Inspiration > पूजा घनसरवाड, शिक्षण
Pooja-Ghansarwad

पूजा घनसरवाड, शिक्षण

बीड मधल्या पुजाच्या विलक्षण कहाणीमुळे  ती खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील पुरस्काराची मानकरी  आहे. पूजा तिच्या कुटुंबियांसोबत हिंदू स्मशानभूमीच्या आवारात राहते. अशा भयावह  परिस्थितीमध्ये राहून  ९१.२ % गुण मिळवून ती दहावी उत्तीर्ण झाली. हिंदू स्मशानभूमीच्या आवारात १० बाय १० फुटाच्या छोट्याशा घरात राहून त्यातही घरात दिवे नसल्याने  घराबाहेर बसूनच अभ्यास करावा लागत असे. जवळ जळत असलेल्या चितेच्या  प्रकाशात अभ्यास करत असताना मला घाबरायला झाले नाही. मी अनेक जणांच्या अंत्यसंस्काराची साक्षीदार आहे पण त्या परिस्थितही मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून  दिवसातून सात ते आठ तास अभ्यास करत असे” असे तिने व्यक्त केले.  आपल्या भावना मांडताना पुढे ती असेही म्हणाली, ”माझ्या समाजातली मी पहिली मुलगी आहे जिला दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेमध्ये इतके चांगले गुण  मिळाले.  माझ्या समाजातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत नाही ; पण माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. माझ्या भावंडांना देखील ते वेळोवेळी शिकण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करायची त्यांची पण तयारी असते.

भविष्यात पूजाला  डॉक्टर होऊन समाजाची सेवा करायची आहे. त्यासाठी विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन १२वी नंतर MBBS करायचे आहे. जर मी अभ्यास केला तर माझी भावंड पण त्यातून प्रेरित होतील आणि त्यातून ते देखील स्वतःचे  आणि आमच्या पालकांचे  जीवनमान बदलण्यासाठी सक्षम होतील  असे तीने सांगितले.

Comments
Designed and Developed by SocioSquare