rushi bhaji banner

रेसिपी ऋषीची भाजी

साहित्य- १/४ कि. भेंडी, १/४ कि. शिराळी, २ अळूच्या जुड्या, २ लहान जुड्या लाल माठ, मध्यम आकारातील काकडी, १/४ कि. मक्याचे दाणे, १ नारळ (खवणून), आले,२ वाटी ताक मिरची, तेल, जिरे

पाककृती – प्रथम सर्व भाज्या चिरुन घ्याव्यात. काकडी व दोडक्याच्या पातळ चकत्या कराव्यात. अळूची पाने व लाला माठाचे देठ सोलून व चिरुन घ्यावेत. आता, अळू, दोडके, काकडी, मक्याचे दाणे किंवा मक्याच्या कणसाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून घ्यावेत.

नंतर, खवणलेल्या नारळात थोडे कोमट पाणी टाकून, त्यामध्ये आले मिरची बारीक कापून घालावी. हे मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. एका मोठ्या कढईत थोडे तेल टाकून, तेल तापल्यावर त्यास जि-याची फोडणी द्यावी. त्यावर उकडलेला अळू टाकून परतून घ्यावा. त्यानंतर लाल माठ व दही टाकावे. या भाज्या नीट परतल्यावर त्यामध्ये चिरलेली भेंडी घालून वर झाकण द्यावे.

भेंडी नीट शिजल्यावर त्यामध्ये काकडी, शिराळे व मक्याचे दाणे पाण्यासहीत भाजीमध्ये मिसळावेत.
आता या तयार मिश्रणात नारळाचे दूध घालावे व ऋषीची भाजी मध्यम आचेवर छान शिजू द्यावी.

ही भाजी एकावेळी भरपूर खाता येते व अपचनही होत नाही. अतिशय पौष्टिक व सर्व सत्त्वांनी परिपूर्ण असणारी ऋषीची भाजी ऋषीपंचमीला आवर्जून करयलाच हवी.

Popular Posts
Banner 02
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares