Inspiration > मीरा लाड, जीवन गौरव पुरस्कार
Meera-Lad

मीरा लाड, जीवन गौरव पुरस्कार

मीरा लाड यांनी पनवेल येथे ‘शांतीवन’ नावाचे केंद्र स्थापन केले आहे. शांतीवन मुख्यतः जे समाजाच्या मुख्य प्रावाहापासून दूर फेकले गेले आहेत अशा कुष्ठरोग्यांना सेवा देते.  कुष्ठरोग्यांना  सेवा देण्याबरोबरच हे केंद्राकडून  अनेक समाज कल्याण उपक्रम देखील  राबवले जातात. जसे कि रूग्णांसाठी जमीन पुनर्वसन, कार्पेट्स विणणे, कापड शिवणे व दुग्धशाळेचे व्यवस्थापन. याबरोबरच कुष्ठरोगाबद्दलचे  अनेक गैरसमज  दूर करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनपर शिबीर घेतले जाते.

शांतीवनच्या कार्यासोबतच मीरा लाड यांनी १९९४ साली ‘ अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे’ आदिवासी आश्रमशाळेची देखील स्थापना केली. यामार्फत जे आदिवासी त्याच्या परंपरेने शिक्षणाकडे वळलेले नाहीत  आणि जे आपल्या मुलांचे पालन पोषण करण्यास असमर्थ आहेत अशा आदिवासी लोकांना सेवा या केंद्रामार्फत पुरवली जाते. या शाळेमार्फत व्यावसायिक प्रशिक्षण, लेंग्वेज लेब, विज्ञान प्रयोगशाळा, जेवणाची जागा, सौर दिवे स्वयंपाकघर आणि सोलार हिटर, मुलींसाठी आणि मुलांसाठी राहण्यासाठी जागा इत्यादीची  उपलब्धता केली आहे.

Comments
Designed and Developed by SocioSquare