Quick recipe (1)

झटपट बनणारे पौष्टिक पदार्थ!

पौष्टिक अन्नाचे महत्त्व आपण सगळेच जाणतो;पण लहान मुलांपासुन मोठ्यांच्या आवडीनिवडी ठरलेल्या असतात आणि त्यापुढे पौष्टिक गुणांकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होते.त्यामुळे चटपटीत पण तितकेच पौष्टकत्त्वाने परिपूर्ण अन्नपदार्थ कसे मिळतील हा विचार आपला नेहमीच असतो. मग त्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग सुरु असतात. काही वेळा हे प्रयोग फसतात तर काही वेळा मात्र आपल्या सुगरणीचा मान आणखीन वाढवतात अशाच काही रेसिपी खास तुमच्यासाठी

रताळ्याची पोळी
साहित्य – कणीक,रताळी,गुळ,वेलदोडे,थोडे मीठ, २-३चमचे तेल, साजुक तूप
कृती : शिजलेले रताळे, गूळ, वेलदोडे आणि किंचित मीठ असे एकत्र करून सारण बनवून घ्यावे. कणकेचा गोळा लाटून त्यात हे सारण भरून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी आणि खरपुस भाजून गरम गरम साजुक तुपासोबत खायला द्यावी.

न्यूडल्स
आजकाल मुलांना न्यूडल्स हा प्रकार खुप आवडतो;पण हे न्यूडल्स देखील घरच्या घरी बनवून पौष्टिक करू शकतो.
साहित्य : गव्हाचे न्यूडल्स, जिरं,आलं,लसूण आणि मिरची पेस्ट, पातीचा कांदा, उकडलेले वाटाणे,मीठ
कृती : एका पातेल्यात गरम पाण्यात शिजवुन घ्यावे आणि पाण्यातून न्यूडल्स वेगळे करावेत. नंतर कढईत तेल गरम करून त्यावर जिरं, आलं,लसूण आणि मिरची पेस्टची फोडणी करावी. उकडलेले वाटाणे आणि त्यावर हे शिकवलेले न्यूडल्स आणि चवीनुसार मीठ घालून थोडावेळ परतून घ्यावे. नंतर त्यावर पातीचा कांदा घालावा.
घरच्या घरी बनवलेले हे न्यूडल्स खुप चविष्ट लागतात.

मेथीच्या पुऱ्या
मेथीची भाजी कडवट लागते म्हणून ती भाजी खाल्ली जात नाही. पण ही भाजी वापरून केलेल्या या पुऱ्या सगळ्यांना नक्कीच आवडतील
साहित्य : १ कप कणिक, १कप उडीद डाळीचे पीठ ,दीड कप चिरलेली मेथी, ओवा, हिंग,लाल तिखट, मिरचीची पेस्ट, तळण्यासाठी तेल
कृती : एका परातीमध्ये वरील सर्व मिश्रण एकत्र करून एकजीव मळून घ्या. हे पीठ १५ ते २० मिनिट झाकून ठेवा.नंतर याचे छोटे छोटे गोळे करून लाटुन घ्या आणि गरम तेलात खरपुस तळून घ्या.
या पुऱ्या दही, लोणचे किंवा चटणीसोबत खायला द्या.

झटपट डोसे
डोसे म्हटले की पीठ आंबवण्यासाठी वेळ द्यावा लागतो; पण या डोशांसाठी अगदी ३ ते ४ तास आधी तयारी पुरेशी आहे
साहित्य: ३ ते ४ तास भिजवलेले उडीद डाळीचे पीठ, कोथिंबीर, मिरची, मीठ
कृती: ३ ते ४ तास भिजवलेले उडीद डाळीचे पीठात कोथिंबीर, मिरची आणि चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करावं आणि नॉनस्टिक तव्यावर गरम गरम डोसे काढावेत आणि हिरव्या चटणीसोबत खायला द्यावे.

वरील सर्व पदार्थ चटपटीत असले तरी पौष्टिकत्त्वाने परिपूर्ण आहेत त्यामुळे लहानांपासुन मोठ्यांच्या पसंतीस हे पदार्थ नक्की उतरतील यात काही शंकच नाही. तेव्हा हे पदार्थ तुम्ही देखील घरी बनवा आणि घरच्यांची वाहवा मिळवा.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares