप दुध, १/४ कप ताजा मावा, १/२ कप साखर, १/२ कप बदामाचे काप, २ टि. कॉर्न फ्लॉवर, १/२ टि. वेलची पूड, चिमूटभर केशर […]

 • Sunglasses (2)

  फॅशनेबल लूकसाठी ‘चेरी ऑन दि टॉप’ असणा-या गॉगल्सचे वेगवेगळे प्रकार बाजारात वर्षभर पहायला मिळतात. गोल, चौकोनी, पंचकोनी अशा कुठल्याही आकारातील फ्रेम्स व भरपूर रंगांमध्ये उपलब्ध असणा-या त्याच्या लेन्सेसना तोडच नाही मात्र हे गॉगल्स ख-या अर्थाने ऑन ड्युटी असतात ते उन्हाळ्यामध्ये, सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्यांना सुखरुप ठेवणारे सनग्लासेस आता प्रत्येकीच्या पर्समध्ये हमखास असतील आणि असायलाच हवेत […]

 • Summervacation (1)

  उन्हाळ्याचा उकाडा दिवसेंदिवस वाढतोय शाळेला सुट्टी पडल्याने मुलंही कंटळालीयेत! फिरायला जायचं म्हटलं तर, कुठे जायचं?, कसं जायचं? तुमच्या मनातील अशा प्रश्नांना आम्ही देऊ उत्तरं आमच्या ब्लॉग्सद्वारे, चला बच्चे कंपनीला घेऊन मनसोक्त हिंडून या!! कर्नाळा पक्षी अभयारण्य- काऊ – चिऊ या बोबड्या बोलातून पक्ष्यांशी ओळख होण्यास सुरुवात झाली, की पुढे पक्ष्यांचे विविध प्रकार, रंग, लहान मोठ्या […]

 • Kurdaya (1)

  कुरडया साहित्य – १ किलो गहू, १ चमचा हिंग पावडर,मीठ पाककृती – गहू तीन दिवस पाण्यात भिजत ठेवावेत. प्रत्येक दिवशी गव्हातील पाणी बदलावे. तिस-या दिवशी गहू वाटून त्यातील चोथा बाजूला वेगळा करुन सत्व काढून घ्यावे. सत्व रात्रभर झाकून ठेवावे. दुस-या दिवशी वर आलेले निवळीसारखे पाणी फेकून द्यावे व खालील दाट सत्व पाण्याने मोजून घ्यावे. जेवढी […]

 • Hair cutting (1)

  चेह-याच्या सौंदर्यात भर पाडणारा महत्त्वाचा घटक म्हणजे हेअर कट! संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला आकर्षक लूक देण्यासाठी विचारपूर्वक केसरचनेची निवड करणे, म्हणूनच आवश्यक ठरते. चेह-याची ठेवण किंवा केसांचा पोत लक्षात घेऊन योग्य हेअर कट निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा हा लेख तुम्हा मैत्रिणींसाठी! १. लांबसडक केसांसाठी हेअर कट शोधत असाल, तर लेअर्स हा एक उत्तम पर्याय असून; यामुळे केसांची […]

 • Surlichya vadya (1)

  ‘सुरळीच्या वड्या’ किंवा ‘खांडवी’ या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ ब्रेकफास्टसाठी एक उत्तम पर्याय असून, बनवण्यास सोप्पा व वेळखाऊ देखील नाही. लहान थोरांना आवडतील अशा झटपट बनणा-या ‘सुरळीच्या वड्या’ आता घरच्याघरी! सुरळीच्या वड्या – साहित्य – १ वाटी बेसन, १ वाटी आंबट ताक, १ वाटी पाणी, पाऊण चमचा मिरचीचा ठेचा, १ लहान चमचा हळद, १/२ […]

 • Puran poli

  महाराष्ट्राची ओळख असणारी पारंपारिक ‘पुरणपोळी’ खवय्यांच्या मोठ्या लाडाची! होळी सणाला तर या पुरणपोळीचा मान फारच वधारतो. घराघरात बनत असलेल्या पुरणपोळ्यांचा खमंग सुवास सर्वत्र दरवळून, ख-या अर्थाने होळीचा रंग चढू लागतो. सणावाराला बनणा-या पारंपारिक पदार्थांच्या साहित्य व पाककृतीत थोडाफार बदल करुन एखादा नवीन पदार्थ बनविण्याची हौस असेल, तर खालील रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील! गणेशोत्सवाला विविध स्वादाचे […]

 • parents banner

  घरात पिटुकल्या जीवाच्या आगमनासोबत आई, बाबा, आजी, आजोबा या नात्यांचाही जन्म होऊन घराला ख-या अर्थाने घरपण प्राप्त होते. बोबड्या बोलांपासून प्रवास सुरु झाल्यावर बाळाला हळुहळू समज येऊ लागते व यामधून विचारांची निर्मिती झाली की लहानवयातच पाल्याची स्वत:ची काही मतेही आकार घेऊ लागतात. पालकांच्याही नकळत लहान मुलांना शिक्षित करीत असते त्यांची निरीक्षणशक्ती! नजरेसमोरील माणसे, त्यांच्यातील संवाद, […]

 • fruit banner

  ऋतूनुसार येणा-या फळांचे सेवन करायला हवेच, मात्र या फळांचा आनंद घेताना जरा हटक्या पद्धती वापरल्या तर? विविध प्रकाराच्या भरपूर जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असणारा ‘फलाहार’ सर्वांच्याच आवडीचा असला, तरी फळांच्या वापरातून बनवता येतील अशा फ्रेश रेसिपीजचा आपण नक्कीच विचार करु शकतो! अननसाची बर्फी – साहित्य – अननस(किसून-३ वाट्या), ४ वाट्या साखर, १ वाटी दूध (सायीसहित), १०० ग्रॅ. […]

 • banner

  स्त्री शिक्षणाची चळवळ उभारणा-या फुले दांपत्यामुळे भारतातील स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली गेली. कालपरत्वे मुलींनाही शिक्षण घेण्याचा हक्क आहे, हा विचार बहुतांश समाज घटकांनी स्वीकारला, पण अभियांत्रिकी, संशोधन अशा पुरुषांचे वर्चस्व असणा-या क्षेत्रांत महिलांचा प्रवेश होण्यासाठी भारताला आणखी वाट पाहावी लागली. संसारासाठी आवश्यक तितकी आकडेमोड शिकण्यापलीकडे, उच्च शिक्षण घेण्याचा ध्यास तिने घेतला आणि नवनवीन क्षेत्रांत प्रवेश […]

 • Banner 01

  साहित्य– पाउण कप उडदाची डाळ, १/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे, ४-५ मिरं, २ कप पातळ ताक, दीड कप दही, ५-६ टे.स्पू. साखर, मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, तळण्यासाठी तेल पाककृती – (वडे)- उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. नंतर, त्यामधील अगदी थोडेसेच पाणी घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण थोडे दाटसर […]

 • चटपटीत ‘मॅक्रॉनी उपमा’

  साहित्य- १ वाटी मॅक्रॉनी, ३-४ वाट्या पाणी, १/२ वाटी कांदा, १ लहान टॉमेटो, १ते२ हिरव्या मिरच्या, १ चमचा तूप, १/४ चमचा जिरे, २ चिमटी हिंग, ४-५ कढीपत्त्याची पाने, चवीपुरता मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर पाककृती – ३-४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून पाणी उकळले की त्यात मॅक्रॉनी घालाव्यात. ८ ते १० मिनिटे […]

 • Album (2)

  व्यक्तिच्या जन्मापासून त्याच्या स्मरणशक्तीच्या विकासासोबत हळूहळू जीवनात घडणा-या घटना, प्रसंग, व्यक्तिंसोबतचे संवाद, सारे आठवणींच्या कप्प्यात साठवले जाऊ लागले. मानसशास्त्र या आठवणींचे अनंत प्रकार मांडत असले, तरी सामान्यत: आनंदाच्या क्षणांना जपून ठेवावे या मुख्य भावनेने त्या आनंदी प्रसंगांचे वर्णन किंवा रोजनिशीच्या माध्यमातून त्यांच्या तारीखवार नोंदी करुन ठेवण्याचा पायंडा पडला. सुखद क्षण दिर्घकाळ स्मरणात राहावेत यासाठी ते […]

 • khajur banner

  थंडीचे दिवस म्हणजे खवय्यांची चंगळ!! थंड वातावरणात भूक खूप लागते त्यामुळे, पदार्थांच्या विविधतेचा आनंद घेण्यासाठी स्वयंपाकघरात नवनव्या पदार्थांच्या रेसिपीज करुन पाहाण्याचे बेत आखले जातात. ज्यामध्ये, पौष्टिक सत्त्व असतील सोबत तो पदार्थ तितकाच चविष्टही असेल! या ब्लॉगमध्ये दिलेल्या पुढील रेसिपीज नेमक्या याच गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत, शेंगदाण्याचा लाडू – साहित्य – २५० ग्रॅम शेंगदाणे, २५० ग्रॅम साखर, […]

 • Father daughter bond (1)

  ‘कुटुंब’ म्हणजे ‘माणसं’! पूर्वी मोठाल्या कुटुंबात माणसांची संख्याही खूप होती. आता, गावातून शहराकडे स्थलांतरीत होणे अनेकांनी पसंत केले आणि बहुतांश भावंडे विभक्त झाली. पुढे ‘हम दो हमारे दो किंवा एक’ या नियोजनांतर्गत सख्खी भावंडेही तुरळक झाली व नात्यांचा गोतावळा देखील कमी कमी होत गेला. अशा कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे त्या कुटुंबातील प्रत्येकाशी काही खास नाते असते. […]

 • tumcha natal banner

  ख्रिसमस म्हटलं की, खाऊची दुकाने केकच्या वेगवेगळ्या प्रकारांनी सजलेली दिसतात. वर्षभरात अनेक सण सोहळे येतात, पण ‘नाताळ’ म्हणजे ‘केक स्पेशल सण’ असं म्हणायला हरकत नाही. रेडीमेड केक्स तर सर्वत्र वर्षभर उपलब्ध असतात, पण घरगुती केकची सर मात्र त्यांना येणार नाही! म्हणूनच, घेऊन आलोय खवय्यांसाठी ख्रिसमस स्पेशल केक रेसिपीज्!! रवा केक – साहित्य – १ वाटी […]

 • 5-must-watch-women-centric-movies

  Bollywood is an integral part of Indian cinema and has been noticed worldwide. However, women centric movies or female oriented movies have been a rare sight. Heroines are generally portrayed as helpless sister, love interest or a stereotypical mother. However, 2012 onwards and each year forth, we have seen advent of movies with female leads. […]

 • utsah banner

  ‘दिवाळी’ म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पुजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज असे तब्बल सहा दिवस सारं जनजीवन हर्षमय करणारा दिवाळी सण. ज्याच्या प्रत्येक दिवसाला आहे खास महत्त्व! मिथ्यकथांच्या आख्यायिकेसोबत शास्त्रीय कारणांनी परिपूर्ण असलेला हा सण साजरा करण्याच्या पद्धतीला काळानुरुप नवे स्वरुप येताना दिसते आहे. नोकरीमय झालेल्या जीवनात सुट्ट्यांची गणितं वर्षाच्या सुरुवातीलाच […]

 • farali banner

  दिवाळीत कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त पदार्थ बनवण्याचा चंग बांधलेल्या मैत्रिणींनो, घेऊन आलोय फराळाच्या उत्तमोत्तम चविष्ट रेसिपीज् तुमच्यासाठी! सणांचा राजा असलेला दिवाळी सण आता काहीच दिवसावर आलायं. घराघरांतून येणारा भाजणीचा, चिवड्याचा खमंग सुवास येऊ लागलाय. लाडू, चिवडा, करंजी या पारंपारिक पदार्थांसोबत पुढील रेसिपीजच्या मदतीने तुमचा फराळ बनवा आणखी रुचकर!! खारे शंकरपाळे – साहित्य : मैदा […]

 • Quick recipe (1)

  पौष्टिक अन्नाचे महत्त्व आपण सगळेच जाणतो;पण लहान मुलांपासुन मोठ्यांच्या आवडीनिवडी ठरलेल्या असतात आणि त्यापुढे पौष्टिक गुणांकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होते.त्यामुळे चटपटीत पण तितकेच पौष्टकत्त्वाने परिपूर्ण अन्नपदार्थ कसे मिळतील हा विचार आपला नेहमीच असतो. मग त्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग सुरु असतात. काही वेळा हे प्रयोग फसतात तर काही वेळा मात्र आपल्या सुगरणीचा मान आणखीन वाढवतात अशाच काही […]

 • aajibaicha batwa (1)

  तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी होतचं असतात.त्यावर प्रथमोपचार म्हणून घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. पारंपरिक दृष्टीने या औषधांना महत्त्व आहे. आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. जुनं ते सोनं ही म्हण प्रचलित आहे त्याचप्रमाणे जुन्या काळातले हे उपाय आजही तितकेच फायदेशीर असल्याचे मत फिटनेस एक्स्पर्टने मांडले आहे. त्यातील काही उपाय जाणून घेऊयात 1. घशाला त्रास होत असेल […]

 • sweet

  सणवार म्हणजे सुगरणींच्या हक्काचे दिवस. घरात पाहूण्यांची रेलचेल, पूजेची तयारी सुरु असताना नैवेद्याकडेही लक्ष द्यावे लागते. आधीच पंचपक्वानांचा बेत त्यात गोडाधोडाचे करणे आलेच, अशावेळी झटपट होणा-या पदार्थांचा शोध सुरु होतो. काहीतरी नवे व थोड्याच वेळात तयार होईल अशी रेसिपी हवी असते. मैत्रिणींनो तुमचे हे काम थोडे हलके व्हावे यासाठी काही गोड पदार्थांच्या रेसिपीज् तुमच्यासाठी, तळलेले […]

 • Women Law (1)

  समाजाच्या प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य, अधिकार कायद्याने बहाल केलेले आहेत. ‘समाज आणि स्त्रिया’ हा विषय पूर्वापार कळीचा मुद्दा राहिलेला आहे. समाज कितीही पुढारत असला तरी स्त्रियांबद्दलची संकुचित मानसिकतेची पाळंमुळं आजही खोलवर रुजलेली आहेत. त्यासाठीच स्त्रियांना कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर संरक्षण मिळावं म्हणून कायद्यात स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारांबाबत काही तरतुदी केलेल्या आहेत. समाजातला एक जागृत घटक म्हणून […]

 • confident banner

  अनेक रुपं, भूमिका, अनेक ठिकाणी वावर, अनेक कामं, जबाबदाऱ्या घेऊन आपली दिनचर्या सातत्याने चालू असते. वयाच्या प्रत्येक टप्प्यात आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंफत जातो अगदी सहजतेने ! आणि ते गुंफत जाणं देखील आपण आनंदाने स्विकारतो;पण आता गरज आहे ती स्वतःकडे सुद्धा पुरेसे लक्ष देण्याची . त्यात महत्त्वाची बाब ठरते ते म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व.

 • zatpat banner

  गुढीपाडवा म्हटलं कि श्रीखंड-पुरी, पुरणपोळी असे काहीसे पारंपारिक पदार्थ ठरलेले असतात; पण प्रत्येकवेळी असे पदार्थ बनवणे शक्य होतेच असे नाही आणि त्यात असे पदार्थ बनवायचे म्हणजे आधीपासूनच व्यवस्थित तयारी आणि मदतीला हात हवेच नाही का ?

 • woman small business BANNER

  उंबरठ्याच्या अलीकडे आणि पलीकडे आपल्यातली प्रत्येक मैत्रीण स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढतेय आणि झटतेय.

 • 750x418-Finance-Manager

  There comes a point in life when everything isn’t just about you and your choices. The saying “Your choices define you” starts to scorch brightly in your mind. This is purely because at that point, you have a family – a husband, kids, in-laws and all other factors that come with marriage.

 • indian beauty banner

  निसर्गाच्या अनेक सौंदर्यांपैकी एक सौंदर्य आपण स्त्रिया आहोत. प्रेम, माया, आपुलकी या सगळ्यामुळेच आपले अंतरंग खऱ्या अर्थाने समृध्द आहेच पण निरोगी राहण्यासाठी आणि काळाच्या गरजेनुसार स्वतःला प्रेझेंटेबल करण्यासाठी शारिरिक निगा राखणे देखील आवश्यक आहे.

 • chanda banner (1)

  नवी उमेद, नव्या आशा-आकांक्षा मनाशी बाळगून नवीन वर्षाचं स्वागत सगळ्यांनी केलं. मैत्रिणींनो ! तुम्हीही काहीतरी ठरवंल असेलच ना ! नवीन वर्ष फक्त निमित्त मात्र ; पण काही सुरु करायची इच्छा असेल तर प्रत्येक क्षण हा नाविन्यपूर्ण असतो. पण हो, हे मात्र नक्की की, या वर्षात स्वतःच्या ठरलेल्या चौकटीतून बाहेर पडायचा निर्धार करा.

 • self defence banner

  ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी !’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे आणि याच पार्श्वभूमीवर बोलायचे झाले तर जी जगाचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे ती स्त्री स्वतःच रक्षण करण्यासाठी सक्षम नक्कीच आहे. ‘स्त्री जन्मा, तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी ! नयनी पाणी ? हो,पण हे पाणी तिच्या हळव्या भावना आणि आनंदाश्रू यांमुळे आहे.

Designed and Developed by SocioSquare