farali banner

दिवाळी रंगे, फराळा संगे!

दिवाळीत कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त पदार्थ बनवण्याचा चंग बांधलेल्या मैत्रिणींनो, घेऊन आलोय फराळाच्या उत्तमोत्तम चविष्ट रेसिपीज् तुमच्यासाठी! सणांचा राजा असलेला दिवाळी सण आता काहीच दिवसावर आलायं. घराघरांतून येणारा भाजणीचा, चिवड्याचा खमंग सुवास येऊ लागलाय. लाडू, चिवडा, करंजी या पारंपारिक पदार्थांसोबत पुढील रेसिपीजच्या मदतीने तुमचा फराळ बनवा आणखी रुचकर!!

खारे शंकरपाळे –
साहित्य : मैदा चार वाट्या, कडकडीत तेल आठ मोठे चमचे, चवीनुसार मीठ, काळेमि-याची पूड एक चमचा, जिरे एक छोटा चमचा, ओवा अर्धा चमचा
पाककृती : चाळून घेतलेल्या मैद्यात ओवा, मिरे, जिरे, मोहन, मीठ, घालून घटट् भिजवून झाकून ठेवावे. साधारण एक तासाने पीठ चांगले मळून घ्यावे. पोळी लाटताना जसा गोळा करतात तसाच गोळा करुन, पोळपाटावर लाटून घ्यावा. कातणीने किंवा सुरीने त्याला प्रथम ठराविक अंतरावर आडवे कापून घ्यावे व नंतर उभे कापावे. तयार झालेले काप तेलात मंद आंच ठेवून गुलाबी रंगावर तळावेत.

जाळीदार अनारसे
साहित्य : जुने तांदूळ, गूळ, तूप, खसखस
कृती : तांदूळ तीन दिवस भिजत घालावेत, नंतर चाळणीवर उपसून ठेवावेत व कवड्यावर वाळत घालावेत. साधारण कोरडे झाले की मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावेत. मैद्याचे पीठ चाळून घ्यावे. जेवढे तांदूळ असतील तेवढा गूळ किसून घ्यावा व पिठात मिसळावाय १ वाटी पिठाला २ चमचे तूप याप्रमाणात तूप घालावे. सर्व मिश्रण एकजीव करुन त्याचे मोठे गोळे करुन स्टिलच्या डब्यात ठेवावेत. ३ ते ४ दिवसांनी अनारशाचे पीठ काढून घ्यावे. त्यामध्ये १/४ चमचा सायीचे दही घालून पीठ मळावे. नंतर पिठाची लहान गोळे करुन तेत खसखशीबरोबर थापावेत. नंतर, हा अनारसा मंद आचेवर तळावा. खसखस लावलेली बाजू वर येईल अशा त-हेने अनारसा तुपात सोडावा. त्यावर झा-याने तूप उडवावे, म्हणजे छान जाळी सुटते.
टीप – अनारसा जास्त जाड थापू नये.

गोलाकार कडबोळी –
साहित्य : थालीपीठ भाजणी २ फुलपात्री भरुन, २ टेबल स्पून तीळ, २ चहाचे चमचे तिखट, २ चहाचे चमचे मीठ, १ चहाचा चमचा ओवा, ४ टेबल स्पून कडकडीत तेल, तळण्यासाठी तेल
कृती : एका पातेल्यात २ फुलपात्री भरुन थालीपीठ भाजणी घ्यावी. त्यात तीळ, ओवा, तिखट, मीठासोबत ४ चार टे.स्पून तेल तापवून घालावे. .सर्व नीट मिसळावे व १ फुलपात्र भरुन पाणी उकळून भाजणीवर घालून व मिसळून मिश्रण झाकून ठेवावे. एका तासाने भाजणी पाण्याने नीट मळून घ्यावी. थोडीशी भाजणी घेऊन बाटोवर वातीसारखी लांब वळावी. साधारण २ इंचाएवढी लांब नळी झाली की, नळीची दोन्ही टोकं एकत्र दाबून कडबोळं तयार करावे. तेल तापवून मंद आचेवर कडबोळी तपकीरी रंगावर खमंग तळवीत.

ओल्या नारळाच्या करंज्या –
साहित्य: १ खवणलेला नारळ, १ वाटी गूळ, अर्धी वाटी साखर, वेलची किंवा जायफळ पूड, ५ ते ६ काजूचे तुकडे, १५ ते २० बेदाणे, ५० ग्रॅम खवा(सारणासाठी), ३ पेले कणीक, ४०० ग्रॅम तूप किंवा तेल, २ चमचे साखर, १/२ वाटी रवा, १/२ चमचा मीठ, १ ते १/2 पेला दूध.
कृती: कणकेत १/२ वाटी तूप किंवा तेल गरम करुन घालावे. तसेच, त्यामध्ये रवा, २ चमचे साखर व मीठ घालून दुधात कणीक भीजवावी. नंतर, वरील केलेले खोब-याचे सारण घालून करंज्या कराव्यात व तेल किंवा तुपात तळून घ्याव्यात.

लसूण शेव –
साहित्य: १ वाटी तेल, तिखट आवडीप्रमाणे (लहान चार चमचे), १ चमचा हळद, स्वादानुसार मीठ, साधारण मध्यम आकाराचे लसणीचा गड्डा(पूर्ण सोलललेला), ४ वाट्या बारीक दळलेले डाळीचे पीठ, तळण्याकरीता तेल.
कृती: तेल आणि तेवढेच पाणी घेऊ चमच्याने एकत्र करावे. त्यामध्ये, चवीप्रमाणए हळद, तिखट व मीठ घालावे. सोललेला लसूण मिस्करला बारीक वाटून घ्यावा व नंतर ती पाण्यात एकत्र करावी, तेच पाणी गाळून वरील मिश्रणात एकत्र करावे. वरील पाण्यात डाळीचे पीठ घालावे. तयार मिश्रण शेव पाडण्याच्या साच्यात घालावे व तेल कडकडीत तापले की त्यात शेव पाडावी. शेव तळताना ती थेट कढईत गाळावी लागते.
टीप – शेव मंद आचेवर तळावी, नाहीतर आतून कच्ची राहू शकते.

या दिवाळीला वरील पदार्थ नक्की करुन पहा, सर्व वयोगटाला आवडतील अशा चवदार रेसिपीजच्या सोबतीने सजवा घरचा फराळ!! ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखाची, समाधानाची व चविष्ट फराळाने परिपूर्ण जाओ!!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares