चटपटीत ‘मॅक्रॉनी उपमा’

मॅक्रॉनी उपमा

साहित्य- १ वाटी मॅक्रॉनी, ३-४ वाट्या पाणी, १/२ वाटी कांदा, १ लहान टॉमेटो, १ते२ हिरव्या मिरच्या, १ चमचा तूप, १/४ चमचा जिरे, २ चिमटी हिंग, ४-५ कढीपत्त्याची पाने, चवीपुरता मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर

पाककृती – ३-४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून पाणी उकळले की त्यात मॅक्रॉनी घालाव्यात. ८ ते १० मिनिटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळेनुसार मॅक्रॉनी शिजवाव्यात. नंतर, चाळणीत मॅक्रॉनी गाळून गरम पाणी निथळून मॅक्रॉनीवर गार पाणी घालून तेही पाणू निथळू द्यावे. नंतर, कढईत तूप गरम करावे. त्यामध्ये जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी. नंतर त्यामध्ये कांदा घालून तो पारदर्शक होईस्तोवर परतावा, नंतर टॉमेटो घालून तो मऊसर होईपर्यंत परतून घ्यावा. आता, वरील मिश्रणात शिजवलेल्या मॅक्रॉनी घालाव्यात, चव पाहून आवश्यक वाटल्यास मीठ घालावे. तयार मिश्रण २ मिनिटे गरम करुन कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.

(टीप – वरील पदार्थात गाजर, फरसबी या भाज्यांचाही समावेश करु शकता.)

मैत्रिणींनो! वरील, रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा खालील कमेन्टबॉक्सद्वारे!

Comments
Popular Posts
दही वडे (1)
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquare

Please wait...