aajibaicha batwa (1)

गुणकारी बटवा आजीबाईचा!

तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी होतचं असतात.त्यावर प्रथमोपचार म्हणून घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. पारंपरिक दृष्टीने या औषधांना महत्त्व आहे. आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. जुनं ते सोनं ही म्हण प्रचलित आहे त्याचप्रमाणे जुन्या काळातले हे उपाय आजही तितकेच फायदेशीर असल्याचे मत फिटनेस एक्स्पर्टने मांडले आहे. त्यातील काही उपाय जाणून घेऊयात

1. घशाला त्रास होत असेल किंवा आवाज बसला असेल तर गरम दुधात हळद घालून प्यावे

2. पोटात गॅसचा त्रास झाला असेल तर लिंबाच्या रसासोबत ओवा खाल्ला तर त्रास की कमाई होतो.

3. जुलाब होत असतील तर चमचाभर मीठ, दोन चमचे साखर मिश्रित लिंबू पाणी घेतल्यास आराम मिळतो

4. कावीळ झाली असेल तर आठवडाभर ऊस चावून खावा.

5. सर्दी- कफ झाला असेल तर जेष्ठमध खावे

6. सतत खोकला येत असेल १ ते २ चमचे मध घ्यावे किंवा खडीसाखर चघळावी.

7. तोंड आले असेल तर जाईच्या पानांचा रस लावावा.

8. लघवी करताना जळजळ होत असेल तर धान्याचे पाणी प्यायल्याने त्रास कमी होऊ शकतो.

9. भाजलं किंवा पोळलं असेल तर त्यावर तूप लावावे

10. पित्त झालं असेल तर आमसुलाचे पाणी प्यावे.

असे काही घरगुती उपाय आपल्याला नक्की फायदेशीर पडू शकतात.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares