पावसाळा ‘चहा व भजी’साठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच खवय्यांचा मकाही प्रिय आहे. सध्या मक्याची कणसे विकणा-या गाड्या तुम्हालाही जागोजागी दिसत असतील. छान खरपूस भाजलेला मका, त्यावर लिंबू, मसाल्याची चव, आहा….!! हे स्वादिष्ट लागतचं, पण गृहिणींना मक्याचे आणखी प्रयोग करायलाही आवडतात. म्हणूनच देत आहोत पुढील रेसिपी…
‘मक्याचे कटलेट’ बनविण्यासाठी लागणारे साहित्य-
२ वाट्या मक्याचे दाणे, २ बटाटे, २ चमचे मिरची आले पेस्ट, २ चमचे कॉर्नफ्लॉवर, लिंबाचा रस, ब्रेडक्रम्स, साखर, मीठ
पाककृती – प्रथम मक्याचे दाणे व बटाटे उकडून घ्यावेत. बटाट्याचे दाणे कुस्करुन, त्यामध्ये आलं-लसून पेस्ट, ब्रेडक्रम्स, कॉर्नफ्लोअर, चवीनुसार साखर, लिंबाचा रस व मीठ घालून मिश्रण एकजीव करुन घ्यावे. आता या मिश्रणाचे लहान गोळे करुन वड्यासारखे थापावेत व तेलात तळून घ्यावेत किंवा तव्यावर तेल सोडून नीटसे परतून घ्यावे. तयार मक्याचे कटलेट चटणी किंवा सॉससोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
मग, कशी वाटली मका स्पेशल रेसिपी..? नक्की कळवा खालील कमेन्टद्वारे! तुमच्याकडे मक्याच्या रेसिपीज् असतील, तर त्याही लिहून पाठवा आपल्या झी मराठी जागृतीच्या मैत्रिणींसाठी!